जगातील सर्वात महागड्या 7 वस्तू तुम्हाला माहिती आहे का ?

पैसा हे सर्व काही नाही परंतु पैस्याशिवाय हि काही नाही हे हि तेवढेच सत्य आहे. पैशांनी बरेच काही विकत घेतले जाऊ शकते. हे गोष्ट खरी आहे. काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आहे. पण काही वस्तू एवढ्या महाग असतात, की कोट्यवधी रुपये असलेले लोकही माघार घेतात. अशाच काही जगातील सर्वांत महागड्या वस्तू आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. या वस्तू बघितल्यावर खरेचा मोह होतो. पण त्यांची किंमत ऐकल्यावर मोह आवरता घ्यावा लागतो. अगदी भन्नाट डिझाईन आणि क्रिएशनसाठी या वस्तू ओळखल्या जातात. तर चला बघूया खासरे वर जगातील सगळ्यात महागड्या वस्तू..

डायमंड पॅंथर ब्रेसलेट

जगातील हे सर्वांत महागडे ब्रेसलेट आहे. अॅडवर्ड 8 आणि वॉलिस सिम्पसन यांच्या स्मरणार्थ याची निर्मिती करण्यात आली होती. याची किंमत 79.36 कोटी रुपये आहे. पॅंथरवाला शेप याची खासियत आहे. याची लांबी 195 मिलिमीटर आहे. जगातील सर्वात महाग विक्री झालेला हा दागिना आहे. विंडसर राजा व राणीच्या खाजगी संग्रहातील हा दागिना आहे. हा लिलाव तब्बल २३ वर्षानंतर ठेवण्यात आला होता त्यामध्ये हा दागिना विकण्यात आला.

वाचा भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर ज्यांची संपत्ती अंबानी, टाटा,बिरला पेक्षाही जास्त आहे.

क्रिस्टल पियानो

या पियानोत शंभर टक्के क्रिस्टल वापरण्यात आले आहेत. जगातील हा सर्वांत महागडा पियानो आहे. याची किंमत 20.48 कोटी रुपये आहे. 1996 मध्ये डच कंपनीने याची निर्मिती केली होती. हा पियानो पहिल्यादा २००८ साली बीजिंग ओलम्पिकमध्ये वाजविण्यात आला होता. जगातील सर्वात महाग पियानो म्हणून या पियानोची ओळख आहे.

गोल्ड प्लेटेड बुगाती

या कारची बाहेरील आवरण सोन्यापासून तयार केली आहे. शिवाय स्पिडच्या बाबतीतही कार विशेष आहे. केवळ 2.8 सेकंदात ही कार 100 किलोमीटर प्रति तासाची स्पिड पकडते. हिची किंमत 64 कोटी रुपये आहे. ही कार लंडनमध्ये खरेदी करता येते. ३३ वर्षीय Tramar Lacel Dillard हे या कारचे मालक आहेत. तो प्रसिद्ध rapper आहे सोन्याची आवड असल्याने त्याने हा उपद्याप केल्याच लक्षात येते.

201 कॅरेट हिरेजडीत घड्याळ

201 कॅरेटच्या हिऱ्यांनी ही घड्याळ मढवण्यात आली आहे. दुरुन बघितल्यावर हा एक हिऱ्यांचा पुंजका वाटतो. हार्ट शेपच्या या घड्याळीची किंमत 160 कोटी रुपये आहे. Chopard ह्या कंपनीने ह्या घड्याळीची निर्मिती २००० साली केली आहे. जगातील सगळे रंगीत हिरे या घड्याळीमध्ये वापरण्यात आलेले आहे. एकूण ८७४ बहुमुल्य रत्ने असणारी हि घड्याळ जगातील सर्वात महागडी घड्याळ आहे.

वाचा जगातील ५ श्रीमंत जोडपे आणि त्यांची प्रेमकथा….

फेरारी जीटीओ 250

ही कार 1963 मध्ये लॉंच करण्यात आली होती. ही खुप सुंदर कार आहे. आता हिचा समावेश विंटेज कारमध्ये होतो. सर्वांत आधी ज्या व्यक्तीने ही कार खरेदी केली होती तिचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते. आता या कारच्या किंमतीत 50 टक्के वाढ झाली आहे. आता या कारची किंमत 224 कोटी रुपये आहे. 2004 साली झालेल्या लिलावात हि कार जगातील सगळ्यात महागडी कार म्हणून विकल्या गेली. 1962 ते 1964 या काळात ह्या कारची निर्मिती करण्यात आली आणि Group 3 Grand Touring Car या इवेंटमध्ये हि कार वापरण्यात आली होती.

यॉट हिस्ट्री सुप्रिम

तुम्ही हे बघून थक्क होसाल कि, या यॉटची निर्मिती करण्यासाठी एक लाख किलोग्रॅम सोने आणि प्लॅटिनमचा वापर करण्यात आला आहे. यात डायनासोरचा एक पुतळा आहे. या डायनासोरच्या पाठीचे हाड आणि यॉटमधील वाईनचे ग्लास 18 कॅरेट हिऱ्यांनी बनविण्यात आले आहेत. या यॉटची किंमत 28800 कोटी रुपये आहे. जगातील काही श्रीमंतच ही यॉट भाड्याने घेऊ शकतात. केवळ तिला प्रत्यक्षात बघण्यासाठी काही लोक लाखो रुपये चुकवतात. हि यॉट बनविण्याकरिता तब्बल तीन वर्ष वेळ लागला आहे. संपूर्ण काम याचे हाताने केले आहे. jeweler Stuart Hughes यांनी हि यॉट डिझाइन केलेली आहे.

इंश्योर.कॉम

हे जगातील सर्वांत महागडे डोमेन नेम आहे. इन्शुरंस कंपनीचे हे डोमेन आहे. याची किंमत 102.4 कोटी रुपये आहे. लाईफ इन्शुरन्स, कार इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि होम इन्शुरन्स मध्ये डिल करते. California येथील कंपनीने हे डोमेन विकत घेतलेले आहे.

वाचा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *