रोजंदारी शेतमजूर ते अमेरिकेत आयटी कंपनी सिइओ ज्योती रेड्डीचा संघर्षमय प्रवास..

शाळेत जाण्याकरिता अनवाणी पायाने तिला पैदल जायचं काम पडत असे, आज मर्सिडीज बेंज फिरायला आहे. सध्या तिच्याकडे ५०० बहुमुल्य साड्या आणि ३० किमती सनग्लासेसचे कलेक्शन आहे. ह्या सर्व गोष्टी ज्योती रेड्डी करिता फार छोट्या आहे परंतु एक काळ असाही होता जेव्हा ज्योतीला ह्या गोष्टी मिळणे अशक्यप्राय होत. परंतु सध्या ह्या गोष्टी अमेरिकन कंपनीमध्ये CEO असलेल्या ज्योतीस फार मोठी गोष्ट नाही. चला तर मग खासरेवर बघूया या सॉफ्टवेयर कंपनी सीईओचा संघर्षमय प्रवास…

ज्योतीने प्राप्त केलेले यश हे असामान्य आहे. तिचा जन्म आंध्र प्रदेश मधील वारंगल जिल्ह्यातील गुडेम या गावी झाला. ५ भावंडात २ नंबरची मुलगी ज्योती तिचे वडील एक साधारण शेतकरी होते.

ज्योतीच्या परिवाराचे हातावर पोट दोन वेळच्या अन्नाकरिता दिवसभर भटकायचं काम पडत असे. जेव्हा ती ९ वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांनी ज्योतीला व तिच्या बहिणीस अनाथाश्रमात पाठवून दिले. त्यांना वाटायचं कि कमीत कमी आपल्या मुलीला तिथे २ वेळेसचे अन्न तरी मिळेल. परंतु तिच्या बहिणीचे तिथे मन रमत नव्हते तिला घरची आठवण येत असे. त्यामुळे ज्योतीची बहीण अनाथालय सोडून घरी परत आली परंतु ज्योती तिथेच राहिली. ती सांगते कि ” हा काळ माझ्या आयुष्यातील भयंकर खराब काळ होता. मला माझ्या घरच्यांची विशेषतः आईची आठवण येत असे परंतु आपल्याला आई वडील नाही असा विचार करून मी तिथे दिवस काढत असे” ज्योतीने तिथे इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले.

ज्योती जुन्या दिवसाची आठवण करत असताना सांगते कि ” त्या काळात अनाथालयमध्ये पाण्याची खूप टंचाई राहत असे आणि तिथे टैप असलेला नळ हि नव्हता. आंघोळ करायला सुध्दा तिथे व्यवस्थित जागा नव्हती. त्यामुळे बकेट घेऊन तासानतास अंघोळीकरिता लाईनमध्ये लागायचं काम पडत असे. नंबर आल्यावर विहरीतून पाणी काढता येत असे. अश्या वेळेस आईची फार आठवण येत असे परंतु माझ्या हातात काहीही नव्हते म्हणून मर मारून तिथेच राहायची” ज्योती पुढे सांगते कि हा तर एक छोटासा आयुष्यातील भाग आहे. ती म्हणते ” मला २.५ किमी पैदल जायचं काम पडत असे परंतु पायात चप्पल नसल्यामुळे हे अंतर माझ्याकरिता २५ किमीचे वाटत असे. ज्या रस्त्यांनी मी जात त्या रस्त्यावर सेंट जोसेफ स्कूल लागायचे तिथल्या इंग्लिश मेडियमच्या मुलांना बघून मी विचार करत असे कि हे सर्वे किती नशीबवान आहे त्यांना चांगले कपडे,पुस्तके, बूट सर्वच मिळतय”

वाचा रमेश बाबू करोडपती न्हावी ४०० कारचा मालक ताफ्यात आहे रोल्स रोयॉस पासून सगळ्या महागड्या गाड्या…

भारताचे पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सांगितले होते कि ” राष्ट्र की प्रतिभाएं अक्सर क्लास में पीछे की सीट्स पर पाई जाती हैं ” आणि ज्योतीने हे सिद्ध करून दाखविले.

ज्योती नेहमी शाळेत मागे बसायची. कारण हे कि तिच्या कडे घालायला चांगले कपडे नव्हते त्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होत असे स्वतःला ती हीन समजत असे. ज्योती शाळेसोबत इतर कामेही करत जेणेकरून वडिलास काही मदत होईल. कपडे शिवणे, धुनेभांडे इत्यादी काम ती करत असे. अनाथलयात असलेल्या सुप्रिटेंडेंटच्या घरी ती कामाला होती. नंतर तिला हे समजू लागले कि चांगले जीवन जगायला एक चांगली नौकरी आवश्यक आहे.

ज्योतीने सुप्रिटेंडेंट पासून ११० रुपये उधार घेऊन आंध्र बालिका कॉलेजमध्ये सायन्सला एडमिशन घेतली. परंतु त्याच वेळेस तिच्या वडिलाने तिचे लग्न दूरचे नातेवाईक स्म्मी रेड्डी यांच्यासोबत लावून दिले. त्यावेळेस ज्योतीचे वय फक्त १६ वर्ष एवढे होते. सम्मी एक शेतकरी होता. त्यामुळे ज्योती त्याच्यासोबत जाऊन शेतीत काम करायची. सम्मी अल्पभूधारक रोजीरोटी चालविण्याकरिता ते दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायचे त्यांची मजुरी त्यांना ५ रुपये मिळत असे.

लग्नाच्या पहिल्या तीन वर्षात ज्योतीला बिना व बिंदू ह्या दोन मुली झाल्या. घर आणि मुले यांची जवाबदारी आल्यावर ज्योतीने काहीतरी करायचं ठरवील. तिने नेहरू युवा केंद्र अंतर्गत चालणार्या रात्र शाळेत १२० रुपये महिन्याने शिक्षिकेची नौकरी करण्यास सुरवात केली. १९८८ ते ८९ पर्यंत त्यांना १९० रुपये महिना असा पगार मिळत असे. त्यानंतर ती पेटीकोट शिवत असे ज्यामुळे तिला अजून थोडी आर्थिक मदत मिळत. इथे तिने १ वर्ष काम केले १ वर्ष काम केले त्यानंतर तिला जन शिक्षा निलयम वारंगल येथे ग्रंथपालाची नौकरी मिळाली. तिने इथे नौकरी करत असताना डॉ. भीम राव अंबेडकर ओपन यूनिवर्सिटी मधून १९९४ ला BA ची पदवी आणि १९९७ला काकातिया यूनिवर्सिटी मधून पोस्ट ग्रेजुएट पदवी मिळवली.

ज्योती व सम्मी त्यांच्या मुलीसोबत

पदवी नंतर त्यांना एका सरकारी शाळेत विशेष शिक्षकाची नौकरी मिळाली. जिथे तिला ४०० रुपये महिना मिळत असे. तिथे ती भाड्याच्या खोलीत राहत असे. शाळेनंतर ति रस्त्यावरील यात्रेकरूना साड्या विकत असे जेणेकरून अजून पैसे येतील.पोस्ट ग्रैजुएशन नंतर ज्योतीची परिस्थिती सुधरली कारण आता तिला ६००० रुपये महिन्याची नौकरी मिळाली होती. ज्योतीचा एक नातेवाईक अमेरिकेत नौकरी करीत होता. तीसुद्धा अमेरिकेमध्ये नौकरी करण्याचे स्वप्न बघू लागली याकरिता तिने कम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केला. मार्च २००० मध्ये तिला अमेरिकेतून नौकरीची ऑफर आली. तिने आपल्या दोन्ही मुलींना होस्टेलला पाठवून ती अमेरिकेत चालली गेली.

वाचा जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’

अमेरिकेत सुरवातीस तिने गैस स्टेशन वर नौकरी केली. त्यानंतर बेबी सिटींग, विडीओ शॉपमध्ये काम असे असंख्य काम तिने केले. दीड वर्षानंतर ती भारतात परत आली तेव्हा एका गुरुनी तिला सांगितले कि ती स्वतःचा बिझनेस सुरु करायला तयार झाली आहे. त्यानंतर ती अमेरिकेत परत गेली आणि विझा प्रोसेसिंग करिता तिने कन्सलटिंग कंपनी सुरु केली.

ज्योतीचे नशीब जोरावर होते तिने पहिल्याच वर्षी ४०,००० डॉलर कमविले आणि त्यानंतर तिने मागे वळून पहिले नाहि आणि काही दिवसाने तिने सोफ्टवेअर सोल्युशन नावाची एक कंपनी सुरु केली. हि कंपनी सॉफ्टवेयर डेवलपरची मदत करत असे. केवळ तीन वर्षात ज्योतीने १,६८,००० डॉलरची कमाई केली.

आज ज्योतीच्या कंपनीमध्ये १०० पेक्षा अधिक लोक काम करतात. आज तिच्याकडे अमेरिकेसहित भारतात ४ घर आहे. तिच्या कम्पनीचा नीव्वळ नफा आता १.५ करोड डॉलर पेक्षाही जास्त आहे. आज पैसा आल्यामुळे ती भूतकाळ विसरली नाही आहे ती अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांना नेहमी मदत करते.

ज्योती रेड्डी दिव्यांग युवकांना लग्नास मदत करत असते. नुकतेच तिने ९९ दिव्यांग जोडप्याची लग्न लावून दिली. ज्योतीचा संघर्ष आपल्या करिता प्रेरणादायी आहे खासरे तर्फे तिला स्लाम…

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *