जाणून घ्या तुमच्या आवडत्या वेबसाईटना त्यांची नावे कशी मिळाली ?

कामाच्या ताण तणावानंतर तुम्ही रोज घरी येता आणि रात्री आपल्या मोबाईलवर आलेले नोटीफीकेशन चेक करताना कधी twitter,फेसबुक इत्यादी वर आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी बघत असता. कधी युट्युब वर काही विडीओ तर कधी गुगल वर माहिती नसलेल्या विषयी माहिती शोधता… परंतु तुम्हाला माहिती आहेस का ? तुम्ही ज्या दैनदिन जीवनात रोज वापरणाऱ्या वेबसाईट त्यांना त्यांची ओळख कशी मिळाली होती.

गुगल

जगात असा कुठला इंटरनेट युझर नसेल त्याला गुगल हे नाव माहिती नसेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील काही काळ गुगलवर घालवितो. आता हा शब्द एवढा अंगवळणी पडला आहे कि लोक “Search” या श्ब्दाएवजी “गुगल” हा शब्द वापरतात. लोक सहजच म्हणतात ” अरे गुगल कर” जगातील एक नंबरची वेबसाईट गुगल तिला त्याचे नाव कसे देण्यात आले ते बघूया…

१९९६ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी हे वेबसाईट सुरु केली. ह्या सर्च इंजिन चे नाव त्यांना असे ठेवायचे होते कि मोठे आकडे असा अर्थ आला पाहिजे म्हणून त्यांनी googolplex हे नाव शोधले आणि त्यांचे छोटे रूप googol हे नाव ठेवण्याचे ठरविले. परंतु googol.com हे नाव उपलब्ध नसल्याने त्यांनी वेबसाईटचे नाव Google हे ठेवले. आणि आता गुगल जगातील सर्वात मोठी वेबसाईट आहे.

Facebook

फेसबुक विषयी काय बोलाव? या वेबसाईटने क्रांतिकारक बदल केला आहे आपल्या जीवनात, वागण्यात, बोलण्यात आणि इतर गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण बदलविला. परंतु त्यांना “FACEBOOK” नाव कसे मिळाले हे माहिती आहे का ?

फेसबुकची सुरवात हि आपल्या कॉलेजमधील सोबतच्या मित्रासोबत बोलयला सुरवात झाली होती. सुरवातीस ह्या वेबसाईटचे नाव The Facebook असे होते त्यानंतर The हा शब्द काढून Facebook येवढाच शब्द ठेवण्यात आला. अश्या प्रकारे फेसबुक हे नाव सगळ्या समोर आले.

YouTube

विडीओ शेअर करायला सगळ्यात मोठी वेबसाईट म्हणजे युट्यूब ह्यावर रोज लाखो विडीओ अपलोड होतात. अनेक सामान्य चेहरे युट्यूबने प्रसिद्धीच्या टोकावर नेली आहेत. युट्युब नावा मागील रहस्य साधे सरळ आहे हे नाव You आणि Tube या दोन शब्दापासून बनलेले आहे. ह्यावरील माहिती अथवा विडीओ इत्यादी तुम्ही (you) अपलोड करता त्यामुळे यु हा शब्द आला आणि Tube चा अर्थ असा आहे कि, जुन्या टीव्हीना Tube म्हणून लोक ओळखत होते. LCD , Led च्या अगोदर CRT टीव्ही असायच्या यामधील पिक्चरट्यूबवर सर्व खेळ चालत असे यावरून वेबसाईटचे नाव You + Tube = Youtube असे ठेवण्यात आले.

Twitter

आज जगात काय सुरु आहे कुठला ट्रेंड चालतो हे सर्व कुठे माहित पडत असेल तर ती जागा आहे ट्वीटर, कुठलाही नेता, अभिनेता, खेळाडू, कलाकार, पत्रकार त्यांना व त्याच्या चाहत्यावर्गास लोक पर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग कमी शब्दात आणि प्रभावीपणे मांडण्याचे साधन ट्विटर हे आहे.

पहिले या वेबसाईटचे नाव Twitch हे होते आणि यामध्ये ट्विटला उत्तर देता येत नसे. काही दिवसाने त्यांना आढळले कि Twit हा शब्द काही भाषेत आक्षेपार्ह आहे त्यामुळे त्यांनी वेबसाईटचे नाव Twitter असे ठेवण्यात आले.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *