भारतातील ६ आगळेवेगळे मंदिर, बुलेट बाबा, व्हिस्की देवी नक्की वाचा

भारतामध्ये अगोदरच 330 दशलक्ष पेक्षा जास्त देव आहेत. भारतामध्ये थोड्या थोड्या अंतरावर मंदिर बघायला मिळतात. बरेच अनपेक्षित स्थळी आणि वेगवेगळ्या आकाराचे मंदिर असतात. मंदिराच्या स्थळाला सहसा काही तरी दंतकथा किंवा काही तरी गूढ असते. आज आपण जाणून घेणार आहोत काही आगळ्यावेगळ्या मंदिराबाबत, जे की इतर मंदिरांपेक्षा वेगळे व असामान्य आहेत. काही ठिकाणी माणूस, उंदीर ते सायकल मोटरसायकल ची पूजा केली जाते व मंदिरही आहेत.

1. बुलेट बाबा मंदिर-

Bullet Temple

राजस्थान मधील जोधपूर मध्ये बुलेट बाबा हे मंदिर आहे. या मंदिरात 350 cc च्या बुलेटची पूजा केली जाते. ओम बन्ना नावाच्या एका व्यक्तीचा 20 वर्षापूर्वी बुलेट वर अपघाती मृत्यू झाला होता. येथे पूजा करायला येणारे लोकं सांगतात की, जेव्हा ओम यांचा अपघात झाला होता त्यानंतर जेव्हा पोलिसांनी ओम यांची बुलेट पोलीस स्टेशनला नेली, पण ती बुलेट प्रत्येक वेळेस दुसऱ्या ठिकाणी मिळायची. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आता ती बुलेट एका मंदिरात ठेवण्यात आली असून तिची लोकं रोज पूजा करायला येतात. लोकांचं म्हणणं आहे की पाली-जोधपूर हायवे ने तुम्ही जात असाल तर बुलेट बाबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही हा रस्ता सुरक्षित पणे पार नाही करू शकत. या रस्त्यावरील लोक बुलेट बाबांचे दर्शन घेण्यासाठी थांबतही आहेत.

2. मोदी मंदिर-

Modi temple

गुजरातमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर बांधण्यास दोन वर्षे लागली. या मंदिराच्या ठिकाणी अगोदर मोदी यांचे छायाचित्रे ठेवण्यात आलेले होते. लोकांच्या मते या मंदिरात सकाळी एकदा, दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी एकदा प्रार्थना केली जाते. या मंदिरात फक्त गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील लोकं ही येतात.

3. सोनिया गांधी मंदिर-

Soniya gandhi temple

तेलंगणातील मेहबूबनगर येथे काँग्रेस नेते शंकर राव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे मंदिर बांधलेले आहे. त्यांच्या मते लोकं सोनिया गांधींची रोज प्रार्थना करू शकतील म्हणून त्यांनी हे मंदिर बांधले आहे. शंकर राव यांनी या मंदिरात सोनियांचा संगमरवरीचा पुतळा उभारला आहे. मंदिरात भिंतीवर इंदिरा गांधी, राजीव गांधी राहुल गांधी यांची चित्रे लावण्यात आलेली आहेत.

4. विमान गुरुद्वारा-

Gurudwara

तुम्ही जर परदेशात जाण्यासाठी उत्सुक आहात पण व्हिसा मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर तुम्ही शहिद बाबा निहाल सिंग गुरुद्वारा मध्ये एकवेळ प्रार्थना करायला हवी. हवाईजहाज (विमान) गुरुद्वारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात आपली परदेशात जाण्याची इच्छा असल्यास आपण एक खेळण्यातील छोटे विमान घेऊन एक वेळ प्रार्थना केली की तुमची प्रार्थना लवकरच सार्थ होऊ शकते.

5. उंदिरांचे मंदिर- करणी माता मंदिर राजस्थान

Karni Mata

राजस्थान मध्ये असलेल्या करणी माता या मंदिरात खूप उंदीर आहेत. पण भक्तांना हे उंदीरापासून काही अडचणी नाहीयेत. करण करणी माता मंदिरातील उंदीर हे पवित्र आणि सुरक्षित मानले जातात. जर तुम्ही या मंदिरातील एखादा उंदीर मारला किंवा चुकून मेला तर तुम्हाला तो सोन्याचा बनवून मंदिरात द्यावा लागतो. मंदिरात काळे आणि तपकिरी उंदीर बघायला मिळतात. भक्तांच्या मते पांढरे उंदीर दिसणे हे शुभ असते.

6. व्हिस्की देवी मंदिर- कालभैरव मंदिर उज्जेन

kal-bahairv temple

उज्जेनच्या कालभैरव मंदिरात दारूचे दारूच्या बाटल्या घेऊन येणारे भक्त पाहून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता, तुम्हाला डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण या मंदिरात पूजेसाठी दारुच वापरली जाते व भक्तांना प्रसाद म्हणूनही दारुच दिली जाते. पौराणिक कथेनुसार कालभैरव ला तुम्ही हिंदू साठी अयोग्य असलेला आहार पूजेसाठी देऊ शकता. कालभैरव मंदिराच्या बाहेर पूजा चे साहित्य विकणारे लोकं तुम्हाला भेटतील. 40 रुपये च्या या बास्केटमध्ये नारळ, फुलं आणि 140 मिलि दारूची बाटली जी की राज्य सरकार पुरवते. भक्त ही बाटली2 मिनिटात पितात. त्यांना या दारूच्या ब्रँडविषयी जाणून घेने ही आवश्यक वाटत नाही.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

जाणून घ्या आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती ?

वाचा कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *