जाणून घ्या रेखा आणि अमिताभ यांच्या वायरल फोटो मागील सत्य..

रेखा आणि अमिताभ बच्चन या दोघांनी पहिल्यांदा ‘दो अनजाने’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगला चालला होता. या चित्रपटात रेखा आणि अमिताभ यांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीचे नाव जगभरात जोडीच्या यादीमध्ये अग्रगण्य आहे आणि ते खूप चर्चेत राहिले होते. या दोघांनी सोबत शेवटी यश चोप्रा यांच्या सिलसिला या रोमँटिक चित्रपटात काम केले होते. अमिताभ यांची साथ मिळताच रेखा यांच्या फिल्मी करिअरने एकदम उडान घेतली होती, जसे की अमिताभ हे रेखा यांच्या करिअरसाठी लॉटरी चं तिकिटच बनून आले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या मूकद्दर का सिकंदर या चित्रपटात या जोडीने सोबत काम केले होते. या चित्रपटाने त्यांच्या करिअर ने आकाशाला गवसणी घातली व त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले.

Amit_and_Rekha

हिंदी चित्रपटाद्वारे दाखवलेल्या प्रेमकथा या कलाकारांच्या निजी आयुष्यात ही घडतात. असेच काही अमिताभ आणि रेखा यांच्या बाबतीत घडले. जसे जसे यांचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपरहिट हात गेले तसं तसं यांच्या दोघांमधील प्रेम वाढत गेले. दोघांनी सुहाग, मि. नटवरलाल, गंगा की सौगंध, खून पसीना या सुपरहिट झालेल्या चित्रपटामध्ये सोबत काम केले आहे. अमिताभ यांच्यावर आपल्या प्रेमाचा जादूचालवण्यासाठी रेखाने स्वतःला पुर्णपणे बदलेले होते. आपला पहिला चित्रपट सावन भादो मध्ये जाड दिसणारी रेखा अमिताभ यांच्या प्रेमानंतर खूप बोल्ड आणि मनमोहक दिसायला लागली होती. दोघांचे चाहते आजही सिलसिला या चित्रपटात दाखवलेल्या त्यांच्या प्रेमकहाणी ची आठवण काढतात. कुली चित्रपटाच्या वेळी घडलेल्या एका दुर्घटनेमुळे दोघांची लव्हस्टोरी संपली. अजूनही हे एक राजच आहे की असे काय घडले होते कुली चित्रपटाच्या घटनेनंतर ज्यामुळे दोघांची प्रेमकथा संपुष्टात आली.

amitabh-bachchan rekha

काय आहे फोटो मागील सत्य ?

सध्या रेखा आणि अमिताभ या दोघांचे प्रेमप्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या चर्चेला सुरुवात झाली ती अनिस आझमींच्या वेलकम बॅक या चित्रपटामुळे. बी टाऊन मध्ये चर्चा होती की अनिस हे बॉलीवूड च्या टॉप च्या जोड्यांना घेऊन वेलकम बॅक करणार आहेत. या जोडीमध्ये नाव होते रेखा आणि अमिताभ यांचे. या चर्चेनंतर सध्या एक फोटो इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे एका विमानात बसलेले आहेत. त्यांनी पायलट सोबत एक फोटो काढला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पाठीमागच्या सीटवर रेखा बसलेल्या आहेत. हा फोटो इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला असून त्यासोबत एक मजेशीर गोष्ट म्हणजे अमिताभ आणि रेखा हे वेलकम बॅक या चित्रपटात सोबत काम करणार असल्याची स्टोरी ही फिरत आहे. पण ही मोठी जोडी सोबत स्क्रीनवर एकत्र येणार ही बातमी पूर्णपणे खोटी व निराधार आहे.

amitabh-bachchan rekha

अमिताभ बच्चन यांच्या एका जवळच्या व्यक्तीने या फोटो विषयी माहिती देताना सांगितले की ‘अमिताभ हे भारतीय चित्रपटाला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करण्यासाठी चेन्नई का जात होते. त्यांच्या सोबत त्या विमानात बॉलीवूड चे अनेक प्रसिद्ध कलाकार ही याच विमानात प्रवास करत होते. अमिताभ यांना बिल्कुलच कल्पना नव्हती की त्या विमानात त्यांचे सहप्रवासी कोण आहेत. कोणाला माहिती आहे की त्यांनी अमिताभ यांच्यामागे सीट घेताना काय विचार केला असेल?’

आणि विशेष म्हणजे हा फोटो ३ वर्ष जुना आहे. २०१३मध्ये हा फोटो वायरल झाला होता आता परत तोच फोटो सर्वत्र बघायला मिळत आहे.

या फोटोने एक जुना किस्सा आठवतो, अमिताभ यांच्या 60 व्या वाढदिवशी ठेवण्यात आलेल्या पार्टीला रेखा या निमंत्रण नसताना आल्या होत्या व त्या हॉटेलच्या बाहेरूनच परतल्या होत्या. यावरून रेखा आणि अमिताभ यांचा एकत्र विमान हा एक योगायोग असू शकतो. पण चेन्नईला जाण्यापूर्वी किंवा पोहचल्यावर ते एकमेकांना भेटले नव्हते. दोघं चित्रपटात एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. पण अमिताभ यांच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार अमिताभ हे या चित्रपटात काम करत नाहीयेत. त्यांना हे ही माहिती नाही की या चित्रपटात कोण कलाकार आहेत.

amitabh-bachchan-and-rekha

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

जाणून घ्या बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनविषयी काही अपरिचीत गोष्टी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *