संपूर्ण मुंबईचा ‘डॅडी’ कधीकाळी दूध विकून भरायचा कुटुंबाचे पोट…

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ‘दहशती’चे दुसरे नाव म्हणून गॅंगस्टर अरुण गवळीची ओळख होती. ‘डॅडी’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. कधीकाळी अख्या मुंबईवर तो राज्य करत होता. दूध विकून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवणारा अरुण गवळी नंतर गँगस्टर बनला. गवळी सध्या नागपूर तुरुंगात आहे. त्याच्यावर शिवसेना नेत्याच्या हत्येचा आरोप आहे.

गवळीचे वडील मध्यप्रदेशातून आले होते मुंबईत

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव कामधंद्यासाठी मुंबईत पोहचले होते. अरूण गवळीचा जन्म अहमदनगरमधील कोपरगावात झाला. घरातील आर्थिक स्थिती ठीक नसल्याने अरूण गवळीला पाचवीतूनच शाळा सोडावी लागली. यानंतर वडीलांना मदत म्हणून तो घरोघरी जाऊन दूध विकण्याचा काम करू लागला. १९८०च्या दरम्यान गवळी राम नाईक गॅंगशी जोडला गेला. पुढे दाऊदसाठी तो काम करू लागला.

अरूण गवळीचा परिवार

अरूण गवळीने पुणे जवळील वडगाव पाचपीर येथील मोहम्मद शेख लाल मुजावर नान्हुभाई यांच्या मुलीशी लग्न केले. हिंदू धर्मांतर करून तिचे नाव आशा ठेवले. आशा गवळी यांना गीता गवळी आणि महेश गवळी नावाचे दोन मुले आहेत. वंदना गवळी या अरूण गवळीच्या भावजई आहेत. माजी मंञी सचिन अहिर हे अरूण गवळीचे भाच्चे आहेत.

दाऊद दुबईत पळून गेल्यावर गवळीचे एकतर्फी राज

१९९३ मध्ये जेव्हा मायानगरी मुंबईत बॉम्बस्फोट ढाले तेव्हा तेव्हा अंडरवर्ल्डचे सारे समीकरण बदलून गेले. बॉम्बस्फोटाच्या आधीच दाऊद दुबईला पळून गेला. दाऊद आणि छोटा राजन वेगवेगळे झाले. छोटा राजनने आपला मलेशियात व्यवसाय सुरु केला. त्यामुळे अरुण गवलीला मुंबईत आपले साम्राज्य उभे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला गवळीचा कारभार दगडी चाळीतून चालत असे. त्याचदरम्यान त्याला शेकडो गुंड येऊन मिळाले व तोही अट्टल गुन्हेगार बनला.

गवळीच्या परवानगीशिवाय पोलिसांनीही मिळत नव्हता प्रवेश

मध्य मुंबईतील दगळीचाळीत गवळीचे एकहाती वर्चस्व होते. हे वर्चस्व एवढे होते की दगडी चाळीत त्याच्या परवानगीशिवाय पोलिसही प्रवेश करीत नसत. दगळी चाळीची रचना एखाद्या किल्ल्यासारखी आहे. तेथे 15 फूटाचा एक दरवाजा होता. येथेच गुंडांना हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण दिले जायचे. सर्वांना महिन्याकाठी चार हजार रूपये पगार दिला जायचा.

महिला पत्रकाराला मारहाण केल्याने साळसकरांनी धुतले होते गवळीला

अरुण गवळीने एकदा महिला पत्रकाराला मारहाण केली होती. ही माहिती जेव्हा एन्काउंटर स्पेशालिस्ट साळसकर यांना समजली तेव्हा ते फक्त चार पोलिसांना सोबत घेऊन दगडीत चाळीत गेले व अरूण गवळीच्या कॉलरला पकडून पोलिस ठाण्यात घेऊन आले. पोलिस ठाण्यात साळसकरांनी गवळीची जोरदार धुलाई केली. या घटनेने गवळीच्या गॅंगलाही धक्का बसला. कारण त्यापूर्वी गवळीच्या घरात थेट पोलिस कधीच घुसले नव्हते.

१५ दिवसाच्या आत साळसकरांनी गवळीच्या तीन गुंडांचा केला होता खात्मा

१९९७ मध्ये १५ दिवसाच्या आत गवळीचे तीन टॉप शूटर गणेश शंकर भोसले, सदा पावले आणि विजय तांडेल यांना साळसकरांनी एन्काउंटरमध्ये मारले होते. त्यानंतर साळसकरांनी गवळीचे बडे शूटर्स दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बंडेकर, बबन राघव आणि बंड्या आडीवडेकर यांना पोलिस चकमकीत मारून टाकले होते.

वाचा सोन्याची गाडी चालविणारे पुणेकर तरूण..

पोलिसांच्या भीतीने राजकारणात केला प्रवेश

पोलिसांच्या भीतीने व आपला काळा धंदा कायम ठेवण्यासाठी अरूण गवळीने राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये गवळीने अखिल भारतीय सेना नावाची संघटना स्थापन केली. विधानसभा निवडणुकीत आपले प्रतिनिधि उभे केले व स्वत: मुंबईतील चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला. अरूण गवळी आमदार झाला.

त्यांची पत्नी आशा गवळी या पण आमदार होत्या. मुलगी गिता गवळी व भावजई वंदना गवळी या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. २००७ ला मुंबई महापालिकेत शिवसेनाला बहूमतात येण्यासाठी जागा कमी पडत असताना अखिल भारतीय सेनेच्या ४ नगरसेवकांनी पाठींबा दिला आणी सेना सत्तेत राहीली.

एन्काउंटर स्पेशालिस्टने संपविली गवळीची गॅंग

2008 मध्ये गवळीने 30 लाख रूपयांची सुपारी घेऊन शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हतया केली. चौकशीत अरूण गवळी दोषी आढळला. आरोप सिद्ध झाल्याने त्याला तुरुंगावास झाला आहे. याचदरम्यान त्याची संपूर्ण गॅंग आता नष्ट झाली आहे. दया नायक, विजय साळसकर आणि प्रदीप शिंदे सारख्या एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असणा-या पोलिस अधिका-यांनी गवळीच्या गॅंगचे अस्तित्त्व नष्ट केले.

एकेकाळी अरूण गवळीची लोकप्रियता एवढ्या शिगेला पोहचली होती की सेना प्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे यांनी “तूमचा दाऊद तर आमचा अरूण गवळी” अशी घोषणाच केली होती. पुढे चालून अरूण गवळीचे बाळासाहेंबाशी खटके उडाले आणि अरूण गवळीने शिवसेनेला टक्कर म्हणून अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष काढला. मुंबईने आजवर अनेक अंडरवर्ल्ड डॉन्स पाहिले. पण यातला कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडू शकला नाही. पण आता अरूण गवळी एका खून खटल्यात दोषी सिद्ध झाला आहे.

शिवसेना नगरसेवक कमलाकार जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी २००८ साली अटक झाली. २०१२ साली कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी…