भारतीय फटाका उद्योगाबाबत काही अपरिचित माहिती…

दिवाळी जवळ येत आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा क्षण. मनुष्य हा प्रकाशाकडे नेहमी आकर्षित होत राहिला आहे. आगीचा शोध निएंडरथल माणसाने लाविला तेव्हापासून प्रकाशाविषयी सर्वाना आकर्षण आहे. आपण दिवाळीची हि परंपरा अनेक वर्षापासून साजरी करत आहो परंतु ह्यामागे काम करणाऱ्या हाता विषयी कोणी विचार केला आहे का ज्याच्यामुळे दिवाळी एवढी भव्यदिव्य झालेली आहे.

भारतीय फटाका उद्योग जगातील दुसरा सर्वात मोठा फटाका उद्योग आहे.

भारतापेक्षा मोठ्या प्रमाणात फटाका बनविणारा देश चीन हा आहे. भारत अथवा चीन ह्या उद्योगात सर्वात वर कारण मानव संसाधनाची विपुल प्रमाणात उपलब्धता हि आहे. आणि ह्या उद्योगाला आवश्यक असणारा सण देखील भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो. संपूर्ण जगात फटाक्याचा वापर अनेक प्रसंगी केला जातो परंतु ह्या सर्वाची भूक भागविण्याकरिता दिवाळी हा एकच सण भारतास पुरा आहे.

ह्या उद्योगाची सुरवात झाली कलकत्ता येथे…

आपल्याला माहिती आहे कि तामिळनाडू मधील शिवकाशी हे फटका उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. परंतु सुरवातीस हे प्रमुख केंद्र नव्हते. कलकत्ता येथील गृहस्त दासगुप्ता हे इसवी १९०० मध्ये आगपेटीची छोटी कंपनी चालवत होते. शिवकाशी येथे दुष्काळ आणि उपासमारीमुळे दोन भाऊ शिवकाशी बाहेर नौकरीच्या शोधात बाहेर पडले. श्रीमूग नादर आणि पी अय्या नादर हे त्या दोघांचे नाव, त्यानंतर त्यांनी दासगुप्तायांच्या कंपनीमध्ये अनेक दिवस काम करून हे काम शिकून घेतले आणि परत शिवकाशीस आले स्वतःचा धंदा सुरु करण्याकरिता. कमी पाउस आणि दुष्काळ हा त्यांच्या करिता फायद्याचा विषय राहिला कारण फटाका उद्योगास अश्याच प्रकारचे कोरडे हवामान आदर्श आहे.

शिवकाशी व भारतीय लष्कराचा करार झालेला आहे.

शिवकाशी येथील अनेक उद्योग समूह भारतीय सैन्यास दारुगोळा पुरविण्याचे काम करतात. लष्करास लागणाऱ्या लाल ज्योत असलेल्या माचीस, धूरन होणार्या माचीस, प्रशिक्षणाकरिता लागणारे बॉम्ब इत्यादी साहित्य पोहचविण्याचे काम शिवकाशी येथूनच होते.

शिवकाशीकडे स्वतःचे फटाके संशोधन आणि विकास केंद्र (एफआरडीसी) आहे.

हे केंद्र संपूर्ण उद्योग गुणवत्ता आणि सुरक्षा निकष दृष्टिने सुरू करण्यात आले. ते कच्च्या मालाची चाचणी घेण्याची जबाबदारी घेतात, घातक उत्पादन प्रक्रिया आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेची देखरेख करतात. फटाका उद्योग हे जोखमीच उद्योग आहे यात अनेक लोकांचे बळी गेलेले आहे. FRDC च्या स्थापनेपासून या गोष्टीत घट होत आहे.

भारत आपले फटाके निर्यात करत नाही.

भारतात योग्य दळणवळण सुविधा नसल्यामुळे भारत फटाके निर्यात करत नाही. फटाका आयात करणारे देश कठोर नियामक मानक लादतात जे भारत पूर्ण करण्यास असमर्थ आहे. जगातील सर्वात मोठ्या फटाके उद्योगांपैकी एक असल्याने आपण त्या वस्तूंना परकीय महसूलात टाकण्याची एक उत्तम संधी गमावत आहो हे नक्की..

या उद्योगात कोणालाही फटाक्यांची आयात करण्याची परवाना नाही

फटाक्यांना परदेशी व्यापार महासंचालनालयाने प्रतिबंधात्मक वस्तूंतर्गत श्रेणीबद्ध केले आहे. चीन सुद्धा फटाक्याची आयात करू शकत नाही. जर आपण चायना फटाके खरीदी करीत असल्यास तुम्ही ते अवैद्यरित्या करत आहे हे समजून घ्या..

पोटॅशिअम क्लोरेट – चीनच्या फटाक्यांनी भारतीय उद्योगांवर अतिक्रमण केले आहे

१९९२ अगोदर भारतात ह्या पदार्थावर बंदी नव्हती परंतु क्लोरेट जेव्हा सल्फर सोबत मिसळल्या जातो तेव्हा हा अत्यंत घातक ठरू शकतो. चीनमध्ये ह्यावर बंदी नाही आणि क्लोरेट अगदी स्वस्त भावात मिळतो. अशा बेकायदेशीर फटाके खरेदीविरूध्द सरकारने सावधगिरी बाळगली नाही म्हणून तर भारतीय उद्योगाला हानी पोहोचली आहे.

आनंदी आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *