नांदेडचे नवाब खा. अशोकराव चव्हाण…

आज नांदेड महानगर पालिकेचा निकाल आला आणि मोदि लाट परत दुसऱ्यावेळेस महाराष्ट्रात थांबविणारे व्यक्तिमत्व कोणी असेल तर खा.अशोकराव चव्हाण हे एकमेव नेते ठरले. लोकसभेनंतर आज हा दुसरा त्यांचा मोठा विजय संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नांदेड महानगर पालिका निवडणुकीवर लागले होते. आज खासरे वर आपण अशोकरावां विषयी काही अपरिचित माहिती बघूया..

श्री. अशोक शंकरराव चव्हाण यांचा परिचय
जन्म तारीख : २८ ऑक्टोबर १९५८ जन्म ठिकाण : मुंबई कौटुंबिक माहिती : पत्नी श्रीमती अमिता ,दोन मुली शिक्षण : बी.एससी., एम.बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) छंद : टेबल टेनिस, वाचन आणि प्रवास

२६/११च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून जावेत, असे अनेकांना वाटत होते. मात्र ते जातील असे अनेकांना वाटत नव्हते. विलासरावांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड आणि दिल्लीतील सोनिया गांधींच्या गुडबूक्समधील नेत्यांबरोबर असलेला दोस्ताना पाहता त्यांच्या अश्वमेधाच्या घोडय़ाचा लगाम खेचणार कोण, असा प्रश्न होता. मात्र विलासरावांच्या उचलबांगडीचे संकेत मिळाले आणि काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्री कोण याच्यावरचा सट्टा तेजीत आला.

वाचा अपरिचित आर. आर. आबा पाटील

त्यातही पहिल्या टप्प्यात वेगाने धावणाऱ्या नारायण राणे यांच्यावर बहुतांश जण आपली बोली लावून मोकळेही झाले. शिवसेनेला भगदाड पाडून काँग्रेसमध्ये आलेल्या राणेंना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन थेट सोनियांनी दिल्याचे दाखले दिले जाऊ लागले. राणेंनी मोर्चेबांधणीही अत्यंत जोरदार केली होती. माहौल असा होता की, विलासरावांच्या मंत्रिमंडळात राजकीयदृष्टय़ा अगदीच दुय्यम गणले जाणारे उद्योग खाते सांभाळणारे अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे फारच कमी जणांना वाटत होते. मात्र चेहऱ्यावर व बोलण्यात कायम संयतपणा असणाऱ्या अशोकरावांनी दिल्लीला स्वतचे महत्त्व यशस्वीरित्या पटवून दिले. काँग्रेसी राजकारणाच्या आखाडय़ात कोकणी पैलवान खुराक व मेहनत दोन्हीत कमी पडत असल्याचे खरे तर तेव्हाच स्पष्ट झाले होते. ८ डिसेंबर २००८ रोजी अशोक चव्हाण यांनी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष अशोक चव्हाण… जन्मापासून लाल दिवा आणि सुरक्षा बाळगणारा युवराज अशी त्यांची ओळख.

अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण यांनी केंद्र असो वा राज्य दोन्ही ठिकाणी अनेक महात्वाची पदे भूषवली. वडिल राजकारणात असल्याने साहजिकच अशोकरावांचे बहुतांश शिक्षण मुंबईतच झाले. अशोकरावांनी अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले.

अशोक चव्हाण यांच्यासोबत वर्गमित्र म्हणून महेश कोठारे, महेश मांजरेकर, डी पी सावंत आदी मंडळी होती. अशोकराव अत्यंत स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना माणसांची पारख आहे, दिलेला शब्द ते पाळतात, अशा कितीतरी गोष्टी अशोकरावांबद्दल सांगता येतील.
अशोकराव व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधर असल्याने त्यांना विकासाचा आराखडा तयार करणे अधिक सोपे जाईल.

अशोक चव्हाणांच्या शालेय जीवनात घडलेल्या एका घटनेचा त्यांच्या मनावर अत्यंत खोल परिणाम झाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. शाळेत असताना एकदा ते स्वतचे दप्तरच कुठेतरी विसरले होते. या प्रकाराने ते चांगलचे हबकले होते. त्या घटनेनंतर अशोक चव्हाण कोणतीही गोष्ट विसरत नाहीत. आयुष्यात घडलेली घटना असो, भेटलेली व्यक्ती असो, की स्वत जवळची वस्तू असो ते पक्की लक्षात ठेवतात.

अशोक चव्हाण यांनी ७ नोव्हेंबर २००९ या दिवशी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अशोक चव्हाण हे अधिक शक्तीशाली बनून आल्याचे त्यांच्या विरोधकांनीही मान्य केले होते. अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांच्या कडक शिस्तीत लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांचे शिक्षण एमबीए. त्यामुळे त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ता असो वा पक्षातील आमदार, किंवा पत्रकार, आधी वेळ ठरवूनच ते कुणालाही भेटतात.

कधीही आत घुसा आणि मुख्यमंत्र्यांसमोर भेटून समर्थकांपुढे इंप्रेशन तयार करा, याची सवय झालेले अनेक नेते-कार्यकर्ते या नव्या पद्धतीमुळे कातावले. त्यामुळे मुख्यमंत्री कुणालाही भेटत नाहीत, आमदारांनाच काय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही अपॉइंटमेन्ट घ्यावी लागते, अशी कुजबुज सुरू झाली. कुठलाही कागद नीट वाचल्याशिवाय त्यावर सही करायची नाही, ही अशोकरावांची दुसरी सवय.

अशोक चव्हाण यांची प्रेमकहाणी

राजकारणातील एवढ्या मातब्बर नेत्याचा मुलगा असल्याने अशोक चव्हाण यांचे एखाद्या बड्या नेत्याच्या मुलीशी लग्न होईल अशी सर्वाना खात्री होती. पण पुढे काही औरच झाले. अशोक चव्हाण यांच्याच महाविद्यालात एक सोज्वळ आणि घरंदाज मुलगी शिकायला होती. वर्ग मैत्रीण असल्याने तिच्याशी अशोकराव यांची मैत्री होती. याच मैत्रीतून अनेकदा गप्पा टप्पा व्हायच्या. मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही.

अशोकरावांनी ही बाब त्यांच्या आईवडिलांना सांगितली. त्यांनाही ही मुलगी भावली आणि थेट 1981 साली अशोकरावांचा त्या वर्ग मैत्रिणीशी विवाह झाला. तिचेच नाव सौ. अमिता अशोक चव्हाण.

वाचा अपरिचित विलासराव देशमुख

पूर्वाश्रमीची अमिता शर्मा आता अशोक चव्हाणांची अर्धांगिनी आहे. सौ अमिता या तश्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. पण त्यांनी चव्हाणांच्या घराची सून म्हणून पदभार स्वीकारला. बघता बघता त्यांनी सर्व रितीरिवाज समजून घेतले. सौ अमिता चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा संसार सुरळीत सुरु आहे.

सौ. अमिता यांनी त्यांचे सासू सासरे यांचा एवढे मन जिंकले की कै. शंकरराव चव्हाण मला 5 नाही तर 6 मुली आहेत असा उल्लेख आनंदाने करायचे. राजिक वारसा असलेल्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो पण सौ अमिता यांनी आनंदाने सर्व लोकांचे आदरातिथ्य केले, करत आहेत.

सौ अमिता या नेहमीच अशोक रावांची जमेची बाजू म्हणून उभ्या राहिल्या… पतीच्या कामाचा व्याप कमी व्हावा म्हणून त्यांनी हळूहळू राजकारणातही लक्ष देण्यास सुरुवात केली. आजघडीला त्या स्वतः आमदार आहेत… आज त्यांचे सासू सासरे हयात नाहीत पण सौ अमिता यांनी अशोकरावांच्या बहिणींना कधीच आई वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही.

लग्नाच्या 8 वर्षांनी सौ अमिता आणि श्री अशोकराव यांच्या संसारवेलीवर २ जुळ्या मुलींच्या रूपाने फुल उमलले… ३५ वर्ष झाली या जोडीचा सुखी संसार सुरु आहे.

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा अपक्ष आमदार बच्चू कडू विषयी अपरिचित गोष्टी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *