नासाने लाँच केले १८ वर्षीय भारतीय तरुणाने बनवलेले जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट

प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान वाटेल असे कार्य पार पाडले आहे एका 18 वर्षाच्या भारतीय तरुणाने. कारणही तसंच आहे, नासा ने काही दिवसांपूर्वी जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट प्रक्षेपित केल्यानंतर याची नोंद इतिहासात झाली आहे. भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हा सॅटेलाईट बनवलाय एक 18 वर्षीय तरुणाने. तमिळनाडू चा विद्यार्थी रिफाथ शारुख आणि त्याच्या टीम ने ही अभिमानास्पद कामगिरी पार पाडली आहे.माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावावरुन या सॅटेलाइट ला कलामसॅट असे नाव देण्यात आले आहे. या सॅटेलाइट चे वजन फक्त 64 ग्राम आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार हे सॅटेलाईट ध्वनिमुद्रणासाठी नासाच्या Wallops आयलँड मधून प्रक्षेपित करण्यात आले.

Sharook

या उपग्रह प्रक्षेपणासह भारताने जागतिक स्पेस रेकॉर्ड तयार केला आहे. ANI शी बोलताना शारुख म्हणाला की, या यशात मोलाचा वाटा हा त्याच्या टीम मेंबर्स चा आहे. टीम मेंबर्स च्या कामगिरीशिवाय मी एवढे मोठे यश मिळवूच शकत नव्हतो. शारुख ने पुढे बोलताना सांगितले की ,” हे एक 3D प्रिंटेड उपग्रह आहे. आणि पहील्यांदाच 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान अवकाशात वापरले जात आहे. जगातील सर्वात छोटे सॅटेलाइट बनवून आम्ही इतिहास घडवला आहे. याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या सहकाऱ्यांना देतो, त्यांच्या शिवाय हे शक्य नव्हते, ” असे तो म्हणाला.

हा प्रोजेक्ट स्पेस किड्स इंडियाच्या संस्थापक आणि सीईओ डॉ. श्रीमती केसन यांच्या देखरेखीखाली पार पडला. केसन यांनी सांगितले की प्रक्षेपणानंतर 125 मिनिटांनी रॉकेट ला उपग्रहापासून वेगळे करण्यात आले. त्यांनी सांगितले की नासा हे उपग्रह पुनप्राप्त करेल व डेटा पुनप्राप्त करण्यासाठी परत पाठवेल. कलाम सॅट हे प्रक्षेपणाच्या वेळी समुद्रात पडले असल्याचे केसन यांनी सांगितले. त्यांनी खात्री व्यक्त केली की नासा हे सॅटेलाईट पुनप्राप्त करेल व त्यातील डेटा रिकव्हर आणि डिकोड करण्यासाठी आम्हाला पाठवेल.
लाँचिंगला एक दैवी हस्तक्षेप म्हणत केसन पुढे म्हणाल्या, 3.8 घन सेंटिमीटर च्या आकाराचा हा सॅटेलाइट आपल्या तळहाथात ही बसू शकतो आणि तो पुर्णपणे 3D प्रिंटेड आहे. वातावरणातील रेडिएशन मोजण्यासाठी यामध्ये नॅनो गेगर म्युलर काउंटर ही बसवलेले आहे. हे सॅटेलाईट प्रबलीत कार्बन फायबर पॉलिमारपासून बनवलेले आहे. ‘अवकाशाला कुठल्याच सीमा नाहीत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन संशोधन केले तर आपण लवकरच मंगळवार विजय मिळवू’ असे केसन यांनी ANI शी बोलताना सांगितले.

माहिती अवडल्यास अवश्य शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *