पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविणारी तनोट माता, ३००० बॉम्ब झाले होते निष्क्रीय..

लेखाचे शिर्षक वाचुनच तुम्ही अवाक झाले असणार परंतु हि सत्य घटना आहे. तनोट माता मंदीर जैसलनेर पासुन १३०किमी दुर असलेले देवस्थान आहे. हे ठिकाण भारत पाकिस्तान सिमेलगत आहे. तसे हे मंदिर पुरातन काळापासुन एक अलौकिक देवस्थान म्हनुन प्रसिध्द आहे पण १९६५ च्या भारत पाकिस्तान युध्दानंतर हे शक्तिपीठ संपुर्ण जगात चमत्काराकरीता प्रसिध्द झाले.

तनोट माता

१७ ते १९ नोव्हेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने तीन दिशांनी तनोट येथे तोफांनी मोठे आक्रमण केले. त्या वेळी तनोट क्षेत्राच्या रक्षणासाठी मेजर जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली १३ ‘ग्रेनेडिअर’ची एक तुकडी आणि सीमा सुरक्षा दलाच्या २ तुकड्या शत्रूशी लढत होत्या. १६ नोव्हेंबर या दिवशी भारतात शिरून १५० किलोमीटर पर्यंतचा परिसर कह्यात घेतला होता. शत्रूसैन्याने तनोटमाता मंदिरावर ३ सहस्र आणि मंदिर परिसरात ४५० बॉम्ब टाकले; मात्र त्यातील एकही बॉम्ब फुटला नाही. पाकिस्तानचे सैनिकही या घटनेचे साक्षीदार होते.

पाकिस्तानच्या सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकचे सैनिक विमानातून बॉम्ब टाकतेवेळी खाली असलेल्या मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत, तेव्हा त्यांना मंदिर न दिसता तलावाजवळ एक मुलगी बसलेली दिसत असे. मंदिरातील लपलेल्या सैनिकांसाठी तनोटमाता मंदिर एक सुरक्षाकवच बनले होते. यातील काही जिवंत बॉम्ब आजही या मंदिरातील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

संग्रहालयातील बॉंब

१९६५च्या युध्दानंतर ह्या मंदीराची जवाबदारी सिमा सुरक्षा दल (BSF) ने स्वत: घेतली आहे व येथे त्यांची चौकीसुध्दा आहे. येवढेच नाहीतर येथील सैनिकाच्या सांगण्या अनुसार ४ डिसेंबर १९७१ रोजी रात्री पंजाब रेजिमेंट व BSF यांच्या संयुक्त कार्यवाहीत पाकिस्तानी टैंक रेजिमेन्टला धुळ चारली होती व लोंगवाला भागात पाकिस्तानी टैंकचे समशान बनविले होते. यावेळेस ह्या सैन्यानी याच मंदिरात आश्रय घेतला होता. लोंगवाला भाग व तनोट माता मंदीर जवळच आहे या विजयानंतर भारतीय सैन्याने ईथे विजय स्तंभाचे बांधकाम केले व दर वर्षि १६ डिसेंबरला ईथे विजय दीन साजरा होता.

विजय स्तंभ तनोट

तनोट मातेस आवड माता म्हनुनही ओळखल्या जाते ती हिंगलाज मातेचा अवतार आहे. हिंगलाज मातेचे शक्तिपीठ पाकीस्तान मध्ये बलुचिस्तान येथे आहे. प्रत्येक वर्षी आश्विन व चैत्र नवरात्रीस येथे मोठी यात्रा भरते. आणी पाकिस्तानमधील हिंदु व काही मुस्लिम या देविची उपासना करतात.

निश्रीय पाकिस्तानी रणगाडा

तनोट माता मंदिराचा इतिहास

मंदिरातील एका पुजार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी मामडिया नावाचा एक चारण (या शब्दाचा अर्थ गोपालक किंवा भाट असा आहे.) होता. त्याला मूल नसल्याने संतानप्राप्तीसाठी त्याने हिंगलाज मातेची ७ वेळा चालत यात्रा केली होती. त्यावर देवी प्रसन्न झाली आणि चारणाच्या स्वप्नात येऊन ‘मुलगा हवा कि मुलगी ?’ असे चारणाला विचारले. त्यावर त्याने ‘देवी तुम्हीच माझ्या घरी जन्म घ्या’, अशी विनंती केली. त्यानंतर चारणाच्या घरी ७ मुली आणि १ मुलगा यांनी जन्म घेतला. त्यातील एक आवड माता हिने विक्रम संवत ८०८ मध्ये जन्म घेतला.

मंदिर परिसर

जिला तनोट माता मानले जाते. जन्मत:च मातेने चमत्कार दाखवण्यास आरंभ केला होता. अन्य ६ मुलीही दैवी शक्ती होत्या. चारणाच्या या ७ पुत्रींनी हुणांच्या आक्रमणापासून माड प्रांताचे रक्षण केले होते. आवड माता अर्थात् तनोट मातेच्या कृपेने माड प्रदेशावर राजपूतांचे राज्य स्थापित झाले. भाटी राजा तणुराव याने माड प्रदेशाला राज्याच्या राजधानीचे शहर बनवले आणि तनोटमातेला सोन्याचे सिंहासन अर्पण केले.

मंदिर इतिहास

काॅन्सेटबल कलिकांत सिन्हा तनोट चौकीवर मागील ४ वर्षापासुन कार्यरत आहेत ते सांगतात देवी शक्तिशाली आहे त्यांच्या अनेक ईच्छा पुर्ण झाल्या आहेत. अशिच मातेची कृपादृष्टी आमच्यावर सदैव राहली तर विरोधक आपल्या केसालाही धक्का लावु शकनार नाही, असे ते सांगतात.

हि खासरे माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *