रघुराम राजन भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘जेम्स बॉण्ड’ अपरचीत गोष्टी…

रघुराम राजन यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘जेम्स बॉण्ड’ म्हणून ओळखल्या जाते. कारण हि तसेच आहे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेत त्यांनी कुठलीही तडजोड न करता परत फायद्यात आणली. कुठल्याही राजकीय दबावाच्या खाली न राहणारा दबंग व्यक्तिमत्व रघुराम राजन…

रघुराम राजन यांची RBI (Reserve Bank Of India) मधील गवर्नर पदाची ३ वर्ष वादळी होते. भारताच्या अर्थव्यवस्थेस स्थैर्य त्यांनी टिकवून ठेवले हे आज अनेकांना कळत आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये जेव्हा त्यांनी आरबीआय ची सूत्रे हातात घेतली तेव्हा परकीय गुंतवणूक २४९ डॉलर एवढी होती एप्रिल २०१६ मध्ये त्यांनी ती ३५९.७६ डॉलर पर्यंत गेली.

रघुराम राजन यांचे परत नाव चर्चेत आले ते म्हणजे त्याचे झालेले अर्थशास्त्रातील नोबल करिता नामांकनामुळे, एका मध्यम वर्गीय तमिळ कुटुंबात त्यांचा मध्यप्रदेश मध्ये जन्म झाला. IIT मध्ये इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांनी IIM व MIT बिजनेस मैनेजमेंट मध्ये पुढील शिक्षण घेतले. संपूर्ण देशास धक्का बसला होता जेव्हा रघुराम राजन यांनी मागील सप्टेंबरमध्ये आरबीआयच्या गवर्नर पदाचा राजीनामा दिला.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे २३ वे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या उपाययोजना बीजेपी सरकार करिता नेहमी डोकेदुखी ठरत होत्या. त्यामुळे अनेकदा केंद्र सरकार सोबत त्यांचे खटके हि उडालेत, परंतु ५३ वर्षीय राजन हे झुकले नाही. नोटबंदी त्यांना मान्य नव्हती किंवा GDP चा हिशोब करायची नवीन पद्धत या सर्वावर ते विरोध करीत राहिले. त्याचे विधान सुध्दा तसेच बेधडक “ आरबीआय हि तुमच्या करिता नाचणारी बाहुली नाही” यावरून राजनचा स्वभाव लक्षात येतोच.

हे सर्व असूनही राजन यांना जनतेतून तसेच राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय व्यासपिठातून नेहमी पाठींबा मिळत होता. अगदी तरूण वयात त्यांना चांगली पदे आणि पुरस्कार मिळाले. हे सर्व त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच

वाचा शरद पवार यांचा राजकीय प्रवास

आज खासरेवर बघूया रघुराम राजन विषयी काही अपरिचित गोष्टी…

International Monetary Fund (IMF) चे मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम पाहिणारे रघुराम राजन हे सर्वात तरूण व्यक्तिमत्व आहे. २००३ ते २००७ पर्यंत त्यांनी हे पद भूषविले आणि कामगिरीने गाजविले सुध्दा त्यावेळेस त्यांचे वय फक्त ४८ वर्ष होते.

२००५ मध्ये त्यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये त्यांनी जागतिक मंदीचा अंदाज बांधला होता. त्यावर त्यांना अमेरिकन अर्थतज्ञ Lawrence Summers यांनी खोटारडा (Luddite) असे म्हटले होते. परंतु २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीने रघुराम राजन यांचे सांगितलेले भविष्य खरे ठरले.

आरबीआय मध्ये गवर्नर पदाची सूत्रे हातात घेताच पहिल्याच दिवशी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत २.१ टक्क्यांनी वाढला होता. हे पहिल्यादा त्यांनी करून दाखविले. त्या अगोदर डॉलरच्या तुलनेत रुपया ६९ पर्यंत झपाट्याने घसरला होता.

महागाई रोखण्यासाठी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जात ग्राहक मुली निर्देशांक (Consumer Price Index) हि योजना अमलात आणली. त्यामुळे महागाई रोखण्याकरिता बरेच यश आले.

त्यांच्या कार्यकाळात दोन मोठ्या जागतिक बँके सोबत तसेच आणि अकरा पेमेंट बँकांना त्यांनी भारतात बँकिंगचा परवाना दिला त्यामुळे भारतातील दोन तृतीयांश लोकापर्यंत बँकिंगची व्यवस्था पोहचली.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आरबीआयनि ४० वर्ष परिपक्वता असलेले बॉंड विकली. मोबाईल टू मोबाईल पेमेंट हि सुध्दा संकल्पना रघुराम राजन यांचीच होती.

आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी परिषदेचे नेतृत्व केलेले आहे आणि कॉलेजमधील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना सुवर्ण पदकहि मिळाले होते. त्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथील आयआयएम येथे पुढील शिक्षण घेतले आणि Tata Administrive Services मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केले.

२०१०मध्ये त्यांनी बेस्टसेलर पुस्तक Fault Lines: How Hidden Fractures Still Threaten the World Economyप्रसिद्ध केले. Financial Times तर्फे त्यांच्या पुस्तकास “ Best Buisness Book Of The Year” हा किताब मिळाला.

२०१४ साली दिलेल्या भाषणात काळा पैसा भारतात आणण्याकरिता नोटबंदी हि प्रभावी उपाययोजना नाही म्हणून त्यावर ताषेरे ओढली होती. त्यांच्या मते हुशार लोक यांच्यावरही मार्ग काढतील असा अंदाज होता आणि तो खराही ठरला. भारतास नोटबंदी किती फटका देऊन गेली हे सर्व बघतच आहे. ह्या सर्व मतभेदामुळे रघुराम राजन यांनी आरबीआयला शेवटचा रामराम ठोकला.

ह्या सर्व कारणामुळे रघुराम राजनहे भारतीय अर्थशास्त्राचे जेम्स बॉंड आहेत…
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा राजकारणातील राजहंस विलासराव देशमुख यांचा राजकीय प्रवास

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *