मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय

छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्तानात पसरले होते. गुजरात , दिल्ली, ओरिसा, मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश अशा उत्तर हिंदुस्तानावर वर्चस्व मिळवलेल्या शाहूंनी आपल्या आजोबांप्रमाणे दक्षिण भारतातही छाप सोडली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक प्रांती मोठी सत्ता हस्तगत केली, पुढे औरंगजेबाविरुद्धच्या निर्णायक लढाईत याच कर्नाटक प्रांताने संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांना सहाय्य केले. जिंजी मोघलांच्या ताब्यात गेल्यानंतर काही काळ मराठ्यांचा या भागातील वावर कमी झाला.

मात्र १७०७ साली छत्रपती शाहू महाराज मराठ्यांच्या गादिवर आले. अल्पावधीतच त्यांनी अनेक लोक स्वराज्यात जोडून संपूर्ण हिंदुस्तानावर सत्ता प्रस्थापित करण्याचे मनसुबे आखले. अनेक बलाढ्य योद्ध्यांना स्वराज्य कमी रुजू करून उत्तर आणि दक्षिण भारतात मराठ्यांचा प्रभाव पडायला सुरुवात केली.
दक्षिण भारतातील त्रिची , मदुराई अर्कोत अशा प्रदेशात मराठे आपल्या अस्तीत्वाने नायक, नवाब , तसेच पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंच आणि ब्रिटीश लोकांना प्रभावित करत होतेच. मुख्यत्वे पोन्डेचेरी , पोर्तो नोवो (आताचे परंगपेत्ताई) येथील फ्रेंचांच्या संपन्न व्यापार पेठ म्हणजे मराठ्यांसाठी एक खजिना होता.
मराठ्यांचे मातब्बर सेनानी रघुजी भोसले दक्षिणेत असताना अनेक मोहिमा मराठ्यांनी आखल्या. मराठ्यांची दक्षिणेतील महत्वाची आणि अत्यंत यशस्वी मोहीम म्हणजे पोर्तो नोवो मोहीम. या मोहिमेचा पोन्डेचेरी च्या गवर्नर पदरी दुभाषा म्हणून काम करणाऱ्या आनंदरंगपिल्लई याने केलेली नोंद पुढीलप्रमाणे ,

मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय

Porto win

“ मंगळवार २७ डिसेंबर १७४० , हेरखात्याने सांगितल्याप्रमाणे ६ मराठे घोडेस्वारांची तुकडी कडलोर च्या पश्चिमेला नजरेस पडली. आपल्या सैनिकांची एक तुकडी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास पाठवली आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी ५० ते ६० मराठे घोडेस्वार बहोर गावच्या बाजूला दिसून आले , बंदुकीचे बार उडवल्यानंतर ते माघारी फिरले. परंतु बहोर आणि आसपासचा प्रदेश त्यांनी उध्वस्थ केला.
२८ ला सकाळी मराठे येत असल्याची खबर लागून लोक पोंडीचेरी कडे आश्रयाला येऊ लागले. मराठ्यांनी तेनाल मधली घरदारे लुटली. त्यांची फौज विल्लीनाल्लूर , ओळूकराई पर्यंत पोचली असून वाटेत भेटणाऱ्या सर्वाना लुटत आहेत. सकाळी 9 वाजता गवर्नर ने फौजेची एक तुकडी ओळूकराईला पाठवली . बरोबर मुत्तया पिल्लई आणि ५० स्थानिक सैनिकांची एक फळीही दिली.परंतु हे तिथे पोचण्याआधीच मराठे ओळूकराई मधून वळूदावूर कडे निघून गेले होते. पाठवलेली सैनिकांची तुकडी माग्ग पोन्डिचेरी ला माघारी परतली.

Porto Win

पोर्टो नोवो अर्थात आताचे परंगीपेत्ताई येथून आलेल्या पत्रात मराठ्यांचा असा उल्लेख येतो :- 24 डिसेंबर रोजी २००० मराठे तिरुअन्नमलै वरून त्रिचीकडे जाण्यासाठी निघाले. दक्षिणेकडे त्यागदुर्गमपर्यंत येऊन त्यांनी आपली दिशा पूर्वेकडे वृन्दाचालाम कडे वळवली. तिरुअन्नमलै ते वृन्दाचालाम हे अंतर ५० मैल आहे, मराठ्यांनी मारलेला दक्षिणेकडचा वळसा पकडून रात्री ६० मैलाचे अंतर कापून ते वृन्दाचालाम ला मुक्कामी पोचले. दुसर्या दिवशी सकाळी वृन्दाचालाम वरून मराठे निघाले आणि दुपारी पोर्टो नोवो ला पोचले. संपूर्ण ११० मैलाचे अन्तर मराठ्यांनी दीड दिवसात पूर्ण केले. मराठ्यांनी पोर्टो नोवो च्या पश्चिमेकडील २ मैलावर असलेले चित्रचावडी हस्तगत केल , लोकांना लुटले. याचवेळी नागपात्तानाम च्या डच वाखरीतून दोन स्वार पत्र घेऊन धाडले गेले. परंतु चित्रचावडीची दुरवस्था बघून ते सर्वांना चेतावणी देत माघारी फिरले. धास्तावलेल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्या सर्व मौल्यवान वस्तू बरोबर घेऊन पोर्टो नोवो वखारीमध्ये आश्रयाला यायला सुरुवात केली.

Chatrapati Shivaji Maharaj

वखारीमध्ये जागा संपली , मग लोकांनी आपला मोर्चा नदीपात्रात असलेल्या जहाजाकडे वळवला. ५०-६० लोकांची क्षमता असलेल्या जहाजात २०० लोक चढले आणि त्यामुळे जहाज किनार्यावरच अडकून पडली. ५ ते ६ जहाजात कापड होते. मराठ्यांची तुकडी संध्याकाळी नजरेत आली. २००० पैकी ५०० मराठे दक्षिणेकडून आणि ५०० उत्तेरेकडून नदीपात्राकडे निघाले. त्यामुळे सर्व जहाजे १००० मराठ्यांच्या वेढ्यात अडकली. जे लोक गाव सोडून गेले नाहीत त्यांना मराठ्यांनी संपूर्ण लुटले. लोकांना अंग झाकाण्यापुरात कापड देऊन बाकी सर्व लुटण्यात आल.
तिकडे जहाजांना वेध घातलेल्या मराठ्यांनी सर्वांना बाहेर काढले. लोकांजवळचे सर्वकाही लुटण्यात आले . मराठ्यांपासून संरक्षणासाठी काहींनी नदीपात्रात उद्या घेतल्या. ५०० घोडेस्वार त्यानंतर डच वखारीकडे वळले. वाखारीचे प्रवेशद्वार आधीच बंद केले होते. गावामध्ये थांबलेल्या १००० घोदेस्वरांपैकी ५०० उत्तरेकडून वखारीजवळ आले. मराठ्यांनी प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न चालू केला. शिडी लावून वखारीत घुसण्यात काही मराठे यशस्वी झाले. त्यांनी आतून प्रवेशद्वार उघडल्याने १००० मराठ्यांची तुकडी आतमध्ये आली.
मराठ्यांनी संपूर्ण वखार ताब्यात घेतली. इथेही लोकांना अंग झाकाण्यापुरते कापड देऊन सर्वांना बाहेर काढण्यात आल. काही लोकांना तलवारीच्या इजा झाल्या. गवर्नर अस्त्रूक , त्याची पत्नी, ३ मुली आणि ८ इतर डच लोकांना बंदी बनवलं गेल.मराठ्यांनी बंदी लोकांसमवेत किल्ला सोडला, काही महत्वाच्या व्यक्तींना हमाल बनवून त्यांची खिल्ली उडवली जात होती. संद्याकाळी ७ वाजता शहराबाहेर २ मैलांवर मराठ्यांनी आपली वस्ती केली. डच बंदी लोकांना दुसर्या दिवशी सकाळी ६० घोडेस्वारांच्या संरक्षणात माघारी किल्ल्यावर पाठवले गेले.
मराठ्यांनी वाखरीतून १००००० पगोडा आणि शहरातून ५०००० पगोडा एवढे प्रचंड लुट केली.”

मराठ्यांच्या दक्षिण मोहिमेतील हि एक प्रचंड पैसा मिळवून देणारी मोहीम ठरली.
पगोडा : पगोडा हे चलनाचे एकक होते, संपूर्ण किंवा अर्ध सोन वापरून हि नाणी बनवली जात. भारतीय राजान्बरोबरच इंग्रज, डच आणि फ्रेंच लोकांनी सुधा हे चलन वापरले आहे. पगोडा चे अनेक प्रकार असून विजयनगरच्या साम्राज्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. स्टार पगोडा हा सर्वात महाग असून त्याची अझ्या काळातील किंमत जवळ जवळ ६ पौंड किंवा ५५० रुपये एवढी आहे.
-अनिकेत यादव

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *