अपरीचीत रामदास आठवले: एक कवी, चित्रकार, Ex दलित पँथर…

गुगल उघडले व रामदास आठवले टाईप केल्याबरोबर आपल्या समोर येणारा सर्वात पहिला Result म्हणजे Ramdas Aathwale Poem, Funny Speech आणि काही रंगीबेरंगी कपड्यातील त्यांचे फोटो असे हे व्यक्तिमत्व सर्वाना परिचित आहे. रामदास आठवले हे शीघ्रकवी त्यांच्या ह्या स्वभावामुळे भारतातील कानाकोपऱ्यात हे नाव परिचयाचे झाले आहे. उदा. “देश मे चल रही है नरेंद्र मोडी कि आंधी, इसमे उडजायेंगे बडे बडे गांधी” अश्या त्यांच्या कवितावर हशा पिकतो. कवी आपलेच म्हणून अनेक मुल सोशल मिडीयावर कविता करतात आठवले स्टाईल मध्ये आणि त्यांचे नाव न वापरता कोणीही ओळखू शकतो कि हे स्टाईल एकाच माणसाची केंद्रीय मंत्री खा. रामदास बंडू आठवले…

आठवलेंचा जीवनपट

रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरविले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई काबाडकष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची खऱ्या अर्थाने तेथे जडणघडण झाली.

१९७२ मध्ये दलित पॅंथर्सची स्थापना झाली. दलित पँथरच्या स्थापनेत नामदेव ढासळ यांचा मोलाचा वाटा आहे. पॅंथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक मंडळी बरोबर होती. पॅंथर्समुळे जीवनाला कलाटणी मिळाली. पॅंथर्सचा झंझावात निर्माण केला.

रामदास आठवले यांच्या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. रामदास आठवले यांनी १९७१ साली मुंबई गाठली आणि त्यांचा हा प्रवास सुरु झाला. विद्यार्थी दशेपासून रामदास आठवले हे अन्याय, अत्याचाराविरोधात लढले. त्या काळी वडाळ्यातील सिदार्थ विहारमध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता येत असत. हे एकमेव वसतिगृह गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्याकरिता आंधार होते. इथेच अनेकांची जडणघडण झाली. इथे चर्चासत्र चालत, दलित चळवळीतील आणि अनेक पुरोगामी मान्यवर येथे येत असे. अनेकांची भाषणे ऐकण्याकरिता रामदास आठवले येथे नेहमी येत. त्यामुळे त्यांचा लोक संपर्क वाढत गेला आणि त्यांना इथेच वैचारिक पाठबळ मिळाले प्रा. अरुण कांबळे यांचे, आणि त्या नंतर रामदास आठवले दलित पॅंथर चळवळीत सक्रीय झाले. दलित पॅंथरचा प्रचाराकरिता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला.

जेथे जेथे दलित समाजावर अन्याय अत्याचार होत तिथे पॅंथर पोहचत असे त्या काळात दलित पॅंथर्सचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात वाढला होता. अन्यायाविरोधात पॅंथर्सच्या माध्यमांतून आम्ही आवाज बुलंद केला. आमच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रभर फिरताना दलित समजाबरोबरच त्यांना शेतकरी,शेतमजूर,भटक्या आणि फाटक्या माणसांच्या समजू लागल्या त्यांच्या दुखात ते सहभागी होत. त्यांना न्याय मिळविण्याकरिता झटत असे. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली. नामांतर चळवळीतही रामदास आठवले सहभागी झाले. जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला. संपूर्ण राज्यात वातावरण तापत होते.

दलित पँथर इतिहास नक्की वाचा ळवळ आणि पँथर काय होते समजेल

नामांतराचा हा लढा अनेक वर्ष सुरु राहिला. या लढ्यात सरकारशी अनेकदा संघर्ष झाला. अनेक दिग्गज नेत्यासोबत रामदास आठवले ह्या लढ्यात सक्रीय रित्या सहभागी होते. शेवटी यश आले मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना ऐतिहासिक निर्णय झाला. शरद पवार ह्यांना माणसाची पारख आहे हे सर्वाना माहिती आहे त्यांनी रामदास आठवले यांना राजकरणात सक्रीय केले आणि १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.

ते पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत.

खा. रामदास आठवले यांचे लग्न १६ मे १९९२ रोजी सीमा आठवले यांच्या सोबत झाले. त्यांना मुलगा जीत रामदास आठवले हा आहे. रिपब्लीकन पक्षाच्या महिला शाखेची त्या उत्तमरित्या धुरा सांभाळत आहे.

“ते महाराष्ट्रातील एकमेव दलित राजकारणी आहेत ज्यांनी दलित राजकारणातील घटकांची मोठी फौज कायम राखली आहे. ही त्याची ताकद आहे. याच गोष्टीमुळे आठवले स्वतःना किंग मेकर म्हणतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *