दारु विकणा-या आसुमलचा झाला आसाराम, वाचा बापू होण्‍यापर्यंतची संपूर्ण कथा…

आसाराम यांचे मूळ नाव आसुमल सिरुमलानी आहे. आसाराम यांनी चहा, दुधाच्या दुकानात नोकरी केली. वडिलांच्या निधनानंतर आसुमलवर लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी आली. आसुमल मेहसाणाच्या विजापूरमध्ये गेला. 1958-59 मध्ये आसुमल दंडाधिकारी कार्यालयाबाहेरील चहाच्या दुकानावर काम करू लागला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, 1959 मध्ये आसुमलसह नातेवाइकांवर दारूच्या नशेत हत्या केल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता. मात्र, पुराव्याअभावी आसुमल निदरेष मुक्त झाला. यानंतर अहमदाबादच्या सरदारनगर भागात त्यांचे वास्तव्य राहिले. २० ऑगस्ट २०१३ रोजी दाखल झालेल्या यौन उत्पीडन(बाल यौन शोषण पीडोफीलिया) प्रकरणात सध्या आसाराम जेलची हवा खात आहेत.

अहमदाबादमध्ये दारूचा व्यवसायही केला

सरदारनगर येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आसुमलने दारूचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांना चार सहकारी मिळाले. तीन-चार वर्षे दारूचा व्यवसाय केल्यानंतर आसुमलने हे काम सोडून दिले. यानंतर दूध विक्री केंद्रावर नोकरी केली. मात्र काही काळानंतर ते बेपत्ता झाले.

आश्रमाची स्थापना
29 जानेवारी 1972 रोजी साबरमती नदीकिनार्‍यावर एक झोपडी तयार केली. पुढे याचे रूपांतर आश्रमात झाले. आश्रमापासून अध्र्या कि.मी. अंतरावर स्त्री कल्याण केंद्र स्थापन केले.

राजू चांडकच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप :
डिसेंबर 2009 साबरमती आश्रमात राहणारे माजी सदस्य राजू चांडक यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे. आश्रमात तांत्रिक क्रिया केल्या जातात. आसाराम यांना महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतदेखील पाहण्यात आले. त्यानंतर आपल्यावर हल्ला झाला होता. आसाराम व अन्य दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

मोटेरा आश्रमात दोन मुलांची हत्या :
5 जुलै 2008 रोजी मोटेरा आश्रमातील दोन मुलांचे मृतदेह साबरमती नदीच्या किनार्‍यावर सापडले. 10 वर्षीय दीपेश वाघेला व 11 वर्षीय अभिषेक वाघेला हे चुलतभाऊ होते. सीआयडीने आश्रमातील सात साधकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

छिंदवाडा आश्रमातही दोन मृत्यू
31 जुलै 2008 छिंदवाडामधील परासिया मार्गावरील इंदुमती विद्यानिकेतनमध्ये दोन मुलांची हत्या झाली. रामकृष्ण यादव व वेदांत नावाच्या मुलांची होस्टेलच्या एका मुलाने हत्या केली.

सहा लोकांची सुपारी दिल्याचा आरोप
26 ऑगस्ट 2008 तांत्रिक बाबा सुखरामच्या आरोपानुसार आसाराम यांनी गुजरातच्या एका वृत्तपत्राच्या मालकासह 6 जणांना तंत्रविद्येने मारण्याची सुपारी दिली होती.

टीव्ही पत्रकाराला मारली थापड
26 एप्रिल 2012 यूपीच्या भदोही जिल्ह्यात आसाराम लाल दिव्याच्या कारमधून फिरत होते. टीव्ही पत्रकार फुटेज बनवत होते. त्या वेळी त्यांनी एका पत्रकाराला थापड मारली.

आश्रमात वीजचोरी, दंड झाला
17 मे 2012 छिंदवाडा येथील आश्रमात वीजचोरी करण्यात आली होती. वीज विभागाच्या अधिकार्‍यांनी आश्रमावर छापे टाकून विजेची चोरी पकडली. 1.70 लाखांचा दंड झाला होता.

मुलाच्या प्रेमिकेसोबत साधकाचा विवाह
22 एप्रिल 2010 एनआरआय ईश्वर नायक यांनी आश्रमाची चौकशी करणार्‍या आयोगाला सांगितले की, नारायण साईची प्रेमिका बिना यांच्यासोबत माझा मुलगा अनंग याचा बळजबरीने विवाह लावण्यात आला.

तरुणीला आश्रय : प्रकरणात अडकले
10 सप्टेंबर 2010 एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. एका अमेरिकन तरुणीची फसवणूक झाली आहे. तिला आश्रय हवा आहे, असे पत्रकाराने त्यात सांगितले. त्यावर आसाराम यांनी या तरुणीला आश्रमात राहण्यासाठी जागा दिली.

विनापरवानगी औषधी तयार करण्याचा आरोप :
10 डिसेंबर 2010 गोध्रा आश्रमात विनापरवानगी औषधी तयार करणे व विक्री करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्न व औषध विभागाच्या छाप्यात डोळ्यात टाकण्याच्या औषधीचे 36 नमुने खराब निघाले होते.

8000 कोटी रुपये एकूण अंदाजित मालमत्ता आहे. 17 हजार बाल संस्कार केंद्रे, 425 हून जास्त आश्रम जगभरात, 1300 योग वेदांत सेवा समित्या ,50 हून जास्त गुरुकुले देशात एवढा विस्तार आसरामचा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *