महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

कोयना हे धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरण 1956 ते 1962 या काळात वीजनिर्मितीसाठी उभारण्यात आले. कोयना धरणाचा जलसागर हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे. वीजनिर्मिती व सिंचन अशा दोन्ही महत्त्वपूर्ण गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्पाकडे पाहिले जाते. या धरणात 98.78 अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची साठवण होऊ शकते.

Koyana

काही वर्षांपूर्वी धरणाच्या दाराची उंची वाढवून मजबुतीकरणानंतर या पाणीसाठ्याची क्षमता 105.25 अब्ज घनफूट करण्यात आली आहे. रबल काँक्रीट या प्रकारात बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची 103.02 मी असून लांबी 807.72 मी आहे. तसंच पाणीसाठ्याची क्षमता 2797.4 दशलक्ष घनमीटर असून वापरण्यायोग्य क्षमता 2677.6 दशलक्ष घनमीटर आहे. कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे.

जाणून घेऊया कोयना धरणाविषयी अजून काही माहिती संक्षिप्त मध्ये:

दरवाजे-

Koyna doors

धरणाचे दरवाजे S आकाराचे असून त्यांची लांबी 88.71 मी. इतकी आहे.
कोयना धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत. या दरवाजांचा आकार हा 12.50 × 7.62 मी. आहे.

पाणीसाठा-

Koyana

धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2797.4 दशलक्ष घनमीटर असून त्यातील वापरण्यायोग्य क्षमता ही 2677.6 दशलक्ष घनमीटर आहे. धरणामध्ये एकूण 12100 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आहे. धरणामुळे जवळपास 98 गावे हे ओलिताखाली गेलेली आहेत.

वीज उत्पादन-

Koyana electricity production

टप्पा 1-
कोयना धरणातील पहिल्या टप्प्यातील जलप्रपाताची उंची 475 मी. आहे. या टप्यात 164 क्युमेक्स पाण्याचा जास्तीत जास्त विसर्ग केला जाऊ शकतो. या टप्प्यातील वीजनिर्मिती क्षमता 260 मेगा वॅट असून विद्युत जनित्र हे 4×65 मेगा वॅट आहे.

टप्पा 2-

कोयना धरणात दुसऱ्या टप्प्यातील जलप्रपाताची उंची 490 मी. आहे. या टप्यात 164 क्युमेक्स पाण्याचा जास्तीत जास्त विसर्ग केला जाऊ शकतो. या टप्प्यातील वीजनिर्मिती क्षमता 300 मेगा वॅट असून विद्युत जनित्र हे 4×75 मेगा वॅट आहे.

टप्पा 3-

कोयना धरणातील तिसऱ्या टप्प्यातील जलप्रपाताची उंची 496 मी. आहे. या टप्यात 260 क्युमेक्स पाण्याचा जास्तीत जास्त विसर्ग केला जाऊ शकतो. या टप्प्यातील वीजनिर्मिती क्षमता 1000 मेगा वॅट असून विद्युत जनित्र हे 4×250 मेगा वॅट आहे.

कोयना अभयारण्य

Koyana Abhayaranya

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. अभयारण्याचे याचे एकूण क्षेत्रफळ 426 चौ.किमी असून याला 1985 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जाही मिळावा म्हणून राज्य सरकार प्रयत्‍नशील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे. जंगल अतिशय घनदाट व दुर्गम असल्याने वन्यप्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे. हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे,तरस, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर तसेच रात्रीच्या वेळात रानससे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, ट्रेकर्सना येथे नेहमी अस्वल दृष्टीस पडते व आमनासामना होतो. वन्यप्राण्यांच्या भयापोटी पूर्वी बरेचसे ट्रेकर्स फटाके वाजवत फिरत, परंतु आता अभयारण्यात फटाके उडवण्यास बंदी आहे.

ही माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

जाणून घ्या आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल सर्व काही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *