लिज्जत पापड: फक्त ८० रुपये उधार घेऊन ७ महिलांनी सुरु केलेला उद्योग आज उलाढाल ३०० करोडची

९० च्या दशकात आजही तो टीव्हीवर येणारा पांढरा शुभ्र ससा जो दात मिचकावून म्हणतो होहोहो लिज्जत पापड, सर्वाना आठवतच असणार. लिज्जत पापड आज भारतातील गृह उद्योगातील एक नामांकित कंपनी आहे. लिज्जत एकमेव असा गृह उद्योग असणार ज्याची जाहिरात टीव्हीवर त्या काळात येत होती. कधी विचार केला का हा सर्व प्रवास कसा सुरु झाला असेल ? नाही ना तर चला बघूया लिज्जत पापडची संघर्षमी कहाणी खासरेवर..

हे सर्व सुरु झाले जवळपास ५८ वर्षा अगोदर झाला. जेव्हा फक्त ७ स्त्रियांनी ८० रुपये उधार घेऊन हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी कधीही कल्पना केली नाही कि त्यांचा व्यवसाय एवढा वाढणार आहे. जसवंती बेहन व त्यांच्या ६ साथीदार महिलांनी हा व्यवसाय १५ मार्च १९५९रोजी दक्षिण मुंबई येथील गिरगावमध्ये एका छोट्याश्या घरात सुरु केला. सध्या लिज्जत पापड देशातील ४३,००० महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. आणि संपूर्ण भारतात यांच्या विविध ८१ शाखा आहेत. आणि विशेष म्हणजे ८० रुपया पासून सुरु केलेला हा उद्योग आज ३०१ कोटी वार्षिक उलाढालपर्यंत पोहचला आहे.

जसवंती बेहन

जसवंती बेहन यांनी या उद्योगाचे नाव श्री महिला गृहउद्योग असे ठेवले.

सुरवातीला काम करणाऱ्या ७ महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत. जसवंतीबेन जमनादास पोपट , पार्वतीबेन रामदास ठोदानी , उजमबेन नरानदास कुण्डलिया , बानुबेन तन्ना , लागुबेन अमृतलाल गोकानी , जयाबेन विठलानी आणि अजून एक साथीदार ज्यांचे नाव आम्हाला कळले नाही. गुजराती महिला ह्या व्यवसायात कुशल आणि खाण्यापिण्याच्या वस्तू बनविण्यात सुगरण होत्या.

Servants of India Society चे अध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ते छगनलाल पारेख यांच्या कडून उद्योगाकरिता त्यांनी ८० रुपये उधार घेतले. या पासून त्यांनी तोट्यात गेलेल्या कंपनीकडून जुनी पापड बनवायची मशीन व काही साहित्य खरीदी केले. ह्या सर्व वस्तूपासून त्यांनी सुरवातील पापडाची ४ पैकेट तयार केली. आणि त्या काळातील सर्वपरिचित व्यापारी भुलेश्वर यांच्या मदतीने विक्रीस सुरु केली. छगनलाल पारेख त्यांचे ह्या कामात मार्गदर्शक होते.

सुरवातीस त्यांनी २ प्रकारची पापड बनविले एक उच्च प्रतीचे आणि दुसरे साधारण, छगनबापानि त्यांना सल्ला दिला कि क्वालिटी राहुद्या उच्च प्रतीचे पापड बनवा फक्त आणि त्या नुसार हे काम सुरु झाले. तीन महिन्यातच ७ वरून कामगाराची संख्या २५ पर्यंत गेली. काम करणाऱ्या महिला घरून भांडे, स्टोव इत्यादी साहित्य घरून सोबत आणायच्या. पहिल्या वर्षीच यांचे उत्पन्न ६१९६ रुपये एवढे झाले. तुटलेले पापड शेजाऱ्यांना मोफत वाटप करत असे. त्यामुळे शेजारीहि सहकार्य करत असे. पहिल्या पावसाळ्यात त्यांचा व्यवसाय ४ महिने ठप्प झाला. त्यामुळे त्यांनी या समस्येवर एक शक्कल लढवली. खाटीवर पापड ठेऊन त्याखाली स्टोवने पापड वाळविल्या जात असे.

तोंडी प्रचारानेच त्यांचे नाव सर्वीकडे पोहचले. वृत्तपत्रात त्यांच्या बातम्या झळकू लागल्या यामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. दुसर्या वर्षी यांच्या सोबत १०० ते १५० महिला जुळाल्यात आणि तिसर्या वर्षी हा आकडा ३०० पर्यंत पोहचला होता. जागा कमी पडू लागली त्यानंतर त्यांनी सहकारी महिलांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या पापडाचे वजन मोजून त्यांना पैसे देण्यात येत होते.

१९६२ साली त्यांनी आपल्या उत्पादनाचे नाव लिज्जत असे ठेवली लिज्जत म्हणजे गुजराती भाषेत स्वादिष्ट असा अर्थ होतो. हे नाव निवडायला सुध्दा स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि या स्पर्धेचे विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना ५ रुपये बक्षीस देण्यात आले होते. १९६२-६३ मध्ये त्यांची उलाढाल १ लाख ८२ हजारापर्यंत पोहचली होती. त्याच वर्षी Khadi Development and Village Industries Commission चे अध्यक्ष देवधर यांनी स्वतः लिज्जतची पाहणी केली आणि ८ लाख गुंतविण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर ७० च्या दशकात लिज्जत कडे चक्की, प्रिंटिंग डिवीज़न आणि पैकिंग डिसिशन इत्यादी मशीन खरेदी केल्यात. त्यांनी माचीस आणि अगरबत्ती करण्याचा व्यवसाय सुध्दा सुरु केला. ८०च्या दशकात लिज्जतनि प्रचाराकरिता विविध ठिकाणी भरणाऱ्या यात्रा आणि प्रदर्शनी मध्ये भाग घेण्यात सुरवात केली त्यामुळे त्यांचा प्रचार अधिक झाला. त्यानंतर टीव्ही आणि वृत्तपत्र इत्यादी जाहिरातीमध्येही लिज्जत दिसू लागली.

लिज्जत ने ९० च्या दशकात विदेशातही व्यवसाय विस्तारला आणि हि घोडदौड अजूनही सुरु आहे. २००२ मध्ये लिज्जतचा निव्वळ फायदा वार्षिक १० करोड रुपये होता. २००२ साली त्यांना Economics Times तर्फे बिझनेस वूमन ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला. १५ मार्च २००९ ला यांनी सुवर्ण महोत्सवी समारंभ ठेवला होता. तत्कालिन प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी आणि राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलामांनी सुध्दा त्यांचा सन्मान केला होता.

आज संपूर्ण भारतात लिज्जतच्या ८१ शाखा आहेत. ह्यामध्ये काम करणाऱ्या अधिकतम महिला गरजू,निरक्षर आहे ज्यांना त्या मदत करतात. इथे सर्व महिला एकमेकांना बेहन या नावाने संबोधतात. आता पापडा सोबतच अप्पालम, मसाला, गव्हाचे पीठ, चपाती, कपड्याची साबण, लिक्विड डिटर्जेंट इत्यादी उत्पादने तयार करतात.

आज लिज्जतचे यश सर्वांना प्रेरणादायी आहेत. हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या दोन शेतकरी महिला..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *