दैनदिन जीवनातील या सवयी शरीरास हानिकारक आहेत…

प्रत्येक जण आजच्या काळात काही हानिकारक सवयींनी ग्रासलेला आहे. या हानिकारक सवयी सोडणे थोडं कठीणच असते. या अशा सवयींना आपण सहसा चांगलं समजत असतो पण त्या खरे पाहता शरीरासाठी खूप हानिकारक असतात, अन अशा सवयीपासून सुटका होणे ही तितकेच कठीण असते.

आज आम्ही खासरे वर आपणास अशाच काही आपल्या दैनंदिन जीवनात क्षणिक आनंद देणाऱ्या पण शरीरासाठी हानिकारक असणाऱ्या 8 सवयींची माहिती देत आहोत.

शिंक आल्यास स्वतःला शिंकण्यापासून रोखणे-

sneezing

बरेच वेळा आपण शिंक रोखण्यासाठी आपले तोंड व नाक बंद ठेवण्याचा प्रयत्न करतो पण या मुळे आपल्या अंतःक्रांती मधील दाब अधिक वाढू शकतो. यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह विस्कळीत होऊ शकतो आणि आपल्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू ही संकुचित होतात.यामुळे डोकेदुखी, रक्तवाहिन्या डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे कधीही स्वतःला शिंकण्यापासून थांबवु नका.

परफ्युम वापरणे-

Perfume

आजकाल प्रत्येकजण हा विविध प्रकारचे परफ्युम वापरत असतो. हे सुगंधी परफ्यूम बनवण्यासाठी अनेक कृत्रिम पदार्थ वापरले जातात जे की नैसर्गिक तेलापेक्षाही स्वस्त असतात. या पदार्थामुळे आपणास चक्कर येणे, मळमळ होणे इत्यादी आजारास सामोरे जावं लागू शकते. असे परफ्युम आपल्या घास आणि त्वचेलाही इजा पोहचवू शकतात. या प्रकारचे परफ्युम वापरण्यापेक्षा चांगले तेल वापरलेले कधी ही फायद्याचे ठरू शकते. आपण परफ्युम वापरातच असाल तर तो एक चांगल्या मोकळी हवा असणाऱ्या खोलीमध्ये वापरा.

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे-

Mobile

मोबाईल ही प्रत्येकासाठी एक गरजेची वस्तू बनली आहे. प्रत्येक जण हा रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर आपला मोबाईल चाळत असतो. पण मोबाईल च्या कृत्रिम प्रकाशामुळे आपल्या शरीरात तयार होणारे मेलाटॉनीन हार्मोन तयार होण्याचे प्रमाण कमी होते. कमी मेलाटॉनीनमुळे उदासीनता,कर्करोग, लठ्ठपणा आणि नाजूक रोगप्रतिकारक क्षमता अशा बाबींना सामोरं जावं लागू शकते.त्यामुळे आरोग्य स्वास्थ्य टिकविण्यासाठी लवकर झोपणे हा एक योग्य पर्याय आहे.

प्लास्टिक च्या कंटेनर मध्ये अन्न साठवणे-

Plastic storage

बऱ्याच प्लास्टिक च्या बॉक्स मध्ये प्लेटलेट आणि बिस्फेनोल साळे कृत्रिम रासायनिक पदार्थ असतात, जे प्लास्टिक ची लवचीकता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. हे पदार्थ बॉक्समध्ये ठेवलेल्या अन्नामध्ये ही मिसळू शकतात. आपल्या शरीरातील अंतःस्रावी प्रणालीवर हे पदार्थ परिणाम करू शकतात. त्यामुळे काच,स्टेनलेस स्टील किंवा सिरॅमिक पासून बनवलेल्या कंटेनरमध्येच अन्न ठेवणे कधीही आरोग्यासाठी हितकारक आहे.

जेवणानंतर लगेच दात घासणे-

Brushing teeth

डेंटिस्ट नेहमी सल्ला देतात की जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी दात घासले नाही पाहिजेत. शक्य असेल तर एक तासानंतर घासणे कधीही चांगले आहे. बरेच अन्न आणि पेय हे ऍसिडिक असतात त्यामुळे आपले दात व त्या खाली असणाऱ्या एक लेअर वर प्रभावित होऊ शकतात. ब्रशमुळे हे ऍसिड दातांच्या मध्ये खोलवर त्या नाजूक थरापर्यंत पोहचू शकते. यामुळे सेन्सिटिव्हिटी व दातास धोका संभवतो.

अँटिबॅक्टेरियल साबण वापरणे-

Soap

बऱ्याच प्रमाणात उपयुक्त जिवाणू आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर राहतात, जे की आपल्या शरीराचे रक्षण करण्यामागे एक भूमिका बजावत असतात. आपण बरेचदा अँटिबॅक्टेरियल साबण वापरतो त्यामुळे आपल्या शरीरात धोकादायक बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आठवड्यातून किमान 2 दिवस अँटिबॅक्टेरियल साबण वापरणे टाळावे.

घट्ट जीन्स घालणे-

Fit jeans

घट्ट जीन्स घालणे हा एक फॅशन चा भाग बनले आहे पण घट्ट जीन्स घातल्यामुळे स्किन आणि मज्जातंतू वर नेहमी दबाव राहतो. यामुळे मज्जासंस्था मध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. घट्ट जीन्स घातल्यामुळे माणूस नेहमी नर्व्हस ही राहू शकतो. आपल्या पायांमध्ये हवा व्यवस्थित न पोहोचल्याने आपले पाय कमजोर होण्याचा धोका संभवतो.

नेमकेच बनवलेले ताजे ज्यूस पिणे-

Fresh juice

जास्त लोकांना माहिती नसते की नेमकेच बनवलेला कोणताही रस हा शरीरासाठी चांगला नसतो. थोड्या फार प्रमाणात हा रस पिणे चालून जाते. पण जास्त प्रमाणात ताजा रस पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेह आणि लठ्ठ व्यक्तींना तर हे रस पिणे अत्यंत धोकादायक आहे.

या सर्व गोष्टींचा तुम्ही त्याग केला तर एक उत्तम निरोगी आयुष्य जगू शकता. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *