१५ वर्षाचा मुलगा संपत्ती एवढी कि घरी पाळतो वाघ, सिंह…बघा आहे कोण हा मुलगा?

सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे वाघ सिंह पाळणारा दिसायला अगदी सर्वसामान्य मुलासारखा असणारा हा मुलगा. तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटमुळे चर्चेत आला. तो वाघ, सिंहासोबत खेळतानाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर करत असतो. सुप्रसिद्ध कलाकार व खेळाडूंचीही नेहमी त्याच्या अवतीभोवती मांदियाळी असते. त्यामुळे या मुलाबद्दल जाणून घेण्याचं अनेकांमध्ये कुतूहल आहे. दुबईमधील अब्जाधीश व्यावसायिक सैफ अहमद यांचा तो मुलगा आहे.

त्याचं नाव रशीद बेल्हसा असून, तो १५ वर्षाचा आहे. त्याला दुबईत ‘मनी किक्स’ म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या आलिशान लाइफस्टाइलमुळे तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. रशीदच्या वडिलांकडे २ डॉलर्सपेक्षा जास्त संपती आहे. एक अब्जाधीश घरात जन्माला येऊनही रशिदला स्वताच वेगळं स्थान निर्माण करण्यात जास्त विश्वास आहे.

कसे कमावतो रशीद एवढे पैसे?

Rashid Belhasa

महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि वाघ, सिंह पाळण्याची रशीदला हौस आहे. यो अवघ्या वयाच्या 15 व्या वर्षीच अब्जाधीश आहे. रशीदचं स्वतःच ऑनलाईन स्टोअर आहे. स्निकर आणि बॅगची विक्री तो करतो. यातून तो महिन्याला कोट्यवधी रुपये कमावतो.

रशीदला आहे वाघ आणि सिंह पाळण्याची हौस-

Rashid with tiger

रशीदला वाघ आणि सिंह पाळण्याची प्रचंड हौस आहे. त्याच्या स्वतःच्या फार्महाऊस वर त्याने बरेच वाघ आणि सिंह पाळलेले आहेत. यासाठी त्याची एक व वेगळी ओळख दुबईमध्ये बनलेली आहे.

रशीद आहे महागड्या गाड्यांचा शौकीन-

Rashid's Brand Cars

रशीद हा महागड्या गाड्यांचा खूप शौकिन आहे. त्याच्याकडे फेरारी, बेंटले, एझदी सारख्या आलिशान गाड्या आहेत. काही दिवसांपूर्वी आपली कोट्यवधी किंमतीची फेरारी त्याने लुई व्हिटॉन च्या प्रिंटने सजवली होती. सलमान खान त्याच्या फरारी गाडीच्या प्रेमात पडलेला आहे. रशीदच्या कुटुंबाकडेही रॉल्स रॉयस, मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्या आहेत.

रशीदच्या अवतीभोवती नेहमी असते कलाकारांची मांदियाळी-

Rashid with Salman Khan

रशीदला सेलेब्रिटीचं आदरातिथ्य करायला फार आवडते. त्याचं एक फार्म हाऊसदेखील आहे. त्याच्या या फार्महाऊस वर दरवर्षी अनेक सेलेब्रिटी येत असल्याचे रशीद ने सांगितले. सलमान खान,शाहरुख खान, शिल्पा शेट्टीपासून ते जॅकी चॅन ,लिओनल मेस्सी, विझ खलीफापर्यंत अनेक मोठ्या सेलेब्रिटी, खेळाडूंची मांदियाळी त्याच्या अवतीभवती असते.

त्याच्या एकंदर आलिशान लाइफस्टाइलमुळे प्रभावित होऊन एका चॉकलेट बारने त्यांच्याकडील सर्वात महागड्या मिल्कशेकला त्याचं नाव देखील दिले आहे.

माहिती अवडल्यास शेअर करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *