वजन कमी करायचे नो टेन्शन, वापरा या काही खास निंजा टेक्निक.

आपण नेहमी वाचत असतो की एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपटासाठी अगदी काही दिवसात अनेक किलो वजन कमी केले. गेल्या काही दिवसात तर अशा बातम्या फारच बघायला मिळाल्या. यातला झटपट वजन कमी करण्याचा भाग अधिक आकर्षक असतो. कमी काळात खूप वजन कमी करणे अयोग्यच आहे.

आपण जसा जसा व्यायाम करायला लागतो तशा काही गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात.

व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.

जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल बर्न होत असल्याची शक्यता जास्त असते. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.

आपण सुरुवातीला जिमला नियमितपणे आनंदाने जातो पण थोडे दिवस उलटल्यावर आपणास जिम ला जायचा कंटाळा येतो. आपल्या आळशीपणामुळे आपन जिममध्ये सातत्य राखण्यास अपयशी ठरतो.

अशा आळशी लोकांसाठी आज आपण जाणून घेऊया वजन कमी करण्याचा काही निंजा टेक्निक:

Fit body
Fit waist

नो इलेक्ट्रॉनिक्स-

आज काल आपल्यापैकी प्रत्येकाला झोपण्यापूर्वी निरंतर फोन चेक करायची सवय असते किंवा रात्री शो बघण्याची किंवा नेट सर्फिंग करण्याची सवय असते. प्रथमतः आपण आपल्या सवयी पूर्णपणे बंद कराव्यात. कारण यातून निघणाऱ्या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाईट्स आपल्या बॉडीचे चयापचय क्रिया कमी होते. याने आपल्या मेटाबॉलिझम मध्ये नादात होतो म्हणून इलेक्ट्रॉनिक्स चा वापर बंद ठेवा.

नो दारू-

चयापचय क्रिया हा आपल्या शरीरातील महत्वाची क्रिया आहे. दारू पिणारे व्यक्ती सहसा रात्री दारू पिणे पसंत करतात. यामुळे चयापचय क्रिया कमी होते. म्हणून दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींनी रात्री झोपण्याच्या किमान 3 तास अगोदर दारूचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होतात.

नो हेव्ही फूड-

रात्री मसालेदार आणि भरपूर आहार घेणे सहसा टाळावे. कारण शरीराला ते पचवण्यासाठी जड जातं, याने चयापचय क्रिया कमी होते. झोपण्यापूर्वी जेवण पचले नाही तर त्याचे फॅट्स मध्ये रूपांतर होते.

नो लाईट-

रात्री चांगली झोप लागणे ही महत्वाचे आहे. त्यासाठी रात्री झोपताना पुर्णपणे अंधारात झोपणे पसंत करा. पूर्णपणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करू शकते. याने फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते.

कुलिंग-

थंड वातावरणात झोपणे हे फॅट्स बर्न करण्यासाठी अधिक फायद्याचे ठरते. करण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे कुलिंगमध्ये झोपणारे 7% जलद गतीने कॅलरीज बर्न करू शकतात.

झोपण्याची वेळ-

आपल्या झोपेची वेळ निश्चित करा. कमी जास्त प्रमाणात झोप घेणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. कमी झोप घेणाऱ्यांचं वजन देखील जलद गतीने वाढते. म्हणून किमान 6-7 तास झोप घेणे आवश्यक आहे.

तर या आहेत वजन कमी करण्याच्या काही निंजा टेक्निक. ही माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *