हजारो स्त्रियांना स्वयंरोजगार देणाऱ्या दोन महाराष्ट्रीयन शेतकरी महिला…

या आधी ह्या दोघी एकमेकांना कधीच भेटल्या नव्हत्या पण,त्यांचा संघर्षमयी प्रवास सारखाच आहे. या दोघींही इतर महिलांना आता स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करतात. गोदावरी डांगे ह्या १५ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत, आणि मुले लहान असतानाच त्यांच्या पतीचा एका अपघातात मृत्यू झाला.

वर्षभर त्यांना भविष्याची चिंता सतावत होती. त्या फक्त ७ वी पर्यंत शिकल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा टिकाव कुठही लागू शकत नव्हता. गोदावरीप्रमाणेच, कमल कुंभार ह्या फक्त घरगुती कामे करण्यापुरतेच मर्यादित होत्या. दिवस जात होते परंतु त्यांच्या मनात नेहमी विचार येत होता, आपलं सगळं आयुष्य शेतमजुरी करूनच जाणार.

या दोघी अगोदर कधीही भेटल्या नव्हत्या, त्या दोघींचा हा संघर्ष प्रवास सोबतच होईल याची त्यांना कल्पना सुद्दा आली नसेल. गोदावरी ही महाराष्ट्राच्या अति दुष्काळी भागात राहते. तिथे त्यांचे स्वयं शिक्षण प्रयोग (SSP) द्वारे महिला स्वयं-मदत केंद्र आहे, तिथे त्यांना आयुष्यच बदलविण्याचं प्रशिक्षण मिळालं. इतर स्त्रियांबरोबर सतत संवाद साधून, गोदावरी याना समजतील समस्यांची ओळख झाली.

त्यांनी वकृत्व,शेती ,आणि नेतृत्व गुण संपादन केले त्याच बरोबर त्यांनी महिलांना संघटित करण्याचे सुद्दा काम केले, नुसते संघटित केले नाहीतर त्यांना घेऊन आरोग्य, कुपोषण,आणि दैनंदिन आरोग्य यासाठी त्यांनी आंदोलने सुद्दा केलीत.

गोदावरीने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्या कसा असतो याचे वर्णन केले, त्यांनी लोकांना जनावरासारखे मरताना बघितले, त्यांना खाण्यासाठी काही नसायचे आणि त्यानां स्वतःला टिकवून ठेवण्याचा कोणताही मार्ग नसायचा. २०१२ ते २०१५ या कालावधीत मराठवाडा विभागात तीव्र दुष्काळ पडला होता. गोदावरी यांनी हजारो शेतकरी महिलांना एकत्र करून भाजीपाला आणि धान्य पीक घेऊन,गावातील धान्याची कमतरता भरून काढली. एका वर्षाआधी त्यांनी महिलांची आर्थिक स्थिती आणि नेतृत्व गुण वाढविण्यासाठी पहिली महिला फेडरेशन स्थापन केली. आज या फेडरेशन मध्ये ५००० महिला सदस्य कार्यरत आहे.

दुसरीकडे कमलने बांगड्या विक्री करण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला.त्यांनी हरित ऊर्जा आणि SSP चे हवामान संबंधी कार्यात सामील होऊन आपले जीवन बदलले. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या शेतीत एक स्वच्छ ऊर्जा व्यवसाय सुरू केला, यामध्ये त्यांना यश आल्यानंतर १ ते ५ एकरपर्यंत जागा वाढविण्याची गरज पडली.

तते फक्त इथेच थांबल्या माहूत तर त्यांनी आता अनेक कृषि संबधीत आणि सौर उर्जेचा व्यवसाय सुध्दा सुरू केला आणि त्यामुळे सौर-ऊर्जा उपकरणांसह ३००० पेक्षा जास्त घरांना वीज मिळाली. आज ही ३७ वर्षीय ही महिला ५००० महिलांना मार्गदर्शन करून त्यांचा छोटा व्यवसाय चालवण्यास मदत करते.
या दोन्ही शेतकरी महिलांनी स्वयं शिक्षण प्रयोगाच्या मदती द्वारे आज हजारो महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन करतात.

इक्वेटर पुरस्कार मिळवणारी एसएसपी ही भारतातील एकमेव संघटना आहे. विविध देशांतील १५ अन्य विजेत्यांना सुद्दा पुरस्कार मिळाला त्यात गोदावरी आणि कमल यांना पुरस्कार मिळाला व त्यांना न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पाठविले.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गोदावरी म्हणाल्या की, “हा खूप मोठा पुरस्कार आहे आणि मला खूप आनंद होत आहे की आम्ही दुष्काळग्रस्त भागात शेती करण्यास सक्षम झालो आहे. जे काही आपण करू शकलो ते सर्व स्त्रियांमुळेे त्यांच्या संघटने मुळे शक्य झाले.”

ह्या दोन्ही भगिनींना खासरे तर्फे सलाम…

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *