भूमिहीन शेतकऱ्याच्या मुलाने उभारले 3300 कोटीचे साम्राज्य, वाचा त्याची प्रेरणादायी गोष्ट

1959 साली तामिळनाडू च्या कोईमतूर शहराबाहेर असलेल्या एका खेडे गावात भूमीहीन शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या 4 भवांपैकी एक होते आरोकीयस्वामी वेलूमणी. त्यांच्या आईने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतलेली होती. त्यांनी 2 म्हशी घेऊन त्याच्या दूध विक्रीतुन मिळणाऱ्या पैशाने 10 वर्ष कुटुंबाची देखभाल केली.

शिक्षणाची तोडकी व्यवस्था असणाऱ्या खेडेगावात वाढल्यानंतर त्यांनी उत्तम पायाभूत सुविधा शोधण्यासाठी गावाच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी तरुण मुलं हे कॉलेज ला फक्त चांगली पत्नी मिळावी या हेतूने जात असत. त्या काळात पदवीधर असलेल्या मुलांनाच चांगली पत्नी मिळण्याची आशा असायची.

Veluswami

वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी बी एस सी ची डिग्री पूर्ण केली, पण त्यांना त्यातून चांगली नोकरी मिळू शकली नाही. नंतर योगायोगाने त्यांना कोईमतूर येथील जेमिनी कॅप्सूल या छोट्या फार्मासुटीकल कंपनीमध्ये दरमहा 150 रुपये ची नोकरी मिळाली. त्यांना आठवणीने सांगतात की त्याम कसे स्वतःसाठी50 रुपये ठेवले व बाकीचे आई वडिलांसाठी पाठवले. 4 वर्षे नोकरी केल्यानंतर भाभा अनुसंधान केंद्र ला जॉईन करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

ते सांगतात की, ‘माझे आई-वडील हे खूप गरीब होते. माझ्यासाठी ते एक साधी चप्पल व पॅन्ट ही खरेदी करू शकत नव्हते. मी पिरॅमिड च्या खालच्या जन्मास आलो होतो. आज जे ही आहे ते माझ्यासाठी असल्या होते. पण मी माझ्या जिद्दीने व चिकाटीने जिथे पोहचलो आहे ते सर्व पिरॅमिड च्या टॉप ला आहे.’

नंतर त्यांनी लवकरच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी असलेल्या सुमती यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी थायरॉईड बायोकेमिस्ट्री या विषयात पीएचडी चा अभ्यासाला सुरवात केली व थायरोकेअर मध्ये 2 लाखाची गुंतवणूक केली. आज त्यांचे एक भाऊ या कंपनीचे CFO म्हणून काम बघतात. त्यांच्या पत्नी, ज्यांना ते खूप मोठा आधार मानायचे त्या त्यांच्या व्यवसायाच्या HR डिपार्टमेंट सांभाळत असत.

मे 2016 मध्ये त्यांच्या कंपनीने 3377 कोटी मूल्याकंनासह भारतीय बाजारपेठेत आपले पाऊल ठेवले. आज कंपनीचे त्यांच्याकडे 64 टक्के शेअर्स आहेत. ज्याची किंमत 323 दशलक्ष डॉलर्स च्या घरात आहे.

Office

कंपनीने जगातील सर्वात मोठी थायरॉईड कंपनी असल्याचा दावा केला आहे. कंपनीचे भारत , नेपाळ, बांगलादेश सह मध्ये पूर्व मध्येही आऊटलेट्स आहेत. कंपनीचे आरोग्य निदान प्रयोगशाळेचे नेटवर्क ही भारतातील सर्वात मोठ्या नेटवर्क पैकी एक आहे. ज्यामध्ये जवळपास 9 दशलक्ष नमुन्यांवर प्रक्रिया केली जाते व 30 कोटींपेक्षा जास्त वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात.

आपणास ही माहिती आवडल्यास शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *