रायगडाचा शिवकालीन इतिहास जिवंत ठेवणाऱ्या बोरूविषयी संपूर्ण माहिती..

आपण आजवर रायगडावर अनेक भग्न अवस्थेतील व उत्तम स्थितीतील अवशेष पाहिले व इतिहास समजून घेतला.. आम्ही आपणांस रायगड संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून आज गडावरच्या अश्या एका गोष्टीची माहिती देणार आहोत जीच्यामुळे इतिहास आपल्यापुढे आला.

आजच्या विशेष लेखात आपण रायगडावरील बोरू वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. बोरु या बांबुसदृश (बांबु नाही) वनस्पतीचा वापर लिखाणासाठी हजारो वर्षांपासून होत आला आहे. ईजिप्शियन संस्कृतीत देखील याचा वापर केला गेला.

बोरूचा इतिहास पूर्वी पपायरस, ताडपत्र, भूर्जपत्र आणि हल्ली कागदावर लिहिण्यासाठी बोरुचा वापर केला गेला. वैज्ञानिक जगात बोरुच नाव अरुंडो डोनाक्स (arundo donax) असे आहे.

भारतातही बोरुला हजारोवर्षांचा इतिहास आहे. देवगिरीच्या यादवांचे मुख्यप्रधान हेमाडपंत यांनी मोडी भाषा लिखाणासाठी प्रसार व प्रचार केला त्यावेळी देखील बोरूचा वापर प्रामुख्याने केला गेला. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी लिखाणासाठी बोरूचाच वापर केला. म्हणजेच यादवकाळात, शिवकाळात आणि अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत बोरुचा वापर होत असे. पुढे मुद्रणकला अवगत झाल्यावर बोरुचा वापर कमी झाला.

आता आपण रायगडावरचा बोरु पाहू. होय रायगडावर अशाच अपरिचित ठिकाणी आज शेकडो वर्षे झाली बोरू वाढतोय.
किल्ले रायगड ही स्वराज्याची राजधानी. यासाठी लागणाऱ्या गोष्टीचा अभ्यास करताना आणि रायगडावरील झाडे झुडपे याची माहिती घेत असताना काही महत्वाच्या गोष्टी दिसून आल्या.

गडावर बोरूचे ठिकाण किल्ले रायगडावरती भवानीटोक या भागत आपण नीट बघितले असता आपल्याला बारीक बांबूची छाती एवढी वाढलेली झाडे दिसतात. ती बोरुची झाडे आहेत .जाडीला ५ ते ८ मिली मीटर एवढा आणि उंचीला ४ ते ६ फुट एवढा या बांबूचा वापर त्याचे छोटे छोटे तिरके टोकदार तुकडे करुन शाई मधे बुडवून लिखाणासाठी पेन सारखा करत असे. असा हा बोरू किल्ल्यावर आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसेल.

रायगडावरील लिखाण साहित्याचा नोंदी किल्ले रायगड येथे पत्रलेखन जमाखर्च यासाठी लागणाऱ्या कागदाची आणि इतर वस्तुंची यादी आणि त्यासाठी खर्च होत असलेली रक्कम. इ.स १७९५ ते १७९६ मधे ७० रु खर्च दफ्तरासाठी झाला , इ.स १८१३ ते १४ मधे दफ्तर खर्च ५० रु झाला.
दप्तर खर्चात जास्त करुण कागद असे , या काळात रायगडावर दरसाल ८ गडया कागद लागत असे . त्या व्यतिरिक्त खादीचे रुमाल , डिंक, सूत, शाई या वस्तुंची खरेदी दप्तरखर्चातुन होत असे. इ.स १८१३ ते १८१४ मधे ८ कागदाच्या गड्यानसाठी ४५ रु खर्च झाले आणि बाकीच्या माला साठी ५ रु खर्च झाले. (वरील सर्व माहिती पेशवेदप्तर रुमाल नं.८१,९१ मधून घेतली आहे )

रायगड संवर्धन मोहीमेने या बोरुचे रायगडावरुन काही कलम पुण्यात आणून त्याची लागवड मोहिमेच्या सदस्या *चैत्राली रांजणे* यांच्याकडे केली आहे. हा बोरु मोड़ी लिपीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तिंना भेट म्हणून ही दिला गेला तसेच कैलीग्राफी करणारे मित्र परिवारासही किल्ले रायगडा वरील बोरू दिला आहे.

अश्या वेगळ्या पद्धतीने मोहीम आपला वारसा जतन , संवर्धन करीत आहे.
मोहीम संपर्क क्र-: 8007464599

फेसबुक पेज लिंक रायगड संवर्धन मोहीम

हि माहिती अवश्य शेअर करा आणि इतिहासाचा बहुमुल्य ठेवा सर्वापर्यंत पोहचवा… आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका..

वाचा कविभूषण यांनी लिहलेल्या शिवरायांवरील इंद्रजिमी जंभ पर काव्याचा अर्थ

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *