संपूर्ण पाकिस्तानी सैन्यावर भारी पडला हा भारतीय गुप्तहेर..

आपल्या देशासाठी शत्रूच्या देशात जाऊन हेरगिरी करणे खूप अवघड काम आहे. एकीकडे त्याच्या मानेवर टांगती तलवार असते तर दुसरीकडे जर देशाची सेवा करत असताना पडल्या गेले तर आपल्या देशाचे सरकार हात झटकून टाकते, त्यांना कुठल्याच प्रकारची मदत करत नाही. आणि शेवटी त्यांचा शत्रूच्या देशात असताना मृत्यू होतो तेव्हा त्यांना आपल्या देशाची माती सुद्धा नशीब होत नाही.

आज अशीच एक सत्य घटना आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत,तो पाकिस्तानात जाऊन तिथल्या सैन्यात भरती होऊन, मेजर पदापर्यंत पोचला होता, पण जेव्हा तो पकडला गेला तेव्हा आपल्या देशाने त्याची कुठल्याही प्रकारे मदत केली नाही, एवढंच नाही तर त्याचा मृतदेह घेण्यास सुद्धा नकार दिला. चला बघूया खासरे वर ही गोष्ट भारतीय रॉ एजेंट “रवींद्र कौशिक ” उर्फ “ब्लॅक टायगर”..

राजस्थान मध्ये गंगानगर इथे राहणाऱ्या रवींद्र कौशिक यांचा जन्म ११ एप्रिल १९५२ साली झाला. लहानपणा पासून त्यांना रंगमंचावरील कलाकार बनण्याची इच्छा होती,म्ह्णून ते मोठे झाल्यावर कलाकार झाले.पण एकदा लखनऊ येथे प्रयोग सादरीकरणासाठी गेले असताना रॉ एजन्सीच्या अधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली,त्यांना त्यांच्यात हेर बनण्याचे गुण दिसले. रॉ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे पाकिस्तानात जाऊन हेरगिरी करण्याचा प्रस्ताव ठेवला,आणि तो त्यांनी स्वीकार केला.

रॉ मध्ये त्यांची ट्रेंनिंग सुरू झाली.पाकिस्तानात जाण्याअगोदर त्यांनी दिल्ली येथे २ वर्ष ट्रेंनिंग चालू राहिली. ट्रेंनिंग संपल्यावर २३ वर्षांच्या रवींद्र ला पाकिस्तानात पाठविले गेले. पाकिस्तानात गेल्यावर त्यांचं नाव बदलून नवी अहमद शाकिर अस ठेवण्यात आलं. रवींद्र नि पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारलं आणि तिथल्या विद्यापीठात ऍडमिशन घेऊन वकिली मध्ये पदवी घेतली.

शिक्षण संपल्यावर त्यांनी पाकिस्तानी सैन्यात भरती होऊन मेजर या पदापर्यंत पोहचले. या दरम्यान आर्मी अधिकाऱ्याची मुलगी अमानत हिच्याशी लग्न करून एक मुलीचा बाप झाला. रवींद्र कौशिक ने १९७९ ते १९८३ पर्यंत पाकिस्तानी सैन्य व सरकारची महत्वाची माहिती भारताला पाठविली.रॉ ने त्याच्या कामामुळे त्याला “ब्लॅक टायगर” ही पदवी दिली. पण १९८३ साली रवींद्रला भेटण्यासाठी रॉ एजेंट ला पाकिस्तानात पाठवण्यात आले, पण तो एजेंट पाकिस्तानी सिक्रेट एजेंशी च्या हाती सापडला गेला, आणि बऱ्याच यातना भोगल्या नंतर त्याने रवींद्र विषयी सगळ्या गोष्टी सांगितल्या.

मृत्यूच्या भीतीने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण भारत सरकारने त्यांना परत आणण्यास कुठलीही सहानुभूती दाखविली. रवींद्र ला अटक करून सियालकोट येथील तुरुंगात पाठविण्यात आले.१९८५ मध्ये त्यांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली, पण नंतर जन्मठेप करण्यात आली. मियावाली तुरुंगात १६ वर्षे कैदेत राहिल्यानंतर २००१ साली त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्यांचा मृतदेह सुद्धा घेण्यास नकार दिला.

भारत सरकारने त्यांच्या संबंधित सर्व माहिती नष्ट केली आणि रॉ ला याबाबतीत चूप राहण्यास सांगण्यात आले. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते. रवींद्र ने तुरुंगात असताना त्यांनी आपल्या परिवाला बरेच पत्र लिहले. त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाऱ्या गोष्टी त्या पत्रात सांगितल्या. एका पत्रात त्यांनी आपल्या वडिलांना विचारल की,भारतासारख्या मोठ्या देशात भारतासाठी बलिदान देणाऱ्याला ह्याच गोष्टी मिळतात का?

आपण बघितलेला एक था टायगर हा सिनेमा त्याच्या आयुष्यातील काही प्रसंगावर आधारित आहे. हि पोस्ट शेअर करा व काळाच्या पडद्याआड गेलेल्या खऱ्या हिरोची माहिती स्र्वापार्यंत पोहचवा..
आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा विक्रम बत्रा भारतीय सैन्याचा शेरशहा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *