कवीराज भुषण यांनी शिवरायांच्या स्तुतिपर रचलेल्या “इंद्रजिमी जृंभ पर” काव्याचा अर्थ काय ?

कविराज भूषण यांनी रचलेली अप्रतिम रचना इंद्रजिमी जृंभ पर ही काव्यरचना कानावर पडताच अंगाअंगात स्फुर्ति संचारते परंतु कधि आपण या रचनेचा अर्थ काय याचा विचार केला का?
तर चला बघुया खासरेवर या काव्याचा अर्थ…

इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।
पवन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यो सहसबाह पर राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है।
तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है

महाराष्ट्रातच नाहीतर संपुर्ण भारतात हे काव्य मोठ्या अभिमानाने गायल्या जाते. आता या प्रत्येक ओळिचा अर्थ बघुया….

इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है।

अर्थ:- या ओवीत काही ईतिहासातील उदाहरणे दिली आहे. एकदंर वाईट प्रवृत्तीवर चांगल्या शक्तींचा विजय ह्या ओवित दिसतो. महाराजांची तुलना ईंद्र, प्रभु श्रिराम यांच्या सोबत करण्यात आली आहे.
जंभासुर नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला, समुद्रावर जसा वडवाग्नी कोसळतो, गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला तसे शिवराय आहेत.

पवन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यो सहसबाह पर राम द्विजराज है।

वादळ ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते, मदनाचा ज्याप्रमाणे शंकराने, सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला तसे शिवराय सर्व वाईट प्रवृत्तीवचा संहार करतात.

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है।

दावाग्नी ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे तुटून पडतो त्याप्रमाणे विलक्षण गतीने महाराज हल्ला चढवितात.

तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है

याचा अर्थ, प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो, कृष्णाने जसा कंसाचा वध केला त्याचप्रमाणे शिवराजा म्लेंच्छांचा नाश करतात, शिवराय वाघ आहेत.

या ओळिचा ईंग्रजी अर्थ देत आहोत जेणे करुन सर्वापर्यत ही बहुमुल्य माहिती पोहचावी.

Like Lord Indra who defeated the evil forces of the demons. Like small Vamana who was an avtaar of Lord Vishnu, defeated the mighty Asur King Bali by just asking cleverly for alms while the Yagna was on.

(Shivaji Maharaj is:) Like Lord Shiva who slew Rati’s husband,Kama,the lord of desire by opening his Third Eye and burning him to ashes!
(Thus implies Kavi Bhushan, that it is Shivaji who will burn down the evil Mughals and Adilshah to ashes!) Like Lord Parshurama, the sixth avatar of Vishnu, who was the saviour of defeated the Haihaya King Kartavirya Arjuna also called as Sahasrabahu or Sahasrarjuna, as he had a thousand hands.

(Shivaji Maharaj is 🙂 Like the fire which burns wood, he is swift and deadly like the Cheetah against a herd of deer. Kavi Bhushan says, (Shivaji is) like a lion against wild hogs.

Like a ray of light that shatters the darkness and he offers hope to millions of people oppressed by the cruel rule of Aurangzeb across India.

(He is) like the child Krishna who defeated his maternal uncle, Kansa in wrestling and killed him.

( This great warrior) has now descended upon the clan of Mlecchas, (Here the poet refers to Mughals and Adilshah who oppressed their Hindu subjects and tortured them in many cases. Although Shivaji Maharaj’s kingdom was a Hindu State, he never forced religion on anyone. His was a state which practiced religious tolerance.) like a Tiger!

हि बहुमुल्य माहिती शेअर कराच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *