फक्त चहा विकणारे मोदीच नाही तरअतिशय गरीब कुटुंबात जन्‍मलेले झाले आहेत पीएम-सीएम…

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोडी एके काळी चहा विकायचे हे सर्वाना माहिती आहे. चहाविक्रेत्‍यापासून मुख्‍यमंत्रीपद आणि आता पंतप्रधान असा प्रवास त्‍यांनी केला. भारतात अनेक राजकीय पुढारी लहान आणि गरीब कुटुंबातून मोठे झाले आहेत. लाल बहादूर शास्‍त्री, जनेश्‍वर मिश्रा, चौधरी चरण सिंह तसेच देशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाचे प्रमुख मुलायम सिंह यांचाही समावेश आहे. चला तर मग बघूया खासरे वर गरीब कुटुंबात जन्म घेऊन त्यांच्या बुद्धिमत्तेने यशाचे शीखर गाठणारे काही राजकारणी…

लाल बहादूर शास्‍त्री

देशाला ‘जय जवान जय किसान’ हा नारा देणारे लाल बहादूर शास्‍त्री यांचा जन्‍म मध्‍यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्‍यांच्‍यात महात्मा गांधींप्रमाणेच गूण होते. पं. नेहरुंनीही त्‍यांचे कौतूक केले होते. त्‍यांचे वडील शिक्ष्‍ज्ञक होते. त्‍यानी बालपणी बराच संघर्ष केला. एक नदी पार करुन ते शाळेत जायचे. त्‍यावेळी ते डोक्‍यावर पुस्‍तके ठेवून नदी पार करायचे.

शास्‍त्रीजींनी वयाच्‍या 17व्‍या वर्षी असहकार आंदोलनात उडी घेतली. त्‍यानंतर त्‍यांनी मागे वळून पाहिले नाही. ते उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री बनले. त्‍यानंतर देशाचे पंतप्रधानपदही त्‍यांनी भूषविले. त्‍यांनी 1965 च्‍या युद्धात पाकिस्‍तानला मात दिली. त्‍यांच्‍या खंबीर नेतृत्त्वामुळेच हे शक्‍य झाले. अन्‍यथा देशाचा इतिहास वेगळाच असता. 1965 च्‍या युद्धात त्‍यांनी जवानांना खूप प्रेरणा दिली. अखेर ताश्‍कंद करारानंतर युद्ध थांबले. परंतु, करार केल्‍यानंतर त्‍याच रात्री त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या मृत्‍यूचे रहस्‍य कायम आहे.

मायावती

मायावतींचा जन्‍म १९५६ मध्ये उत्तर प्रदेश मधील गौतमबुध्द जिल्ह्यात बदलपूर ह्या त्यांच्या मूळगावी झाला. मायावती यांचे वडील प्रभु दयाल भारतीय टपाल खात्‍यात सरकारी कर्मचारी होते. ते भारतीय टपाल खात्‍यातून तार घर विभागाचे वरिष्‍ठ लिपीक पदावरुन सेवा निवृत्त झाले. मायावतींची आई रामरती ह्या सर्वसामान्य गृहिणी होत्‍या. स्वतः अशिक्षित असून मायावती यांच्या आईने मुलांच्या शिक्षणाकरिता कठोर परिश्रम घेतले. त्यांचा कुटुंबहि मोठे मायावतींना ६ भाऊ आणि २ बहीणी आहेत. मायावतींनी एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले. त्‍यानंतर त्‍यांनी बीएडदेखील केले. राजकारणात येण्‍यापूर्वी त्‍या एका शाळेत शिक्षिका होत्‍या.

कांशीराम यांच्या मायावती सम्पर्कात आल्या आणि त्यांची राजकीय कारकीर्द आकार घेऊ लागली. त्यांच्या कोर टीममध्ये मायावती ह्या प्रमुख घटकापैकी एक होत्या. त्यांची पार्टी बहुजन समाजवादी पार्टीची स्थापना १९८४ साली झाली तेव्हापासून मायावती युपीच्या ४ वेळेस मुख्यमंत्री बनल्या आहेत. मायावती आता सत्तेच्‍या बाहेर आहेत. परंतु, त्‍या उत्तम प्रशासक असल्‍याचे राजकीय तज्‍ज्ञांचे मत आहे. अनेकदा त्‍या वादातही अडकल्‍या. तरीही आज त्‍यांचे भारतीय राजकारणामध्‍ये एक महत्त्वाचे स्‍थान आहे.

मुलायमसिंह यादव

भारतीय राजकारणात नेहमी चर्चेला असणारे नाव म्हणजे मुलायमसिंह यादव हे आहे. मुलायमसिंह यादव यांचा जन्म सर्वसाधारण शेतक-याच्‍या कुटुंबात झाला होता. वडील त्‍यांना पैलवान बनविणार होते. परंतु, ते राजकारणात आले. पंतप्रधानपदावर त्‍यांचा डोळा नेहमीच असतो. मुलायमसिंह तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री राहिले आहेत. राजकारणात येण्‍यापूर्वी त्‍यांनी आग्रा येथील विद्यापीठातून एमएपर्यंत शिक्षण घेतले. त्‍यानंतर त्‍यांनी जैन इंटर कॉलेजध्‍ये बीटीचीही पदवी घेतली. या ठिकाणी त्‍यांनी काही दिवस शिक्षक म्‍हणून काम केले.

सत्तेच्‍या शिखरावर असलेले मुलायमसिंह यादव आजही सैफई या मूळ गावाला विसरलेले नाही. मुलायम यांचे वडील शांत स्‍वभावाचे होते. गावाकडे असताना मुलायमसिंह यादव यांनी अनेक कुस्त्या गाजविल्या आहेत. राजकारणातही त्यांनी अनेकांना धोबीपचाड दिली आहे. त्‍यांचे बालपण अतिशय गरीबीत गेले. त्‍यांनी शोषण, अन्‍याय, पूर्वग्रह इत्‍यादींचा आयुष्‍यात सामना केला आहे.

शरद पवार

भारतीय राजकारणातील चाणक्य, राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक ठसा उमटवला आहे. शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ‘काटेवाडी’ या छोट्याशा गावात झाला. गोविंदराव आणि आई शारदाबाई या शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या शरद पवार (12डिसेंबर 1940) यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले.

त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळेच शरद पवार यांचा ‘कॉलेज जीएस (जनरल सेक्रेटरी)ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री’ हा खडतर प्रवास थक्क करणारा तर आहेच या शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा आहे.

पवार साहेब हे वयाच्या अवघ्या 26-27व्या वर्षी आमदार झाले. पुढे ते प्रदेश कॉंग्रेस सरचटिणीस झाले. 1974मध्ये ते मंत्री झाले, आणि 1978मध्ये वयाच्या केवळ 38व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एवढेच नव्हे तर पवार साहेबांनी 1978, 1988, 1990, 1993 असे चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले. दरम्यान केंद्रीय संरक्षण खाते तसेच कृषी खात्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. सध्या ते त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

राजनाथ सिंह

भारताचे गृह मंत्री व भारतीय जनता पक्षाचे माझी अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री राजनाथ सिंह यांचा जन्‍म चंदौली येथील एका लहान गावात शेतक-याच्‍या घरी झाला होता. वयाच्या १३ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम राजनाथ सिंह करत होते. त्‍यांना 1974 मध्‍ये भारतीय जनसंघाचे सचिव म्‍हणून नियुक्त करण्‍यात आले. राजकारणात त्‍यांना मुकद्दर का सिकंदर म्‍हटले जाते. यूपीच्‍या राजकारणाची त्‍यांना चांगली जाण आहे. जातीयवादी राजकारणाची त्‍यांना चांगलीच ओळख आहे. सामाजिक न्‍याय विभागाचा अहवाल लागू करण्‍याचा त्‍यांचा निर्णय आजही महत्त्वाचा मानला जातो.

चौधरी चरण सिंह

चौधरी चरण सिंह भारत देशाचे सातवे प्रधानमंत्री आहे. त्यांना मुख्यतः दलित आणि शेतक-यांचा कैवारी म्‍हणून ओळखले जाते. गाझियाबाद जिल्‍ह्यातील नूरपूर या छोट्याशा खेड्यात त्‍यांचा जन्‍म झाला होता. वडील शेतकरी होते. लहानपणी ते वडीलांना शेतीच्‍या कामात मदत करत होते. परंतु काही दिवसाने हा आवाज देशाचा बुलंद आवाज बनेल याची कोणीही कल्पना केली नाही. 1967 मध्‍ये एका आदेशाद्वारे जाती विशेष नावाखाली मिळणारे अनूदान बंद केले. त्‍यानंतर महाविद्यालयांमधून नावासमोर जातीवाचक शब्‍द हटविण्‍यात आले.

चरण सिंह हे उत्तम प्रशासक होते. पंतप्रधान म्‍हणून त्‍यांचा कार्यकाळ अतिशय लहान होता. सध्या जी शेतकर्याची अवस्था आहे जर चौधरी चरण सिंह जास्त काळ असते तर शेतकरी वेगळ्या परस्थितीत असता हे नक्की आहे.

जनेश्‍वर मिश्रा

यांना आपण छोटे लोहिया या नावाने सुध्दा ओळखतो. त्‍यांचा जन्‍म बिलिया जिल्‍ह्यातील नाथही या छोट्या गावात झाला होता. त्‍यांचे कुटुंब खूप सामान्‍य होते. जनेश्वर मिश्र ह्या त्यांच्या दानशूर स्वभावा बद्दल आजही राजकारण्यामध्ये ओळखले जातात. लोक असे सांगतात कि त्यांच्या खिशात १०० रुपये जरी असले आणि कोणी गरजू भेटला तर तो पैसा त्यांना ते देऊन देत होते. माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंह यांना 1977 च्‍या निवडणुकीत पराभूत केल्‍यानंतर जनेश्‍वर मिश्रा चर्चेत आले. जनेश्‍वर मिश्रा हे महाविद्यलयीन राजकारणातून समोर आले होते. त्‍यांनी 22 जानेवारी 2010 ला अखेरचा श्‍वास घेतला.

कल्‍याण सिंह

दोन वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह राहिलेले आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री कल्‍याण सिंह हे सुरुवातीपासून लढवय्ये नेते म्‍हणून ओळखल्‍या गेले आहेत. ते एका सामान्‍य कुटुंबात जन्‍मले. शेतकरी आणि मजुरांवर होणा-या अत्‍याचारांविरुद्ध त्‍यांनी लढा दिला. त्‍यासाठी ते 7 वेळा तुरुंगातही गेले. आणीबाणीच्‍या वेळेत ते 20 महिने तुरुंगात होते.

कल्‍याण सिंह यांनी जनसंघापासून भाजपपर्यंत बराच मोठा राजकीय प्रवास केला. त्‍यानंतर त्‍यांना मुख्‍यमंत्रीपदही मिळाले. परंतु, ते मुलायमसिंह यादव यांच्‍या जवळ गेले. सध्या ते परत भाजपामध्ये आले आणि राजस्थानचे राज्यपाल आहेत.

हे आहेत काही सामान्य कुटुंबात जन्म घेऊन यशाचे उंच शिखर गाठणारे राष्ट्रीय पातळीवरचे नेते माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा… आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *