11 प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व जी एकेकाळी शाळा कॉलेज मध्ये झाली होती नापास

कोणीही शिक्षणाचे महत्त्व कधीच सोडत नसतो, पण परिस्थिती कधी कधी अशी पावले उचलायचा लावते की ती गोष्ट सामाजिक दृष्टीने यशस्वी होण्यास बाधक ठरू शकते.या गोष्टींना न जुमानता तुम्ही जर अथकपणे कठोर परिश्रम घेत राहिलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. या सर्व गोष्टी या काही प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या ख्याती आणि संपत्तीद्वारे सिद्ध केल्या आहेत.

1.मुकेश अंबानी-

Mukesh Ambani

मुकेश अंबानी हे त्यांच्या MBA च्या अभ्यासक्रमामध्ये नापास झाले होते, तरीही ते रिलायन्स डिजिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर बनले आहेत. फॉर्ब्स मॅगझीन नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी हे 9 व्या स्थानी आहेत.

2.कपिल देव-

Kapil dev

पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे सर्वात प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूपैकी एक असले तरीही,एकेकाळी त्यांना कॉलेज मधून बाहेर काढून टाकण्यात आले होते. त्यांनी मिळविलेल्या यशासह त्यांना शिक्षण हर नेहमीच महत्वाचे वाटते.

3.स्मृती इराणी-

Smriti irani

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारताच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी फक्त 12 वि पर्यंत शिकलेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचं एवढ कमी शिक्षण होऊनही त्या भारताच्या शैक्षणिक विभागात कार्यरत आहेत.मध्यंतरी 2013 मध्ये त्यांनी कॉमर्स कोर्स केलेला आहे अशा बातम्या आल्या होत्या.

4.सचिन तेंडुलकर-

Sachin tendulkar

क्रिकेटचा देव अशी ळ्याती असलेला आपला लाडका सचिन तेंडुलकर फक्त 10 वि पर्यंत शिकलेला आहे हे वाचून आश्चर्यचकित होऊ नका. कारण सचिन च्या क्रिकेट मध्ये असणाऱ्या विलक्षण कौशल्यामुळे तो लहान वयातच पूर्णवेळ क्रिकेटकडे वळला.फील्डवर त्याचे विलक्षण कौशल्य खूप आधीच स्पष्ट झाले होते.

5.अझीम प्रेमजी-

Azim premji

विप्रो या नावजलेल्या आयटी कंपनी चे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी हे कॉलेजमध्ये असताना ड्रॉप झाले होते. त्यानंतर त्यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी विप्रो या कंपनीची स्थापना केली.कंपनीच्या 11 अब्ज डॉलर च्या निव्वळ उलाढालीमुळे त्यांनी शिक्षण सोडून स्वतःच नुकसान करून घेतले असे काही दिसत नाही.

6.अमीर खान-

Amir khan

बॉलीवूड जगतातील सर्वात जास्त प्रशंसनीय अभिनेत्यांपैकी एक असणारा अमीर खान अजून एक उदाहरण आहे की ज्याने कॉलेज मध्ये असतानाच ठरवले की कॉलेज हे आपल्यासाठी नाहीये.त्याने आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नंतर तो आपल्या आवडत्या अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून एक यशस्वी अभिनेता बनून दाखवले. अमीर खान आम्हाला आपला अभिमान वाटतो.

7.मेरी कॉम-

Mary Kom

भारताची स्टार महिला बॉक्सर मेरी कॉम ने आपले शिक्षण शाळेत असतानाच सोडले होते,त्यानंतर तिने भारताची अव्वल बॉक्सर बनून बॉक्सिंग मध्ये आपले करियर नावारूपाला आणले.तिने अलीकडेच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तीने शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यामुळे ती आता बॉक्सिंग मधून बाहेर पडल्याचे जवलपास सिद्ध झाले आहे.

8.गौतम अदानी-

Gautam Adani

वाणिज्य शाखेचे डिग्री चे शिक्षण घेत असतानाच गौतम अदानी यांनी आपले शिक्षण सोडले. त्यानंतर ते व्यवसायाकडे वळले,त्यांनी स्वतःची अदानी ग्रुप नावाने हिऱ्यांची ब्रोकरेज कंपनी चालु केली. त्यांच्या कंपनीची उलाढाल जवळपास 6 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे.एकदा त्यांना अनिस इब्राहिम ने 3 कोटी रुपये खंडणीसाठी कीडनॅप केले होते.

9.ऐश्वर्या राय बच्चन-

Aishwarya Rai

मुंबई मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ऐश्वर्या राय यांनी आर्किटेक्टर कोर्स ला प्रवेश घेतला,पण ती कॉलेजमधून ड्रॉपआऊट झाली. ऐश्वर्या त्या नंतर मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली व मिस वर्ल्ड हा किताब जिंकून तिने आपल्या नावाची छाप पाडली. बॉलीवूड मधेही आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला.

10.सलमान खान-

Salman Khan

सलमान खान हा बॉलीवूडचा बडा भाई म्हणून ओळखला जातो.आपल्या एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमुळे सलमानने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव घट्ट केलेले आहे. पण सलमान ने फक्त शाळेपर्यंत चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. सल्लू आणि त्यांच्या भावांनी शालेय शिक्षणानंतर त्यांच्या आवडत्या अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

11.अक्षय कुमार-

Akshay Kumar

बॉलीवूड चा खिलाडी अशी ओळख असलेला अक्षय कुमार हा मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट झालेला आहे.त्याच्या अभिनय कौशल्यामुळे तो खूप कमी शिकेलला आहे हे कदापिही वाटणार नाही.पण अक्षय कुमार ने आपले पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण होण्याआधीच कॉलेजला रामराम ठोकला.

हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व हे सिद्ध करतात की यश हे फक्त शिक्षणाने मिळत नसते तर त्यासाठी गरज असते ती प्रचंड इच्छाशक्ती व मेहनतीची. आपल्या स्वप्न साकार करण्यावर आपण ठाम राहिलो तर ते पुर्ण करण्यापासून कोणीही रोकू शकत नाही.स्वप्न पूर्ण होतील हा विश्वास फक्त माणसाच्या मनात असायला हवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *