अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे घर व्हाईट हाउस आणि त्याची सुरक्षा…

व्हाइट हाऊस ही एक अत्यंत प्रतिष्ठित वास्तू आहे, हो ना?

जेथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतात व आपले कार्यालयीन कामकाज बघतात. ते एका सामर्थ्यवान व्यक्तींपैकी एक असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व माहिती ही गुप्त ठेवण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचे संरक्षण हे तेवढेच महत्वाचे.
तर चला खासरे मध्ये आम्ही आपणांस काही राजधानीतील इमारती बद्दल काही गुपिते व काही तेथील बंकरच्या दंतकथेवर नजर टाकूया. मग आता वाट कसली बघताय? वाचा खाली दिलेली माहिती.

१. वायू संरक्षण

लोकांना वाटेल की व्हाईट हाऊस मध्ये हवेतुन जाणे हा डाव्या हाताचा खेळ आहे. परंतु हवाई संरक्षण करणा-यांनी हि यंत्रणा अतिशय सुरक्षित केलेली आहे.
नो-फ्लाय झोन

व्हाइट हाऊस च्या सभोवताली १५ मैल त्रिज्येच्या क्षेत्रफळात नो-फ्लाय झोन असून या क्षेत्रात कुठलेही विमान, हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाही. जर कुठलेही विमान किंवा रॉकेट या क्षेत्रात आलेच तर व्हाइट हाऊस मध्ये इंडिकेटर चमकण्यास सुरुवात करतो. जर हे कुणाच्या लक्षात आले नाही तर लाल रंगाचा धूर निघण्यास सुरुवात होते ज्याद्वारे रॉकेट पासून बचाव करण्यास मदत होते.

३. इन्फ्रारेड

व्हाइट हाऊस व त्याबाजूचा परिसर हा कित्येक एकेराहून जास्त पसरलेला आहे, त्यामुळे तेथील जमिनीवर इन्फ्रारेड बसविण्यात काही खास कारण असेल काय? तर त्या इन्फ्रारेड ची व्यापकता अतिशय जबरदस्त आहे जेणेकरून ते ऑटोमॅटिक घुसखोरांचा शोध घेऊन ते सुरक्षा यंत्रणेस सतर्क करते.

३.बुलेटप्रूफ खिडक्या

११ नोव्हेंबर २०११ रोजी एका अज्ञात इसमाने व्हाइट हाऊस मधील खिडक्यांवर अत्याधुनिक रायफल ने दोन राऊंड फायर केले होते. परंतु यामुळे व्हाईट हाउसवर काहीच फरक पडला नाही.

४.बंकर

काही वर्षांपूर्वी व्हाइट हाऊस चे नुतनीकरण करण्यात आली असून त्यामध्ये बंकर सुद्धा करण्यात आले आहे. आणीबाणीच्या वेळेस याचा उपयोग होतो.

५.अण्वस्त्र विरहीत
व्हाइट हाऊस मधील बंकरवर अण्वस्त्र हल्ल्याचा काहीही प्रभाव होत नाही तसेच हे बंकर सहा मजली खोल वर आहे.

६. काँक्रीट चे अडथळे

इमारतीच्या सभोवताली संपूर्ण परिसरात लोखंडी अडथळे बनविले आहेत.भरधाव ट्रकने टक्कर जरी मारली तर काहीही होणार नाही एवढे मजबूत त्याची बांधणी केली आहे.

७. गुप्तचर यंत्रणा

जर देशाच्या राष्ट्राध्यक्षाना गुप्त सुरक्षा यंत्रणा नसेल तर काय अर्थ.? अमेरिकेच्या आजपर्यंत च्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांना उत्तम सुरक्षा यंत्रणा पुरविली आहे.जी एकदम उपयुक्त ठरली.
FIA अमेरिकेतील सर्वात जुनी असलेली ही गुप्तचर यंत्रणा असून यामध्ये ३२०० सुरक्षा रक्षक आहेत जे गुप्तपणे काम बघतात.तसेच सुमारे १३०० सैनिक जे आपल्या गणवेशात असतात.आणि हो हे सर्व अत्याधुनिक हत्याराने सज्ज असतात आपण यावर हल्ला करायचा विचार स्वप्नातही करू शकत नाही.

८.कुंपण

काही वर्षांपूर्वी इमारतीच्या सभोवताली असलेले कुंपनाचे डागडुजी करण्यात आली असून त्याचे रूपांतर एका अभेद्य कुंपणात केले आहे.ज्यावर चढून जाणे अत्यन्त अवघड आहे.

९. जर आपणास असे वाटत असेल की कुणीही व्हाइट हाऊस मध्ये जाऊन त्या potus ला स्पर्श करू शकतो तर तुम्ही चुकीचे आहात. Potus काही मोजक्याच व्यक्तींना आमंत्रण देते त्यापूर्वी त्यांची सखोल चौकशी करून नंतरच आमंत्रित करतात शेवटी सुरक्षा महत्वाची

१०.अन्न सुरक्षा रक्षक

आपणास वाटत असेल की potus पासून दूर राहून हल्ला करण्याचा प्रभावी मार्ग हा अन्नाद्वारे केलेला हल्ला तर आपण चुकीचे ठरलेले आहेत.कारण राष्ट्राध्यक्षांना अन्न पुरविण्या पूर्वी त्याची तपासणी हे तज्ञ शेफ द्वारे होते नंतरच त्यांना पुरवितात.

११. ड्रोन द्वारे नजर

सध्या ड्रोन खूप चलनात असून तो एक हल्ला करण्याचा प्रभावि मार्ग मानल्या जाते.२०१५ मध्ये व्हाईट हाऊस मधील लॉन वर एक असेच ड्रोन उतरले होते पण त्याला सुरक्षा रक्षकांनी निस्तानभूत केले .संपूर्ण व्हाईट हाऊस वर ड्रोन द्वारे नजर ठेवली जाते.
नजरेसाठी नजरच व्हाईट हाऊस मध्ये ड्रोन सैनिकांची फौज तैनात आहे. नजरेस पडलेली संशयित वस्तूचा खात्मा करण्यास हे सज्ज असतात.

१२. प्रेशर सेन्सर इन्फ्रारेड सेंसरच्या सोबतच लॉनदेखील प्रेशर सेन्सरने सुसज्ज आहे. एवढेच नाही तर ते अध्यक्षांच्या हालचालींचा तपास करण्यासाठी ते ओव्हल कार्यालयाच्यावरच्या मजल्यावरही सज्ज असून त्यावर थोडा जरी दबाव पडला तर ते सुरक्षा यंत्रणेशी सूचित करतील आणि आपण तेथे त्यामध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *