सरकारी नोकरीचा सोडून शेतीद्वारे कोट्यावधी रुपये कमावणारा तरुण..

हरीश धनदेव जैसलमेरचे एक शेतकरी आहेत तो उच्चशिक्षित, इंग्रजीचे जबरदस्त वकृत्व असलेला अभियंता आहेत.

हरीश यांनी 2012 मध्ये जयपूर येथून आपली अभियांत्रिकी पूर्ण केली आणि दिल्लीतील एका महाविद्यालयात मास्टर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन (एमबीए) प्रवेश घेतला. एका वर्षानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाल्यामुळे एमबीए चा अभ्यास पूर्ण करता आला नाही. जैसलमेरच्या नगरपालिकेत एक कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांना नोकरी मिळाली. पण फक्त दोन महिन्यात त्याचा नोकरी मधील रस कमी झाला आणि त्याने दुसरा पर्याय शोधण्यात लक्ष केंदित केलं.

त्याच्या मनातील आवाजाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असताना बीकानेर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या एका माणसाशी भेट झाली. हरीश ला ज्वारी किंवा बाजरीच्या व्यतिरिक्त शेतीतले दुसरे पर्याय पाहिजे होते. चर्चेदरम्यान, या माणसाने हरीशला कोरफडच्या (ऍलोवेरा)शेतीविषयी विचार करण्यास सांगितले. त्यांना त्यांचे ज्ञान वाढवायचे होते आणि अशाप्रकारे ते दिल्लीला जाऊन एका प्रदर्शनात गेले. तेथे,त्याना शेतीविषयक नव-नवीन तंत्रज्ञान आणि शेती करण्याची नवी दिशा मिळाली. त्यांनी कोरफड वेलीची शेतीविषयी भरपूर माहिती घेऊन लगेचच पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. ते दिल्लीहून बीकानेरला परतले आणि 25 हजार कोरफडचे रोप विकत घेतले आणि जैसलमेरला घेऊन गेले.

एकदाचे त्यांनी आपले काम सुरू केले,परंतु हरीश यांना कुणीतरी सांगितले की,बऱ्याच लोकांनी कोरफडची शेती करण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झालेत. या गोष्टीमुळे ते चिंतेत पडले,त्यांना समजत नव्हते की आता काय करावे. कोरफड विकल्या जात नाहीत म्हणून त्या लोकांनी कोरफडाची शेती करणे सोडून दिले होते. त्यांनी नेमके काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी सखोल अभ्यास केला. लवकरच, त्यांना कळले की शेतकरी खरेदीदारांच्या संपर्कात राहू शकत नव्हते, त्यामुळे कोणीही त्यांचे उत्पादन विकत घेत नव्हते. त्यानंतर त्याला कळाले की,मार्केटिंग शिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही.

तो म्हणतो की, “माझ्यासाठी ह्या गोष्टी खूप कठीण होत्या कारण मी अगदी लहान होतो आणि सुरुवातीला मला कमी अनुभव होता. आणि मला काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने प्रेरित झालो होतो,आणि याच काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने मी इथपर्यंत पोहचलो.”

त्यांनी शेतीची सुरुवात केली तेव्हा जयपूरमध्ये काही एजन्सींकडे संपर्क साधला आणि लवकरच त्यांनी या कंपन्यांबरोबर कोरफडच्या पानांची विक्री केली. त्यानंतर त्यांनीआपल्या व्यवसायाचा आणखी विस्तार कसा करू शकेल याबाबत आपल्या मित्रांबरोबर चर्चा केली. आता तो स्वतःच पानांच्या आतमधील गर (लगदा) काढू लागला.राजस्थानमध्ये अनेक ग्राहकांना तो गर (लगदा) विक्री करू लागला.

हरीशने जास्तीतजास्त शेती वाढवण्यास सुरुवात केली आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले.या बरोबरच त्याने कोरफडातील गर (लगदा) विकत घेणाऱ्या ग्राहकांचा इंटरनेटवर शोध घेतला.

तो म्हणतो, “माझे शोधत असताना मी ‘पतंजली’ वर येऊन थांबलो आणि मला भारतातील सर्वात मोठा ग्राहक मिळाला.मी त्यांना एक मेल करून आणि माझे कार्य समजावून सांगितले.त्यांचा चांगला प्रतिसाद प्राप्त झाला आणि मला बोलावण्यात आले. हा माझ्यासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता कारण यामुळे प्रत्येक गोष्ट बदलली आणि मला कमाई करण्याचा मार्ग मोकळा झाला.”

गेल्या दीड वर्षांपासून ते ‘पतंजली’ ला त्यांचे उत्पादन पाठवत आहेत.

तो म्हणतो, “सुरुवातीस, मी कसा पुढे जाईन आणि माझी कंपनी पुढे आणखी किती विस्तारित करू शकतो याबद्दल चिंताग्रस्त होतो, करत होतो.पण, वेळ आणि अनुभवाने,मी माझे काम चांगल्या प्रकारे समजून घेतले.”

आज,त्याची केवळ कंपनी नाही तर ‘नेचरलो अॅग्रो’ ही उच्च कमाई करणारी कंपनी आहे. कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांना सुद्धा चांगला पगार भेटतो. ‘पतंजली’च्या सहकार्याने कंपनीमध्ये काम करण्याच्या बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या.

हरीश म्हणतो, “तयार केलेल्या उत्पादनांत गुणवत्ता ठेवणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.आम्हाला उत्पादनाच्या गुणवत्तेशी संबंधित कोणत्याही तक्रारी येत नाहीत,आम्ही प्रत्येक प्रक्रियाकरत असताना विशेष काळजी घेतो.”

कोरफडच्या शेतीद्वारे कोट्यवधी रुपये कमाई करून, हरीश आपल्या देशातील लाखो लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहेत. त्याचे हे यश इतर लोकांना सुद्धा काहीतरी करण्यास प्रेरणा देणारे एक उदाहरण बनले आहे.

3 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *