अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…

प्रशासकीय अधिकारी होणे प्रत्येक युवक किंवा युवतीचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करायला मेहनतसुध्दा आवश्यक आहे. आपला एक समज असतो कि प्रशासकीय अधिकारी म्हणजे जाड भिंगाचा चष्मा, चेहऱ्यावर राग इत्यादी परंतु खालील काही अधिकारी बघितल्यावर आपला हा गैरसमज दूर होईल. सुंदरते सोबत बुद्धिमत्तेची देन असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकारी खासरे वर बघा…
पहिल्यांदा पाहिल्यावर ह्या तुम्हाला अभिनेत्री वाटणार पण तसे नाही आहे…

1- IAS स्मिता सभरवाल

IAS Smita Sabharwal

आयएएस ची परीक्षा २३ व्या वर्षी पास होणाऱ्या स्मिता सभरवाल ह्या वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. स्मिता यांना संपूर्ण भारतात चौथ्या स्थान पटकावून IAS झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती चित्तूर जिल्ह्यामध्ये डेप्टी कलेक्टर म्हणून झाली होती. आंध्र प्रदेश मध्ये अनेक दिवस काम केल्यानंतर त्या करीमनगर येथे डीएम च्या पदावर सध्या आहे.

2-IPS मेरिन जोसेफ

२०१२ साली त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास होऊन मरीन जोसेफ IPS होण्याचा मान मिळविला. दिल्ली येथील नामांकित कॉलेज सेंट स्टिफस कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. या अगोदर त्या राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस अधिकारी झाल्या होत्या. जोसेफ त्यांच्या बैच मधील सर्वात कमी वयाच्या आयपीएस अधिकारी आहेत. २०१५ साली त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे आयोजित युथ समीटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

3-IAS टीना डाबी

IAS Tina Dabi and Her Husband IAS Amir Ul Shafi

२०१६ साली झालेल्या युपीएससी परीक्षेत सर्वात कमी वयाची अधिकारी तिच्या पहिल्या प्रयत्नात व पहिला नंबर घेऊन पास झालेली टीना डाबी आहेत. टीन यांचा जन्म भोपाल मध्ये झाला त्या ७ वी मध्ये असताना त्यांचे कुटुंब दिल्ली येथे शिफ्ट झाले. कॉन्वेंट ऑफ जिसस & मेरी मध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये दिल्ली येथील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये त्यांनी पोलिटिकल सायन्स मध्ये पदवी पूर्ण केली. याच परिक्षेत दुसरा क्रमांक पटकावणारे अमीर उल शफी सोबत त्यांची मागे एंगेजमेंट झाली आहे.

4- IAS बी चंद्रकला

युपी येथील बुलंदशहर येथील जिल्हाधिकारी चंद्रकला सर्वाना परिचित आहे. त्यांचे फोटो सतत सोशल मिडीयावर फिरत असतात. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९७९ साली आंध्र प्रदेश मध्ये झाला. २००८ साली त्यांना युपीएससी परीक्षेत ४०९ वे स्थान मिळवून IAS अधिकारी झाल्या. त्यांनी कोटी वूमन्स कॉलेज हैद्राबाद येथून बीएची पदवी मिळवली आहे. त्यांच्या काटेकोर कामा करिता त्या प्रसिध्द आहेत.

5- IPS संजुक्ता पाराशर

IPS sanjukta Parashar

आसाम मधील पहिली महिला IPS अधिकारी संजुक्ता ह्या २००६ सालच्या बैचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांनी त्याची पदवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ कॉलेज मधून पोलिटिकल सायन्स मधून पदवी पूर्ण केली आहे. संजुक्ता ह्या एका गोंडस बाळाच्या आई आहे. २००८ साली त्यांची पहिली पोस्टिंग माकूम मध्ये असिस्टन्ट कमानडेंट म्हणून झाली होती. काही दिवसानंतर त्यांना उदालगिरी येथे बांगलादेशी व बोडो लोकात झालेल्या हिंसाचार नियंत्रित करण्याकरिता त्यांना पाठविण्यात आले. इथे त्यांनी अद्वितीय कामगिरी बजावली होती.

6-IAS रिजू बाफना

रीजू बाफना ह्या २०१३ साली झालेल्या यूपीएससी परीक्षेत ७७ वे स्थान मिळवून आयएएस अधिकारी झाल्या. त्यांचे पतीसुध्दा आयएएस अधिकारी आहे. मागील वर्षी मानवी अधिकारी कमिशन मधील एका अधिकाऱ्याने त्याचा विनयभंग केल्यामुळे हे नाव चर्चेत आले.

7-IAS स्तुति चरण

IAS Stuti Charan

जोधपुर येथिल रहिवाशी स्तुती २०१२ साली यूपीएससी परीक्षेत तिसरे स्थान त्यांनी पटकविले होते. त्यांच्या ह्या यशा पाठीमागे त्यांच्या परिवाराने अपार मेहनत घेतली. स्तुती यांनी जोधपुर विद्यापीठातून बीएससी व दिल्ली येथे आईआईपीएम मध्ये मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये पदवी घेतली आहे. ह्या परीक्षे अगोदर त्यांनी बैंक PO परीक्षा सुध्दा पास केली होती व युको बैंकमध्ये काही दिवस नौकरी सुद्धा केली.

8-IAS रोशन जैकब

केरळ येथील रहिवाशी रोशन जेकब यांचा जन्म २५ डिसेम्बर १९७८ साली झाला. त्यांनी २००४ मध्ये युपीएससी परीक्षा पास केली. सध्या त्या उत्तर प्रदेश मध्ये गोंडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतात.

9-IPS मीरा बोरवांकर

महाराष्ट्र कैडर मधील सिनियर ऑफिसर मीरा चढ्ढा बोरवणकर १९८१ साली आयपीएस अधिकारी झाल्या. त्या लवकरच रिटायर होणार आहेत. सध्या त्या पोलीस शोध व विकास ब्युरोच्या महानिदेशक आहे. या अगोदर महाराष्ट्राची पहिली महिला पोलीस आयुक्त बनून त्यांनी इतिहास रचला होता.
महाराष्ट्र कैडर की सीनियर ऑफिसर मीरा चड्ढा बोरवांकर 1981 बैच की आईपीएस अधिकारी हैं। वो अगले साल रिटायर्ड होंगी। वर्तमान में मीरा पुलिस शोध एवं विकास ब्यूरो की महानिदेशक हैं। इससे पहले महाराष्ट्र की पहली महिला पुलिस आयुक्त बनकर मीरा बोरवांकर ने इतिहास रचा था।

10-IPS मोक्षदा पाटील

मुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्या साठी भरीव कामगिरी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. सद्या वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या पदावर मोक्षदा पाटील आहेत.

सौंदर्या सोबत बुद्धिमत्ता असणाऱ्या ह्या भारत मातेच्या मुलींना खासरे तर्फे सलाम….

वाचा आयपीएस मोक्षदा पाटील यांचा जीवनपट

वाचा फक्त ११ रुपये फी घेऊन अनेक अधिकारी घडविणारा शिक्षक

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *