शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…

शहीद ए आझम भगतसिंग हे एक महान व्यक्तिमत्व, भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाची कामगिरी असलेले महान क्रांतिकारक आहे. त्यांनी जगाला व भारतीय स्वतंत्र लढ्यास प्रेरणा देणारे काही क्रांतिकारक पाऊल उचलुन स्वतंत्र युद्धात अनेकांना प्रेरणा दिली. त्यांना अगदी कमी वयातच देशाकरिता शहीद होत फासावर जावे लागले. त्यांच्या बद्दलच्या बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत आहेत पण काही गोष्टी अद्यापही माहीत नाहीत.अशाच काही गोष्टी आपण खासरेवर बघणार आहोत ज्या कुणालाही माहीत नाहीत.

भगत सिंग, संधू जाट यांचा जन्म सप्टेंबर १९०७ मध्ये ब्रिटीश पंजाब प्रांतातील लयलपूर जिल्ह्यात (सध्या पाकिस्तानमध्ये), जारानवाला तहसील बंगा या गावी एका शीख परिवारात झाला. त्यांचे कुटुंब यापूर्वी ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारक कार्यात सहभागी होते.

लहानपणीच हवी होती बंदूक

लहानपणा पासून देशभक्तीची ओढ भगतसिंगयांना होती. भगतसिंगांविषयी एक गोष्ट अशी बोलली जाते की,लहान असताना सुद्धा त्यांना बंदूक हवी होती जेणेकरून त्यांना ब्रिटिशांशी लढता येईल.

जालियनवाला बाग हत्याकांडानंतर

ज्या वेळी जलीयनवाला बाग हत्याकांड झाला.त्यावेळी भगतसिंह केवळ 12 वर्षांचा होते आणि शाळेतून पळून जाऊन ते त्या ठिकाणी गेले.तिथे त्यांनी भारतीयांच्या रक्ताने ओली झालेली माती एका बाटलीमध्ये भरून घेतली, असे म्हटले जाते की ते त्या रक्ताने माखलेल्या मातीची रोज पूजा करत असत. यावरून आपण भगतसिंग यांच्या देशाप्रती, देशबांधावाप्रती असलेली तळमळ लक्षात येते.

एक उकृष्ट अभिनेता

या क्रांतिकारकाची दुसरी बाजू म्हणजे तो एक अभिनेता सुध्दा होता. महाविद्यालयात असताना भगत सिंगांनी एक अभिनेता म्हणून नाटकांमध्ये भाग घेतला. त्यापैकी काही नाटकामध्ये त्यांनी ‘सम्राट चंद्रगुप्त’ आणि ‘राणा प्रताप’ यांची भूमिका केली होती.

सेंट्रल असेंम्बलीवर बॉम्ब

बहिऱ्याना आवाज जाण्याकरिता धमाका आवश्यक आहे असे ते म्हणत भारतीय स्वतंत्र युद्धाचा आवाज इंग्लंड पर्यंत पोहचवायला भगतसिंह व त्यांच्या सहकार्यांसह,दिल्लीच्या मध्यवर्ती सभेत बॉम्ब फेकला. बॉम्ब हा कमी दर्जाच्या स्फोटक द्रव्यांनी बनवला गेला होता कारण त्यांना कोणालाही जखमी करायचं नव्हतं.

घोषवाक्य

भारतात अनेकांना हे माहिती नाही कि ‘इन्कलाब जिंदाबाद’ नारा हा भगतसिंगाची देन आहे. आधुनिक राजकीय पक्षांनी याचा गैरवापर केला, परंतु हा एक शक्तिशाली नारा होता जो भगतसिंह यांनी ब्रिटीशांविरूद्ध सशस्त्र लढ्याद्वारे तयार केला होता.

समाजवाद

लहानपणापासूनच भगतसिंह समाजवादाच्या विचाराने प्रेरित झाले होते. लेनिनच्या नेतृत्वाखाली असलेल्या समाजवादी क्रांतीच्या विचारने त्यांचा उत्साह वाढत असे.

ते एक नास्तिक होते

भगतसिंग हे एक चांगले वाचक होते. एक महान विचारवंत त्यांनी लेनिन, मार्क्स आणि ट्रॉट्स्की यांच्या विचारणे प्रेरित झाल्यानंतर, भगतसिंग एक नास्तिक बनले आणि त्यांनी आपल्या शीख धार्मिक श्रद्धेचा त्याग केला. मी नास्तिक का आहे ? त्याचा हा लेख सर्वत्र प्रसिद्ध आहे.

क्रांतिकारी लेखक

क्रांतिकारक म्हणून भगतसिंग ब्रिटिशांसाठी एक भयानक स्वप्न बनले होते. भगतसिंग हे एक महान लेखक होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी लिखाण केले आहे.

सत्य कथन करणारी डायरी

भगतसिंग हे उत्तम लेखक असल्यामुळे त्यांना दैंदिनी लिहायची सवय होती. भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात कैदेत असताना त्यांच्याकडे एक डायरी होती.स्वातंत्र्य आणि क्रांतीबद्दलचे त्यांचे मनोवेधक विचार असलेली ही डायरी वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध आहे.

एक नव्या प्रकारचा कैदी

१९३० मध्ये तुरुंगात असताना भगतसिंह हे स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेलमध्येच वेळ घालवणारे पहिले राजकीय कैदी होते. तुरुंगात असताना त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना राजकीय कैदी असल्यामुळे काही मुलभूत सुविधा जसे वर्तमानपत्र, पुस्तके इत्यादी पुरविण्यात यावे पण सरकारने पहिले हि विनंती मान्य केली नाही. ह्या सुविधा अगदी कमी ब्रिटिश गुन्हेगारांना देण्यात येत असत.

अंतिम निरोप

२४ मार्च १९३१ हा त्यांचा फाशीचा दिवस ठरविण्यात आला होता परंतु लोक जमतील ह्या भीतीने २३ मार्च रोजी त्यांना सायंकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली. भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. सतलज नदीच्या काठावर गुप्तपणे तुरुंगातील अधिकार्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले होते. परंतु,बातम्या ऐकून हजारो लोक एकत्र झाले आणि त्यांनी या शहीदांची राख घेऊन मिरवणूक काढली.

भगतसिंह घर सोडून कानपुर कडे निघाले आणि जेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न लावुन देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले की जर या गुलाम असलेल्या भारतात लग्न केले तर “माझी वधू मरणार” आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले.

असे म्हटले जाते की फाशीची पाहणी करण्यासाठी कोणतेही दंडाधिकारी तयार नव्हते. मूळ मृत्यु वारंट कालबाह्य झाल्यानंतर मानद न्यायाधीशांनी त्यावर सही करून फाशीची पाहणी केली.

फासावर जात असताना सुद्दा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते,आणि शेवटच्या क्षणी सुद्दा त्यांनी ब्रिटिश विरोधी घोषणा दिल्या. अनेकांच्या मनामध्ये आजही भगतसिंगांचा वारसा कायम राहतो.

अश्या या थोर देशभक्त शहीद ए आझम भगतसिंग यांना खासरे तर्फे मानाचा मुजरा…

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *