जगभरात या प्रॉडक्ट्‍सवर बंदी, मात्र भारतीय बाजारात होत आहे खुलेआम विक्री

काही दिवसापूर्वी मैगी ह्या नूडल्सवर बंदी घालण्यात आली कारण होते, त्यामध्ये आढळणारे शरीरास हानिकारक शिसे, कंपनीने नंतर बदल करून परत मैगी बाजारात विक्रीस आणली परंतु तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही कि मॅगीप्रमाणेच देशभरात अनेक प्रॉडक्ट्‍स असे आहेत की, जगभरात त्यांच्यावर बंदी आहे. परंतु, भारतीय बाजारात हेच प्रॉडक्ट्‍स खुलेआम विकले जात आहेत.

‘मॅगी’ प्रकरण उघडकीस आल्यामुळे आपल्याला हि बाब कळली परंतु आता खासरेवर काही असे प्रोडक्ट बघूया ज्याच्यावर जगात बंदी असताना भारतात विक्री सुरु आहे.

‘किंडर जॉय’वर 2500 डॉलर्सचा दंड

आजकाल किंडर जॉय हे चॉकलेट लहान मुलाना हवे असते किंमत सुध्दा कमी नाही एक पीस ४० रुपयाला विकले जाते. ‘किंडर जॉय’ किंवा ‘किंडर सरप्राइज एग’वर अमेरिकन सरकारने बंदी घातली आहे. अमेरिकेत ‘किंडर जॉंय’ चॉकलेट खरेदी केल्यास 2,500 डॉलर्सचा दंड वसूल केला जातो. या चॉकलेटमध्ये ‘सरप्राइज टॉय’ असल्यामुळे अमेरिकन सरकारने यावर बंदी घातली आहे. परंतु, भारतीय बाजारात किंडर जॉय चॉकलेट खुलेआम विकले जाते. भारत सरकार यंत्रणेची याबाबत उदासीनता लक्षात येत आहे.

Disprin

खाली दिलेले औषध हे सहजरीत्या भारतात कुठेही उपलब्ध होतात. डिस्प्रिन, नोव्हाल्जिन, डी-कोल्ड, विक्स अॅक्शन-500, अॅट्रोक्विनॉल, फ्यूराक्सॉन अॅण्ड लोमोफेन, निमुलिड आणि ऐनल्जिन परंतु भारतात खुल्या बाजारात विकल्या जात आहेत. यामध्ये आढळणारे घटक Cisapride, Furazolidone and Nitrofurazone, Oxyphenbutazone,Metamizole (Analgin), Phenylpropanolamine काही काळाकरिता सरकारने यावर बंदी आणली होती आणि नंतर परत विक्री सुरु झाली. किडनी आणि लिवरवर याचे भयंकर परिणाम होतात.

हानीकारक कीटनाशकांवर बंदी

कधी आपण विचार केला नाही कि आपल्या रोजच्या अन्नावर किती भयंकर रसायने फवारले जातात. 67 हानिकारक कीटकनाशकांवर जगातील अनेक देशांमध्ये बंदी आहे. परंतु भारतीय बाजारात खुलेआम विकले जात आहेत. केंद्र सरकारद्वारा या कीटकनाटकांच्या विक्रीला ग्रीन सिग्नल दिला आहे. यात कार्बेरिल, एसीफेट, डाइमेथोएट, क्लोरपाइफॉस, लिंडेन, क्विनल्फॉस, फॉस्फोमिडॉन, कार्बैंडिज्म, ग्लाईफोसेट या सारख्या अनेक हानिकारक कीटकनाशकांचा समावेश आहे. हे रसायने शरीरावर परिणाम करतात. सध्या भारतात सेंद्रिय शेतीला चालना देण्याकरिता काही लोक काम करत आहेत. त्यांना सरकारने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे हे वाचल्यावर कळेलच..

भारतीय मधात आढळले एंटीबायोटिक्स

मध हा एक आयुर्वेदिक गुणधर्म असणारा पदार्थ परंतु काही भारतीय नावजलेल्या कंपन्या ह्यामध्ये भेसळ करत आहेत व सामन्य माणसाच्या शरीरास धोका पोहचवत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय बाजारात खुलेआम विकले जाणारे मध हे हानिकारक आहे. त्यात एंटीबायोटिक्स मिसळले असल्याचे सेंटर फॉर साइन्स अॅण्ड इन्वाइरनमेंटने 12 ब्रॅंडच्या मधाचे नुमने चाचणीसाठी पाठवले होते. 11 पैकी 6 नमुन्यांमध्या हानिकारक एंटीबायोटिक्स आढळून आले. यात डाबर, हिमालया, पतंजली, वैद्यनाथ, खादी आदी ब्रॅंडचा समावेश आहे. ह्या उत्पादनाचे नाव वाचल्यावर सर्वसामान्य माणसाला धक्का अवश्य बसेल.

कोलगेट टोटल टूथपेस्ट

कोलगेट टोटलमध्ये असणारे रसायन triclosan चा प्रयोग जनावरावर केल्यास संशोधकांना आढळले कि यामध्ये कैन्सरच्या पेशींची वाढ करणारे आहेत. यामुळे अमेरिकेतील मिनेसोटा या राज्यात कोलगेटवर बंदी घालण्यात आली होती. परंतु हा टूथपेस्ट भारतात खुल्या मार्केटमध्ये खुलेआम विकला जातो. त्यामुळे वाचून राहिलेलं बर निर्णय तुमचा

विक्स बाम

विक्स वेपरब हे भारतात मोठ्या प्रमाणात सर्दी खोकल्या पासून तुरंत आराम मिळण्याकरिता वापरला जातो. परंतु युरोपियन व दक्षिण अमेरिकेत ह्या वस्तूवर बंदी आहे. संशोधकांनी सांगितले आहे वीक्समुळे शरीरावर भयंकर परिणाम होतात. जगात बंदी असून सुध्दा भारतात हि कंपनी खुल्या मार्केट मध्ये काम करत आहे आणि येथील लोकांच्या जीवासोबत खेळत आहे.

source:- Quora

हि माहिती अवश्य शेअर करा सरकार उदासीन आहे परंतु सजग नागरिक म्हणून हि माहिती सर्वापर्यंत पोहचविणे आपले कर्तव्य आहे.

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *