जनरल हरबख्श नसते तर पाकिस्तानमध्ये असते पंजाब

अमृतसर-1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे झाले. या युद्धात अनेक सैनिकांनी जीवाची बाजी लावली व भारताला विजय मिळवून दिला. या युद्धात पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि लष्कराचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सुध्दा भाग घेतला होता. त्यांना विचारल असता कि १९६५ च्या युद्धात भारताला कोण मुळे विजय मिळाला तर अमरिंदरसिंग सांगतात, की १९६५ च्या युद्धात एकच हिरो आहे ते म्हणजे लेफ्टनंट जनरल हरबख्शसिंग आहेत. त्यांनी जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती. त्यांच्या निर्णयामुळे भारताचे पारडे जड झाले. तेव्हा जर त्यांनी भारतीय लष्कराचे मनोबल कशामुळे वाढले असतील तर ते आहे हरबख्शसिंग यांनी हिम्मत दाखवून घेतलेला निर्णय. नाहीतर पंजाब पाकिस्तानमध्ये असता.

स्टर्न कमांडचे जीओसी इंचार्ज असताना अचानक हरबख्शसिंग यांनी अमृतसर सोडून व्यासकडे येण्यास सांगितले. परंतु त्यांनी ती जागा सोडण्यास नकार दिला आणि त्यांनी तेथेच ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वात भारतीय लष्कराने शौर्याची गाथा रचली. खेमकरणच्या रस्त्याने पाकिस्तान मोठी सैन्यशक्ती घेऊन आक्रमण करीत होता. त्याला हरबख्शसिंग यांनी सडेतोड उत्तर दिले. शत्रूला मागे जाण्यास भाग पाडले. त्यांनी त्या वेळेस दाखविलेली निर्णयक्षमते मुळे हे होऊ शकले कारण त्यांनी येणारा धोका ओळखला होता.

अमरिंदर सांगतात, की 1965 चे युद्ध पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांच्या महत्त्वाकांक्षेची परिणती होती. त्यांनी पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती अयूब खान यांना सांगितले होते, की आपण जर काश्मिरात शिरलो तर तेथील जनता आपल्याला मदत करेल. त्यानंतर युद्ध करण्याची परिस्थिती येणार नाही. त्यांनी मे महिन्यात ऑपरेशन जिब्राल्टर आखले.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. काश्मिरच्या जनतेला याची माहितीच नव्हती. काश्मिरच्या जनतेने पाकिस्तानला मदत केली नाही. महंमद गुजर यांनी स्थानिक पोलिसांना पहिल्यांदा सांगितले होते, की तंगमर्गजवळ काही संशयास्पद घडामोडी दिसत आहेत. त्यानंतर आम्ही सक्रीय झालो. पाकिस्तानने या ऑपरेशनचे नाव ग्रॅंडस्लॅम लॉंच हे ठेवले व ते सुरु केले. जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये आगेकूच केली.

योजना आखून पाकिस्तानचे लक्ष विचलित केले

भारतीय हवाई दलाने हल्ले सुरु केले होते. त्यांचे लक्ष विचलित करण्याकरिता दुसरीकडे हरबख्शसिंग यांनी योजना तयार कएली व पाकिस्तानी लष्कराचे लक्ष्य विचलित करण्यावर भर दिला. पाकिस्तानी लष्कर खेमकरणपर्यंत आले होते. त्यांना पंजाब फ्रंट उघडायचे होते. हरबख्श यांनी अखनूरला वाचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा पार करण्याची तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना परवानगी मागितली. हे फार आव्हानात्मक होते. पण शास्त्रींनी यास लगेच होकार दिला. त्यानंतर भारतीय लष्कर खेमकरणमध्ये पाकिस्तानी लष्करासमोर भींतीसारखे उभे राहिले. एक इंचही पुढे सरकू दिले नाही.

खेमकरणमध्ये टॅंकची थरारक लढाई

पाकिस्तानकडे अमेरिकेचे पॅटर्न टॅंक होते. सेबर जेट होते. त्यांच्याकडे अमेरिकेचे अत्याधुनिक शस्त्रे होती. पण त्यासोबत अहंकारही होता. आम्ही हिंमतीने काम घेतले. खेमकरणच्या असल उत्तर गावात टॅंकचे भीषण युद्ध झाले. अब्दुल हमीद यांनी रिकॉयललेस जीपमधून पाकिस्तानचे सात टॅंक उडवून लावले. आम्ही पाकिस्तानी लष्कराला माघार घेण्यास भाग पाडले. या गावात पॅटर्न टॅंकचे स्मशान केले.

हरबख्शसिंग यांच्या चातुर्यास व हिंमतीस खासरेतर्फे सलाम

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *