११ भारतीय सिरियल किलर च्या गोष्टी ज्या वाचून आजही तुमच्या अंगावर काटे येतील.

सिरीयल किलर म्हणजे एक प्रकारे मनोरुग्ण ज्यांना खून करायला आवडतात असे लोक, मागील काही दशकात भारतातील असे काही सिरीयल किलर आपण खासरे वर वाचणार आहोत ज्यांच्या गोष्टी खासरेवर बघूया…

बिअर मॅन

ऑक्टोबर 2006 ते जानेवारी 2007 च्या दरम्यान, दक्षिण मुंबईतील सात हत्याकांसादरम्यानचा एकमेव संबंध बियरच्या बाटल्यांशी होता. या बिअर च्या बाटल्याने तो कुणाचीही हत्या करत असे.अशाच हत्याकांडात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असली तरी पुराव्याच्या अभावामुळे त्याला सोडण्यात आले.बीअर मॅन आजही रस्त्यावर फिरत आहे.

दरबारा सिंग

2004 मध्ये जालंधरमध्ये स्थलांतरित व पंजाबी नसलेल्या 23 मुलांचे अपहरण व खून करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा दरबारा सिंग हा एक निवृत्त भारतीय सैनिक आहे. मुलांचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले की हा व्यक्ती मुलांना चॉकलेट व गोड पदार्थ देऊन बेशुद्द करून त्यानंतर त्यांचा गळा दाबून मृतदेहांवर बलात्कार करत असे. त्याने म्हटले की त्याला या गोष्टीचा कसलाही पश्चाताप नव्हता आणि तो “प्रत्येक हत्या मद्य आणि मास खाऊन साजरा करत असे.”

सायनाइड मोहन

सायनाईड “मोहन कुमार हे प्राथमिक शाळेतील शिक्षिक होते, त्यांनी 2005 ते 2009 दरम्यान कर्नाटकमध्ये 20 महिलांचा खून केला होता. अविवाहित स्त्रियांना टार्गेट करत असे. त्यांच्या सोबत प्रेम संबंध स्थापून,लग्नाचे अमिष दाखवून पळवून घेऊन जात असे आणि मग त्यांच्याबरोबर रात्र घालवून सकाळी गर्भधारणा टाळण्याच्या निमित्ताने सायनाइड-लेसड ही गर्भनिरोधक गोळी म्हणून देत असे. ती महिला मृत्यूमुखी पडली की तो त्यांचे दागिने व पैसे घेऊन फरार होत असे. आता तो सध्या स्वतःच्या फाशीची वाट बघत आहे.

सायनाइड मल्लिका

अस म्हंटल जात की,ती भारताची पहिली महिला सिरीयल किलर आहे,सायनाइड मल्लिकाने 1999 ते 2006 दरम्यान किमान सहा महिलांची हत्या केली. ती स्थानिक मंदिराच्या परिसरातील श्रीमंत महिलांशी मैत्री करत असे आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानापासून दूर असलेल्या देवळात येण्यास सांगत असे. देवतांना शांत करण्यासाठी त्या महिलांना उत्तम कपडे आणि दागिणे घालून यायला सांगत असे. तिथं त्या महिला गेल्या की त्यांना सायनाईड असलेला प्रसाद आणि “पवित्र पाणी” देऊन त्यांना लुटत असे. सायनाईड मल्लिकाला पहिल्यांदा फाशीची शिक्षा मिळाली पण नंतर ती रद्द करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

चंद्रकांत झा

नौकरीसाठी भटकणाऱ्या युवकांना नौकरी मिळवून देतो असे सांगून त्यांच्या राहण्याखाण्याची सोया कडून देत असे.नंतर तो त्यांना ठार मारून त्यांच्या शरीराच्या अवयवाचे तुकडे तुकडे करून टाकत असे, आणि त्यांचे हातपाय नवी दिल्लीच्या आसपास फेकून देत असे (कारण का तर त्याला शाकाहारी व्यक्ती आवडत नसे म्हणून). पोलिसांची मस्करी करण्यासाठी त्याने दोन वेळा तिहार कारागृहाजवळ तुकडे केलेले मृतदेह फेकले होते. असेही आरोप करण्यात येत आहे की,तो बळींची हत्या केल्यावर, त्याच खोलीत राहून त्यांचे मास खाई. झा नी केलेल्या कृत्यांवर कधीही पश्चाताप व्यक्त केला नाही,शेवटी त्यांला फाशीची शिक्षा देण्यात आली.

डॉ.देवेंद्र शर्मा

देवेंद्र शर्मा हे आयुर्वेदिक डॉक्टर होते, त्यांनी स्वत: च्या कबुलीजबाबाने 2002-03 च्या दरम्यान उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानमधील 30-40 टॅक्सी चालकांची हत्या केली. टॅक्सी केल्यावर तो एका निर्जन स्थळावर टॅक्सी घेऊन जात असे तिथे त्याचे साथीदार वाट पाहत उभे राहत,तिथे गेल्यावर ड्रायव्हरला अगदी मरे पर्यंत मारत आणि तो मेला की त्याची गाडी घेऊन पळून जायचे. तो म्हणाला की, ड्रायव्हर शी कुठलाही वाईटपणा नव्हता पण त्याला रक्तपात करायला आवडत असे म्हणून तो असे कृत्य करत असे. त्याच्यासह आणखी दोन सहकारीना दोषी ठरवून गुरगाव येथील तुरुंगात पाठवण्यात आले.

किलर बहिणी

त्यांच्या घमेंडी आईच्या आदेशानुसार, रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांनी 1990 ते 1996 दरम्यान 13 मुलांचे अपहरण केले. त्यांना पॉकेटमार बनण्यासाठी व इतर गुन्हेगारी कृतींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षित केले जात असत. या काळात अपहरण केलेल्यापैकी 9 जणांना कथितरित्या ठार केले कारण ते मोठे झाले की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत असे म्हणून. तुरुंगात असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला, तर या दोन बहिणी स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

जोशी-अभ्यंकर सिरियल किलर

1976 ते 1977 दरम्यान चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी – राजेंद्र जक्कल, दिलीप ज्ञानोबा सूतार, शांताराम कान्होजी जगताप, आणि मुनावर हरुन शाह यांनी अपहरण, दरोडा, आणि खूनांमुळे पुण्यात दहशत निर्माण केली. ते घरांमध्ये घुसून संपूर्ण कुटुंबांना बांधून ठेवत व लूटमार करून पळून जात.त्यांनी केवळ एका वर्षामध्ये दहा जणांना गळा दाबून मारले होते. 1983 मध्ये येरवडा कारागृहात चारही खुनींना फाशी देण्यात आली होती.अनुराग कश्यपचा वादग्रस्त चित्रपट “पाच” याच टोळीवर आधारित आहेत.

कांपतीमार शंकरिय

एकेकाळी जयपूर आणि तेथील परिसरात याचीच दहशत होती त्याने 1977 आणि 1978 च्या दरम्यान 70 पुरुष आणि स्त्रियांना ठार केले.तो हथोड्याने मरेपर्यंत व्यक्तीला मारत असे, त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला ह्या गोष्टी करताना आनंद वाटत असे.तो केवळ 27 वर्षाचा होता, 1979 मध्ये त्याला फाशी देण्यात आली.

“सायको” शंकर

एम. जयशंकर हा 21 व्या शतकातील भारतातील सर्वात कुविख्यात सिरीयल मारेकरी होता.त्याचा तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील 30 बलात्कार, खून आणि दरोडा प्रकरणामध्ये सहभाग घेतला होता.तो एका कोयत्याने हत्या करत असे जे त्याच्या काळ्या बॅग मध्ये नेहमी सोबत असे.त्याला पकडल्यावर दोनदा तो तुरुंगातून पळाला होता. शेवटी परत एकदा त्याला पकडण्यात यश आले आणि त्याला मानसिक आजार असल्याचे निदान झाले.आता सध्या बेंगळुरूच्या तुरुंगामध्ये तो कैदेत आहे.

ऑटो शंकर

1988 ते 1989 दरम्यान, गौरी “ऑटो” शंकर यांने चेन्नईतील सहा मुलींचे अपहरण करून हत्या केली. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की, पीडितांच्या कुटुंबांनीच त्यांना वेश्याव्यवसायामध्ये विकले असेल,पण एका वाहन चालकाने शाळेतील मुलीला वाइन शॉपसमोर अपहरण करण्याचे प्रयत्न केल्याची तक्रार शाळेतल्या मुलीने केली असता त्यांना लक्षात आले आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याने हत्या केलेल्या सर्व मुलींचा अंत्यसंस्कार करून त्यांची राख समुद्रात फेकून देत असे. 1995 मध्ये त्याला फाशी देण्यात आली.

मला लिहताना अंगावर काटा आला तुम्हाला अस वाटल का ?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *