भारतातील एक घटक- हिजड्यांच्या संस्कृतीबद्दल १५ रंजक व दुर्मिळ तथ्य…

हिजड्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघता त्यांना आजच्या काळापेक्षा पूर्वी फार महत्वाचे व आदराचे स्थान होते. जगामध्ये “तृतीय पंथ” म्हणून मान्यता मिळाल्यामुळे त्यांना भारत तसेच इतर आशियाई देशांसारख्या देशात राहणे कठीण झाले आहे. आम्ही तुम्हाला हिजड्यांबद्दल काही रोचक तथ्ये खासरेवर देणार आहोत, जे भारताचा एक अविभाज्य भाग आहेत.

सर्वसाधारणपणे, हिजड्यांचे जन्मतः सर्व कार्य पुरुषाप्रमाणेच असतात, त्यांच्यापैकी केवळ मोजकेच हे द्वीलिंगी असतात.

उर्दू आणि हिंदी शब्द हिजरा या शब्दापासून पर्यायी शब्द म्हणून हिजीरा,हिजडा, हिज्रा किंवा हिजरा हे शब्द प्रचलित झाले.

रोमन नावाच्या ‘हिजरा’ या शब्दाला उर्दू भाषेत अडचणीचे मानल्या जाते आणि म्हणूनच ख्वाजा सारा या शब्दाचा सहकारी म्हणून वापरला जातो.

रेणुका माता व बहुचरा माता माता यांच्या वर ते अत्यंत आस्थेने श्रद्धा ठेवतात त्यांच्या मते या देवींजवळ मानवाचे लिंग बदलवायचे अलौकिक सामर्थ्य आहे.

स्त्रियांचा पेहराव केलेल्या पुरुषास जोगप्पा म्हणून ओळखतात. ते हिजड्यासोबत विवाह सोहळा किंवा अनेक कार्यक्रमात आशीर्वाद देण्यासाठी नृत्य वगैरे करतात.

बहुतांश हिजडे समाजाच्या दूर राहणे पसंद करतात. त्यांचा उत्पन्नाचे स्रोत हे विविध समारंभात आशीर्वाद देण्यासाठी केलेल्या नाच तसेच भीक मागणे हा आहे. व काहींचा कमाईचा मुख्य मार्ग हा वेश्या व्यवसाय हा आहे.

१५ एप्रिल २०१४ रोजी, राष्ट्रीय कायदे सेवा प्राधिकरण. भारतातील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील लिंगपरिवर्तन केलेल्याना तृतीयपंथी किंवा तृतीय लिंग चा दर्जा देऊन त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घोषित करून त्यांना रोजगार तसेच शिक्षण यामध्ये विशेष सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय दिला.

हिजड्यांच्या एक गुप्त भाषा आहे त्यांस हिजरा फारसी म्हणून ओळखले जाते. उर्दु भाषेतील काही शब्द तसेच इतर भाषेतील काही अनोळखी शब्दांचे एकत्रीकरण करून ही भाषा तयार झाली आहे.

भारतात हिजड्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई-दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुमारे पाच हजाराहून जास्त हिजडे आहेत. ते २०-३० च्या समूहाने राहतात.पूर्ण देशातील त्यांची संख्या ही जवळपास ५० हजार ते १लक्ष एवढी किंवा त्याहून अधिक असू शकते.

अनेक हिजडे हे वेश्या व्यवसायाचे काम करतात आणि आणि जिथे हा व्यवसाय चालतो तेथे एक मॅनेजर किंवा मॅडम (जो एक हिजडा असतो) यांच्या देखरेखीखाली हा व्यवसाय असतो. तो सर्व रक्कम त्याच्याकडून एकत्र करतो व त्यानंतर त्यांच्या गरजा भागविण्यासाठी अन्न, वस्त्रे तसेच थोडासा त्यांना आर्थिक मदत म्हणून भत्ता दिला जातो तसेच पोलीस किंवा गुंडांपासून संरक्षण करण्यासाठी थोडी रक्कम काढली जाते.

हिजड्यांची सामाज रचनेचा मुख्य सिद्धांत म्हणजे गुरू आणि त्यांचा चेला किंवा शिष्य यांच्यातील संबंध. गुरू मूलतः त्यांच्यासाठी माता किंवा पिता असून ते त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी तसेच अनेक पैलूंवर मार्गदर्शन करतात.

संपूर्ण हिजडा होण्याकरिता एक किचकट व अमानुष प्रक्रिया राबवून हिजड्याची पूर्ण पुरुषाच्या जननेंद्रियांतील सर्व किंवा काही भाग काढून टाकले जाते. हि शस्त्रक्रिया हिजड्याचा पुनर्जन्म मानला जातो. असे म्हटले जाते कि हि शस्त्रक्रिया केल्या नंतर त्या नपुसंक पुरुषाचे रुपांतर हे सामर्थ्यवान हिजड्यामध्ये होतो.

हिजड्यांचे असे मानणे आहे की, जो कोणी नपुंसक मनुष्य जो देवीस भक्ती करण्यास विरोध करतो तो सात जन्मासाठी नपुंसक होऊन जातो.

हिजड्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील मुख्य सदस्य किंवा समूहातील मोठी व्यक्ती ही त्यांच्या अंत्यविधीची तयारी करतो. आणि त्याच्या निगराणीमध्ये हि प्रक्रिया पूर्ण होते.

हिजडे हे भगवान शिवाची पूजा करतात. त्यांच्या मते शिवाचे अर्धस्त्री-अर्धपुरुष (अर्धनारीश्वर) हे रूप आहे. कारण या रुपात भगवान शिव हे त्यांच्या पूर्ण शक्तीत आलेले आहे.

वरील तथ्य तुम्हाला आवडल्यास अवश्य शेअर करा… आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा तृतीयपंथीय आई गौरी सावंतची कथा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *