मद्यसम्राट विजय माल्या याचा जीवनपट आणि त्याचे चंगळवादि आयुष्य…

‘मद्यसम्राट’ म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या विजय माल्या हे सध्या भारतात नाही आहे. भारताचे ६००० करोड रुपये बुडवून ते भारतातून पळ काढून प्रदेशात स्थायिक झाला. आपल्‍या व्‍यावसायिक जीवनात अनेक चढ-उतार त्‍यांनी पाहिले आहेत. प्रत्‍यक्षात त्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या अचूक निर्णयामुळे ‘किंग ऑफ गुड टाईम’ असे म्‍हटले जात होते. आपल्‍या निर्णयावर त्‍यांचा अतूट विश्‍वास आहे. त्‍यामुळेच त्‍यांना ही विशेषण मिळाले. माल्‍यांचे जीवन प्रत्‍यक्षात यशापेक्षा अपयशांनी जास्‍त भरलेले दिसते.

मनोरंजक गोष्‍ट ही आहे, की विजय माल्‍या यांना व्‍यवसायात अजिबात आवड न‍व्‍हती. माल्‍यांनी उद्योजक व्‍हावे अशी त्‍यांच्‍या वडीलांची इच्‍छा होती. त्‍यासाठी ते त्यांना मारपण देत असत. विजय माल्‍या यांनी स्‍वत:ची सध्‍याची स्थिती वडीलांच्‍या चपराकीमूळे आणि मारामुळे असल्‍याचे सांगितले. ते म्‍हणतात, की वडीलांच्‍या चपराकीमुळेच माझ्या जीवनात बदल झाला. आणि मी उद्योजक झालो. आरामदायी जीवन, त्‍यांच्‍या लग्‍झरी, त्यांच्या कार, त्‍याबरोबर त्‍यांची पत्‍नी यांच्‍याशी संबंधीत अनेक रोचक गोष्‍टी. तर जाणून घेऊयात विजय माल्यांच्या आयुष्‍यावर आधारीत काही खासरे बाबी..

vitthal mallya

एक अफवा अशी पसरवली जाते कि विजय माल्या हे भंगार उचलत होते आणि त्यानंतर ते उद्योजक झाले. परंतु वस्तुस्थित वेगळी आहे. भारतातील उद्योजक म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या विजय माल्या यांचा जन्‍म 8 डिसेंबर 1955 मध्ये कोलकता येथे झाला. त्‍यांचे वडील विठ्ठल माल्या हेसुध्‍दा एक मोठे उद्योजक होते. त्‍यांच्‍या आईचे नाव ललिता रमई हे आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी वडिलाच्या आजारामुळे त्यांच्यावर युबी ह्या उद्योग समुहाची जवाबदारी आली. वयाच्‍या 28 व्‍या वर्षापासून विजय माल्‍या युबीगृपची संपूर्ण काम बघू लागले. कंपनी त्यावेळेस तोट्यात चालत होती. परंतु या युवकाने परिस्थिती हाताळत आणि कंपनीला घाट्यातून बाहेर काढले.

विजय माल्या लहानपणापासून रॉयल आयुष्य जगत होते. वयाच्या चौथ्याच वर्षी तो फेरारी या कार मध्ये फिरत होता परंतु आपल्‍या मुलाने कोणत्‍याही क्षेत्रात गेले तरी टॉप असायला हवे असे विठ्ठल माल्‍ल्‍या यांना वाटायचे. त्‍यांच्‍या आईनेही त्‍यांना समजवण्‍याचा प्रयत्‍न केला; पण व्‍यर्थ. माल्यांमध्‍ये काहीच बदल होत नसल्‍याचे पाहून विठ्ठल माल्या यांनी विजय माल्ल्या 9 वर्षांचे असताना चपराक मारली. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या माल्याना हि चपराक खोलवर लागली आणि तेव्‍हापासून विजय माल्या सर्वच क्षेत्रांत टॉपर राहिले.

विजय मल्या आणि त्याचा दिलफेक अंदाज सर्वत्र प्रसिध्द आहे. त्यांनी आत्तापर्यत दोन लग्न केलेली आहे. त्‍यांच्‍या पहिल्‍या पत्‍नीचे नाव समीरा होते. ती पूर्वी एअर इंडिया एअरलाईन्‍सची हवाईसुंदरी होती. या दोघांचा मुलगा म्‍हणजे सिध्‍दार्थ होय.

समीरानंतर विजय माल्‍या यांनी बंगरूळ येथे आपल्‍या शेजारीच राहणा-या रेखाशी सुत जुळले आणि त्याने तिच्याशी लग्न केले. रेखाचे पहिले लग्न झालेले होते तिला लैला नावाची एक मुलगी आहे व तिचा पती मेहमूद हा विजय मल्ल्याचा चांगला मित्र होता.माल्‍यांनी मुलीला घटस्फोटानंतर दत्‍तक घेतले. पुर्वीची लैला मेहमुद आता लैला माल्या म्‍हणून ओळखली जाऊ लागली. आयपीएल दरम्‍यान लैला ललित मोदी यांच्‍यासोबत काम करत होती. आयपीएलच्‍या वादांमध्‍ये ललित मोदीसमवेत तिचे नावही जोडण्‍यात आले होते.

या दोघांना आता दोन मुलीही आहे. त्याचे नाव लीना आणि तनया आहे. रेखा सध्या तिच्या मुलीश कॅलीफोर्नियामध्ये असते. सिध्‍दार्थचे बालपण त्‍याच्‍या आईसोबत इंग्‍लडमध्‍ये गेलेले आहे. म्हणून मागील काळात सिद्धार्थ व विजय मल्ल्या नेहमी सोबत रहायचे.

मद्याच्‍या उद्योगातून मिळणा-या पैशातून विजय माल्‍या यांनी जगभर आपला उद्योग समुह विस्‍तारीत नेला. गेल्या वर्षापर्यंत विजय माल्यांवर 7050 कोटी रूपयांचे कर्ज होते. आणि हा तोटा वाढतच गेला. पैसा भरण्याला दुसरा मार्ग म्हणून मल्ल्या देश सोडून पळून गेले आहे.

त्याची lavish आयुष्यामुळे तो नेहमी चर्चेत राहतो. कार, घोड्यांवरून सैर करणे आवडते. त्‍यांच्‍या मनात आले तेव्‍हा ते जगाचा फेरफटका मारतात. मुड बदलल्यास ते विमानात तर कधी पाण्‍यातून प्रवास करतात. पाण्‍याखाली सैर करण्‍यासाठी त्‍यांची 450 कोटी रुपयाची यॉट आहे. विजय माल्या यांना र‍ेसिंग कारची हौस आहे. दुनियेतील सर्व प्रकारच्‍या 100 पेक्षा अधिक कार त्‍यांच्‍याकडे आहेत.

मैबैक, पोर्श, फेरारी, बीएमडब्‍लू, रॉयल्‍स रॉयस अशा कितीतरी आलिशान गाडया त्‍यांच्‍याकडे आहेत. तारुण्‍यापासूनच त्‍यांना गाडयांचा शौक आहे. देशातील फार्मूला वन शर्यतीचे पहिले मालक विजय मल्ल्या हे आहेत.

अमेरीकीच्या राष्ट्राध्यक्षासारखे विजय माल्यांकडे काही खासगी जेट विमाने आहेत. त्‍यापैकी ‘ए 319’ हे एका हॉटेलप्रमाणे सुंदर आहे. 108 कोटी रूपयाचे ‘गल्‍फस्‍ट्रीम’ या प्रकारातील विमाने 3 आहेत. त्‍याचबरोबर जवळपास 270 कोटी रूपयाचे ‘हॉकर 125’ त्यांच्याकडे आहे. या तीनही जेट विमानांमध्‍ये सगळया सुविधा आहेत. त्‍यामध्‍ये कस्‍टम फिटेड ऑफीस, गेम कनसोल, सेटेलाइट टीव्ही तसेच वायरलेस कम्‍युनिकेशन यंत्रणा अंतर्भूत आहे.

ह्या विमानला त्याने त्याच्या पद्धतीने बनविण्या करिता जवळपास 216 कोटी रूपये खर्च केले होते. माल्‍ल्‍यांनी 1004 चौरस फुट क्षेत्रफळाच्‍या विमानात अप्रतिम बोर्ड रुम, एक्‍झीकेटीव्‍ह ऑफिस आणि बेडरूम बनवले होते.

अशी होते विजय मालयाचे आयुष्य आता तो भारतात नाही पण त्याने केलेल्या या गोष्टीमुळे तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. आयपीएल मध्ये क्रिकेट टीम असो का स्त्रिया सोबत त्याचे फोटो तो नेहमी प्रसिद्धीचा विषय..

त्याला सद्बुद्धी लवकर सुचो व भारतात परत येऊन कर्जाची परतफेड करून नवीन दमाने उद्योग क्षेत्रात परत पदार्पण करो ह्याच शुभेच्छा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *