WWE मधील पहिली भारतीय महिला भल्याभल्यांना देत आहे धोबीपछाड…

काही दिवसा अगोदर सोशल मिडीयावर सलवार कुर्ता घातलेल्या एका मुलीचा विडीओ वायरल झाला जी WWE मध्ये विदेशी पेहलवानाना चांगलीच पटकनि देत आहे. तो विडीओ खाली दिलेला आहे. भारतीय वेशात हि मुलगी कोण असा प्रश्न सर्वाना पडला असेल. माझ्याकरिता तर हा प्रसंग पहिल्यादा होता.

आमच्या खासरे टीमनि तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ती खरोखरच भारतीय आहे हे वाचल्यावर तुम्ही थक्क होसाल. तिचे नाव आहे कविता देवी. पॉवरलिफ्टर कविता देवी हि पहिली भारतीय महिला आहे जिने WWE मध्ये स्थान मिळविले आहे. भारता करिता हि अभिमानाची गोष्ट आहे.

दक्षिण आशिया सुवर्णपदक विजेता कविता देवी wwe दुबई येथे झालेल्या Mae Young Classic tournament मध्ये तिने भाग घेतला आहे. ती एकमेव भारतीय महिला आहे जी या ठिकाणी पोहचली.

मूळ हरियाना येथील असलेल्या कविताने तिचे व्यावसायिक प्रशिक्षण ग्रेट खली याच्या मार्गदर्शना मध्ये घेतलेले आहे. त्याच्या पंजाब येथील प्रशिक्षण केंद्रात तिची ट्रेनिंग पूर्ण झाली. तिला प्रसिद्धी हि तिने खेळलेल्या सामन्यामुळे मिळाली ज्यामध्ये ती B B Bull Bull या स्त्री रेसलरला ती पटकनि देते. सोशल मिडीयावर हा विडीओ प्रचंड प्रमाणात वायरल झाला होता.

आणि विशेष म्हणजे ती सामन्या दरम्यान सलवार कुर्ता हा भारतीय पेहराव घालून आखाड्यात उतरत असते. तयार रहा न्यूझीलंड येथे होणार्या WWE इवेन्ट मध्ये ती आखाड्यात परत उतरणार आहे.

म्हणूनच भारतीय नारी सबपे भारी…
वाचा तेराव्या वर्षी एवरेस्ट सर करणारी मुलगी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *