जाणून घ्या सत्य कोण आहे राहुल गांधी सोबत दिसणारी हि मुलगी…

काही दिवसा अगोदर राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचा फोटो एका युवती सोबत सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. काही वेबसाईट या संबंधित खोट्या गोष्टीचा प्रचार करीत आहे. सध्या सोशल मिडीयावर ह्या गोष्टी सतत घडत राहतात. तर एकूण हे सर्व प्रकरण सुब्रमण्यम स्वामीच्या ट्विट पासून सुरु झाले ज्या मध्ये त्यांनी राहुल गांधीचा मूर्ख म्हणून उल्लेख केलेला आहे. ट्विट खाली दिलेले आहे.

ह्या ट्विटनंतर विविध वेबसाईट या गोष्टीवर खोट्या गोष्टी रंगवून बातम्या बनवू लागल्या कि राहुल गांधीची हि प्रेयसी आहे. त्या दोघांनी रात्र सोबत घालवली इत्यादी इत्यादी याचे काही नमुने आम्ही तुम्हाल खाली देत आहोत.

frontpagetruth.com article

फेसबुकवर सुध्दा कीळसवाने कैप्शन देऊन ह्या बातम्या शेअर करण्यात आलेल्या आहे. तुम्ही सर्च केल्यावर असल्या अनेक लिंक तुम्हाला भेटतील.

asbtoday.com article

आता प्रश्न हा पडतो कि नाथिलिआ रामोस हि आहे कोण ?

नाथिलिआ रामोस हि एक स्पेनिश ऑस्ट्रेलियन अभिनेत्री आहे.सध्या तिचे वास्त्यव्य अमेरिकेमध्ये आहे. तिचा जन्म ३ जुलै १९९२ ला स्पेनच्या मॅड्रीड येथे झाला. तिची आई मूळची ऑस्ट्रेलियाची असून वडिल स्पेन्सचे आहेत. तिचे वडील हुआन कार्लोस स्पेनचे लोकप्रिय पॉप गायक आहेत.

ती एक उत्तम गायक सुध्दा आहे. अनेक हॉलीवूड चित्रपटात ती झळकलेली आहे. २००७ मध्ये ब्रेट्ज Bratz या सिनेमामध्ये ती यास्मिनच्या रोल मध्ये होती. तर २०११मध्ये आलेला हॉरर चित्रपट The Damned मध्ये तिने जिल हे पात्र निभावलेले आहे. २०१४ मध्ये तिने Switched At Birth या टीव्हीशो मध्येही काम केलेले आहे. २०१६ साली तिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.

इंडिया @७० या कार्यक्रमात राहुल गांधी व तिची भेट झाली आणि तिने त्या भेटीनंतर दोघाचा हा फोटो शेअर केला आहे. प्रेयसी वगैरे ह्या सर्व अफवा आहेत. या कार्यक्रमानंतर तिने राहुल गांधीची स्तुती केलेली आहे. नथालिया रामोस यांनी असे लिहिले आहे की जगातील विविध भागांतील प्रतिभावान विचारवंतांना ऐकण्याची- भेटण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे.यूसी बर्कले, प्रिंसटन यूनिवर्सिटी और टाइम्स स्कवॉयर येथे राहुल गांधीचे कार्यक्रम झाले होते.

फेसबुक वरील नथालीयाची पोस्ट
सोशल मिडियामध्ये सावध राहणे आवश्यक आहे कारण कधी कोणाबाबत खोट्या बातम्या पसरवितात हे सांगता येणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *