अक्षय कुमारने परत सिद्ध केल कि तो मनाचा हिरो आहे, सिनेमात पहिल्यांदा काम देणाऱ्या निर्मात्याच्या किडनी ट्रान्सप्लंट केली मदत..

अक्षय कुमार सिनेसृष्टीमधील मनानेही हिरो असणारा अभिनेता आहे. तो नेहमी बरोबर बोलतो आणि बरोबर वर्तवणूकहि करतो. कधी अक्षय कुमार कुठल्याही वादात राहत नाही.

काही दिवसा अगोदर अक्षय कुमारने उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. आणि इतरानाही मदत करण्याकरिता प्रोत्साहित केले. ज्या वेळेस संपूर्ण मिडिया नोटबंदी वर चर्चा करत होती तेव्हा अक्षय कुमार शहीद जवानांच्या कुटुंबास मदत करत होता. स्वच्छ भारत अभियाना करिता त्याने केलेली मदत असो कि रस्त्यावरील गरीब मुलांना दिलेली आर्थिक मदत तो नेहमी प्रेक्षकांचे मन जिंकतो.

आज सुध्दा अक्षयने सिद्ध केले कि तो मनानेसुध्दा खरा हिरो आहे.

संयोग श्रीवास्तव नामक एका व्यक्तीने अक्षय कुमार यांना tweet केले कि त्यांचा पहिला निर्माता आणि चांगला मित्र रवी श्रीवास्तव हा किडनीच्या आजाराने त्रस्त आहे आणि मरण यातना भोगत आहे.

हे त्या व्यक्तीचे tweet होते. सर्वत्र प्रसिद्ध असलेले नाव कसे काळाच्या अंधारात गेले कोणालाही कळले नाही.

दुखाची गोष्ट हि आहे कि रवी श्रीवास्तव यांनी २५० पेक्षा जास्त सिनेमाचे निर्माता म्हणून काम पहिले आहे. आणि त्यांच्याकडे किडनी ट्रान्सप्लंट करिता पैसा नाही. परंतु अक्षय कुमार याने क्षणाचाही विलंब न करता त्यांना मदत केली.

रवी श्रीवास्तव हे सहायक निर्माता म्हणून बॉलीवूडमध्ये काम करत होते. ते चांगले डिझायनर सुध्दा होते. बिवी हो तो ऐसी, तेरी मेहरबनिया, हुकुमत, तेहलका सारख्या सिनेमाचे पोस्टर त्यांनी डिझाईन केले होते. सध्या आलेला रौडी राठोड या सिनेमाचे पोस्टर हि रविनेच डिझाइन केले होते. परंतु काळाच्या पडद्याआड ते लवकरच चालले गेले.

Akshay Helped Producer

जुहू एरियामध्ये रविचे ऑफिस होते. येथे नेहमी केशु रामसे, गुलशन कुमार, के सी बोकाड़िया, धीरज कुमार सर्व रविकडून काम करून घेण्याकरिता येत असे. अक्षय कुमार, अजय देवगन, राहुल रॉय, रोनित रॉय यांचा नेहमीचे हक्काचे बसायचे ठिकाण म्हणजे रविचे ऑफिस होते.

त्या काळात केषु रामसे यांना त्यांच्या सिनेमा सौगंध करिता नवीन चेहरा हवा होता तेव्हा अक्षय कुमार यांचा पहिला चित्रपट सौगंध या करिता रवीनि त्यांना मदत केली होती. एवढच नाही तर त्या नंतर एका स्वतःच्या सिनेमात रवीने अक्षयला काम हि दिले होते. ५ दवाखान्यामध्ये इलाज करून त्यांच्या किडनीवर काही परिणाम झाला नाही. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लंट करणे त्यांना आवश्यक होते.

किडनी ट्रान्सप्लंट करिता १५ ते १७ लाख रुपये खर्च येतो. तो संपूर्ण खर्च आता अक्षय कुमार करणार. याकरिता अक्षयला खासरे टीम तर्फे सलाम…

हा लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायचे विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *