निरोगी ह्र्दया करिता ५ आयुर्वेदिक इलाज…

हर्ट अटैकमुळे मानसाचा मृत्यू संभव आहे. आजकाल अटैकचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे आपले ह्रदय निरोगी ठेवायला आज खासरे वर आम्ही ५ नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होणारच…

लसण

भारतातील अदभुत शक्ति असणारे रोपटे, लसणामध्ये असे गुणधर्म आहेत जे अनेक रोगांना आपल्या शरीरापासून दुर ठेवतात. रोज लसणाची एका कळि जेवताना खाल्यास तुमच्या शरीरातील BAD कोलेस्ट्राल(LDL CHOLESTEROL) नियंत्रीत ठेऊन Good कोलेस्ट्राल (HDL CHOLESTEROL) वाढवण्यास मदत करते. रक्तदाब नियंत्रीत ठेवायला सुध्दा लसण गुणकारी आहे.
वैज्ञानिकांनी संशोधनात असा शोध लावलेला आहे की जे लोक नेहमी लसणाचे सेवन करतात त्यांचा रक्तप्रवाह हा सुरळीत चालतो. आणि अपायकारक रक्तपेशी निर्माण होत नाही.

लाल मिरची

तुम्ही मिरचीचा उपयोग भाजी तिखट करण्याकरीता करतात. परंतु लाल मिरची ही ह्रदयाकरीता चांगली आहे हे माहिती आहे का?
मिरचीमध्ये आढळणा-या कैप्सिकमया रसायनामुळे आपल्या रक्तवाहिन्या ह्या लवचिक राहतात व आपण यामुळे निरोगी राहतो. यामुळे रक्ताच्या गाठी पकडत नाही व येणा-या अटैकचे प्रमाण कमी होते. यामुळे LDL Cholesterol सुध्दा वाढत नाही. यामुळे रक्तदाब सामान्य राहतो.

अद्रक

Fresh, dried and powdered ginger

पचनाकरीता अद्रक चांगल असत हे सर्वानच माहिती आहे. परंतु अद्रकाच्या उपयोगामुळे तुमचे ह्रदय निरोगी राहते हे फार कमि लोकांना माहिती आहे. अद्रकामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होत नाही व ldl Cholesterol नियंत्रीत ठेवण्यास अद्रक उपयोगी आहे. संशोधकाच्यामते अॅस्परीन ह्या औषधापेक्षा प्रभावी अद्रक कार्य करु शके.

ग्रिन टी

ग्रिन टी ही परिपक्व न झालेल्या चहाच्या पानापासून बनविण्यात येते याची चव थोडी कडु राहते. काळ्या चहा पेक्षा ग्रिन टी मध्ये अॅटी ऑक्सिडन्टचे प्रमाण अधिक आहे त्याचे कारण यामध्ये आढळणारे epigllo catechin gallate हे नैसर्गिक रसायन आहे. रक्तप्रवाह करण्या-या धमण्यामधील आतील भागातील पेश्या ह्यामुळे चांगल्या राहतात. रोज तिन ते चार कप ग्रिन टी तुमचे ह्रदय व रक्तपेश्या निरोगी ठेवण्याकरीता अतिउतम आहे. परंतु अति प्रमाणात ग्रिन टी घेणे सुध्दा शरीरास हाणीकारक आहे.

कलमी

कलमीमध्ये tannins, triterpenoid saponins व flavonoids या नैसर्गिक रसायनामुळे ह्रदयासंबंधीत विकारांना दुर ठेवते. आयुर्वेदानुसार कलमी हे ताकदवान औषध आहे. अटैक दरम्यान आपला बचाव करणारे nitroglycerine औषधिचे चे कार्य कलमी पुर्ण करते. या व्यतिरीक्त LDL Cholesterol कमि करणे व रक्तदाब नियंत्रीत करण्याकरीता अर्जुना उपयोगी आहे.

पध्दत: कलमीचा छोटासा तुकडा घेऊन ८ तासाकरीता पाण्यात ठेवावा. त्यानंतर ते पाणी सकाळी उकळुन घ्यावे. त्यानंतर हा काढा रोज पिल्याने ह्रदय निरोगी राहते.

खालील गोष्टी ध्यानात ठेवा…

लसण, मिरची, अद्रक, ग्रिन टी ईत्यादीचा वापर दैनंदिन जिवनात करण्याकरीता कुठलाही अपाय नाही परंतु कलमीचा वापर करण्या अगोदर पदविधर आर्युवेदिक डॉक्टरचा अवश्य सल्ला घ्यावा. वरील आयुर्वेदीक उपचार वापरुन आपण आपल्या ह्रदयावरील ताण कमि करु शकता सोबतच अनेक वर्ष निरोगी आयुष्य जगु शकता…

पोस्ट आवडल्यास अवश्य शेअर करा…
वाचा सुंदर त्वचा राखण्याकरिता १५ घरगुती उपाय..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *