हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर लवकर व्हाल म्हातारे…

आपले दैनदिन राहणीमान आपल्या शरीरावर परिणाम करत असते. आपल्या रोजच्या अन्नामुळेहि आपले वर लवकर वाढू शकते. आपण रोज जे पदार्थ खातो त्यामधील काही असे आहेत जे आपल्याला वेळेअगोदर म्हातारे करतात हे तुम्हाला माहिती आहे का ? सर्वाना तरुणपणा हवा आहे. त्याकरिता जर हे पदार्थ कमी खाल्ले तर दिर्घकाळ म्हातारपणा टाळता येऊ शकतो. तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसू शकता. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती खासरे वर बघूया…

मिठाई

जास्त गोड खाल्याने बॉडीमध्ये ग्लायसेशन नामक प्रक्रिया सुरु होते. या प्रक्रियेमुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात आणि अकाली म्हातारपण येऊ शकते. त्याकरिता मिठाई खाणे टाळावे.

सॉस

सॉस मध्ये साखर, मिठ व प्रिझरवेटीव अधिक प्रमाणात असतात. हे पदार्थ अति प्रमाणात खाल्याने डोळ्याखाली सूज आणि काळे वर्तुळ दिसतात. यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे.

कोल्ड्रीक्स

कोल्ड्रीन्न्कमध्ये कॅफेन आणि फ्र्क्टोज हे रसायन मोठ्या प्रमाणात आढळते. हे रसायने लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. आणि यामुळे वय जास्त दिसते. म्हणून कोल्ड्रीक अति प्रमाणात पिऊ नये.

प्रोसेस फूड

अन्न अधिक काळ टिकाव म्हणून प्रोसेस फूड मध्ये प्रिझरवेटीव खूप प्रमाणात वापरल्या जाते त्यामुळे शरीरातील सेल्स मध्ये सोडियम जमा होते. ज्यामुळे त्वचेवर सूज येते.

वनस्पती तूप

वनस्पती तूप मध्ये ट्रान्स फैट नावाचा घटक असतो यामुळेच शरीराचा लठ्ठपणा वाढतो. या घटकामुळे त्वचेला नुकसान पोहचते आणि यामुळे सुरकुत्या लवकर पडतात.

एनर्जी ड्रिंक

एनर्जी ड्रिंक दाताचे वरील आवरण म्हणजे एनेमल कमजोर करते. दात लवकर पडतात आणि हाडे कुमकुवत होतात. त्यामुळे एनर्जी ड्रिंक अति प्रमाणात घेणे टाळावे.

तंदुरी चिकन

तंदुरी चिकन हा पदार्थ बनविण्याकरिता तो तीव्र आगीवर बनविण्यात येतो. चिकन तंदुरीमुळे वजन वाढते आणि कॅन्सरची होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे विचार करून कमी प्रमाणात खाणे योग्य आहे.

कॉफी

कॉफीमध्ये कॅफिन हे रसायन आढळते त्यामुळे झोपमोड होते. यागोष्टीमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल पडतात. सुरकुत्याची समस्या कॉफीमुळे वाढू शकते.

लोणचे

लोणच्यामध्ये अधिक प्रमाणात तेल आणि मीठ असते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात आणि हाडेसुध्दा कुमकुवत होतात. त्यामुळे अति प्रमाणात लोणचे खाणे टाळावे.

जंक फूड

जंक फूड मध्ये मिसळले जाणारे अजिनोमोटोसारखे इनग्रीडीयन्ट शरीरास अतिशय हानिकारक असतात. यामुळे एजिंग प्रोसेस जलद प्रमाणात काम करते आणि अकाली वृद्धत्व येते.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *