उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिला लोकसभेचा राजीनामा..

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिला लोकसभेचा राजीनामा..
काही दिवसा अगोदर झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उत्तर प्रदेश मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केशव प्रसाद मौर्य यांनी काल लोकसभेचा राजीनामा दिला…

आपला राजीनामा त्यांनि सचिवाकडे सुपूर्त केला आहे. असे बीजेपी कामकाज सचिवानी मिडीयास कळविले आहे.

आदित्यनाथ हे गोरखपूर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत होते व मौर्य हे फुलपूर(अलाह्बाद) या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असे.

आदित्यनाथ व मौर्य यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ मागील मार्च मध्ये घेतली. बीजेपीला सर्वाधिक मताध्यीक्याने उत्तर प्रदेशमध्ये विजय संपादित करण्यात आला. मागील आठवड्यात अविरोध त्याची राज्य विधानसभेकरिता निवड करण्यात आली.

त्यांनी दिलेले राजीनामे मंजूर झाल्यावर निवडणूक आयोग खालील दोन लोकसभा मतदार संघाकरिता निवडणुका घोषित करतील.

नुकतेच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांनी युपी मधील राज्यसभेचा राजीनामा दिला कारण पणजी मद्ये ते विधानसभा सदस्य निवडून आले होते. केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा त्यांनी मार्च मध्ये दिला व त्यांनतर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्र परत हातात घेतली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *