आदर्श सरपंच असावा कसा ?

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळयासमोर ठेवून शिवस्वराज्याची गावामध्ये स्थापना करणारा असावा.

1) गावच्या उपस्थित प्रश्नांची त्याला जाण असावी त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तो सक्षम असावा.
2) भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त भारत हे ब्रीदवाक्य अंमलात आणणारा असावा.
3) नेत्यांची कटपुतली किंवा त्यांचे ताटाखालचे मांजर बननारा नसावा गावच्या हिताचे निर्णय स्वतः घेणारा असावा.
4) युवकांना व्यवसाय मार्गदर्शन व शैक्षणिक मार्गदर्शन यासाठीचे नियोजन करणारा असावा.
5) वयोवृद्ध व लहान मुलांसाठी बगिचा व खेळाचे मैदान निर्मितीसाठी प्राधान्य देणारा असावा.

6) महिलांना लघुउदयोग उभारणीत मार्गदर्शन व अर्थिक मदत यांची उपाययोजना करणारा असावा.
7) महिला संरक्षण व गावातील गैरप्रकारावर वेळीच कायदाचा आधार घेऊन प्रतिबंध करणारा असावा.
8) स्वच्छ भारत समृद्ध भारत हे ब्रीदवाक्य अंमलात आणुन गावामध्ये शौचालय, गटार बांधकाम यांचे नियोजन करून ते पुर्ण करणारा असावा.
9) गावातील रस्ते, पिण्याचे स्वछ पाणी, लाईट सुविधा यांची व्यवस्थित पुर्तता करणारा असावा.
10) गावातील शाळा, दवाखाना, कृषी विभाग यांचेतील कमतरता वर अभ्यास करून योग्य त्या सुविधा आणण्यासाठी प्रयत्नशील असावा.

11) दारू व इतर व्यसनमुक्त राजकारण करणारा असावा.
12) गावामध्ये सशक्त आणि संपन्न ग्रंथालयाची निर्मिती करणारा असावा.
वाचनाने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक वाईटापुढे नतमस्तक होत नाही – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
13) म्हणजेच शहरातील सर्व सुविधा खेडयामध्ये देणारा असावा तरच शहरातील वाढती गर्दी कमी होऊन खेडी संपन्न आणि सुजलाम सुफलाम होतील.

वरील संदेश महाराष्ट्रमधील सर्व सरपंचापर्यंत पोहचवायला विसरू नका.
आदर्श सरपंच आदर्श ग्रामपंचायत
खरा भारत खेडयामध्ये वसला आहे म्हणून खेडयाकडे चला- महात्मा गांधी…

आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *