कास पठारावर फिरायला जाताय ? सावधान हि पोस्ट नक्की वाचा

पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील सर्व पर्यटकांना एक विनंती कोणत्याही टीव्ही चॅनेल्स आणि न्यूजपेपर्स व सोशल मिडीयावर कास पठाराची न्यूज पाहुन व वाचून कास पठार पाहायला येऊ नये. अक्षरशहा पर्यटकांना मुर्ख बनवलं जात अाहे. कास पठारावर फुलं आलेलीच नाहिएत, आणि लोकांकडून प्रत्येकी शंभर रूपये तिकीट दर, पार्कींग चार्ज वेगळा अशा प्रकारे लुट चालु आहे. शनिवार-रविवार सुट्टीचे दिवस असल्याने हजारो पर्यटक कास पठारावर फुलं पाहाण्यासाठी खुप दुरवरून येत आहेत. परंतू कास पठारावर काहीही पाहण्यासारखं नसल्याने निराश होवुन घरी परतत आहेत (परत जाताना शिव्या सुध्दा घालत आहेत). कृपया कुणीही टीव्ही चॅनेल्स, न्यूजपेपर्स, सोशल मिडीयावरचे फोटो वैगेरे पाहुन कास पठाराकडे येण्याची चूक करू नका तुमचा वेळ आणि पैसे वाया जातील.

सध्याचा फोटो

फुल आलेली आहेत पण नावाला आली आहेत, कास कस फुलतं हे लोकांना माहीतीच नाहीए, जेव्हा फुलं येतात तेव्हा येवतेश्वर पासूनच पिवळ्या रंगांची फुलं दुतर्फा दिसतात, एखाद्या सिनेमातल्या सीन प्रमाणे. पुढे गेल्यावर पठारावर नजर जाईल तिकडे पिवळ्या, जांभळ्या, गुलाबी, सफेद, रंगांची फुलचं फुलचं दिसतात. सध्या काही लोक जाऊन फोटो काढत आहेत ते फोटो जिथे कुठे बांधांवर फुल आलेत तिथे क्षितिज अॅन्गल मध्ये फोटो काढत आहेत , क्षितिज समांतर कॅमेरा पकडल्यास सलग फुलं फुलल्यासारखी दिसतात.

पण वास्तवात फुलांना बहर आलेलाच नाही. एवढीशी फुल पाहण्यासाठी शंभर रू. तिकीट फाडणे म्हणजे पर्यटकांची शुध्द फसवणूक आहे. शिवाय कास पठारावर आॅनलाईन बुकींग केलेल्यांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे येण्यापुर्वी आॅनलाईन बुकींग करावी लागते. तसे नाही केल्यास पोलीस तुम्हाला सातार्‍यात कासकडे जाणार्‍या रस्त्यावर २५ किमी. आधी (बोगदा परिसरात) रोखतात. त्यामुळे ज्यांनी आॅनलाईन बुकींग केलेल नाही आणि ते पुणे – मुबंई – गुजरात इतर महाराष्ट्र , परराज्य व परदेशातून येतात त्यांना पुन्हा माघारी जाव लागत व पैसे वाया जातात. पर्यटक दुरून येतात पुण्या मुंबईवरून येण्यासाठी कमीत कमीत कारला ५ – १० हजाराचे पेट्रोल, डिझेल तर लागतच ना? हे पैसे पोलीस अथवा कास व्यवस्थापन तुम्हाला देत का? नाही ना? मग जाण्यात अर्थ काय? वेळ आणि पैशांचा हा अपव्यय आहे. आणि फुल आलेली नसताना वेगवेगळ्या टिव्ही चॅनेल्स, न्यूजपेपर्स, व सोशल मिडीयावर कास पठार बहरलय अशी न्यूज दिली जाते आणि पर्यटकांना मुर्ख बनवल जात.

एवढ्या दुरून आल्यावर पर्यटकांना एकतर आॅनलाईन बुकींग नसेल तस प्रवेश मिळत नाही आणि आॅनलाईन बुकींग असेलही तरी एवढ्याश्या बांधा बांधावर उगाच नावाला आलेल्या फुलांसाठी प्रत्येकी शंभर रू. तिकीट दर आकारणं कितपत योग्य आहे. पर्यटकांना कास पठार बहरलय अशी प्रसारमाध्यमातून न्यूज दाखवून कासकडे जाण्यास भाग पाडून अशाप्रकारे लुटण्याचे धंदे चालु आहेत. तरीही ज्यांना जायचं असेल त्यांनी जाव फुल नसली तरी निसर्ग खुप छान आहे, सगळीकडे हिरवळ आहे, वरून दिसणारी काठोकाठ भरलेली धरणं डोळ्याच पारणं फेडतात. शिवाय कास तलावही भरलेला आहे. बाकी पठारावर नाइलाजास्तव प्रत्येकी शंभर रू. तिकीट काढवचं लागत.

साभार
film city वाई फेसबुक वाल

2 comments

  1. Kharokar aani atishay lagirvani gost. Mazye kahi shejari 2 diwadapurvich javun aale tyana farach pachhatap hotoy kass patharla gelyacga.
    Mihi sahkutumb janar hoto pan turt hya karnamule radd kele aahe.

  2. तुम्ही वाघ बघायला जाता एखाद्या अभयारण्यात, रु. १०० च काय त्याहून कित्येकपट पैसे देऊन, तिथे काय वाघ दाखवण्याची ग्यारंटी देतात काय. तिथे मात्र गपचुप परत येता.
    इथे ही फी लावावी लागली, कारण आपणच पर्यटकांनी या फुलांची नासधूस सुरू केली, …. फुलांवर बसून आपले फोटो काढणे, फुलांची रोपे उपटून नेणे, सर्वत्र घाण करणे… हे सर्व केल्यानेच फी लावण्याची वेळ आली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *