असा व्यक्ती ज्याने ६० वर्षापासून केली नाही आंघोळ…

फोटो बघितल्यावर तुम्हाला वाटल कि हा व्यक्ती गेम ऑफ थ्रोनचा पात्र असेल. परंतु तसे काही नाही आहे. हा व्यक्ती खाराखुरच असा जगतो. जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून लोक याला ओळखतात. अमु हाजी हे सदर व्यक्तीचे नाव आहे. वय ८० वर्ष त्याच्या म्हनण्यानुसार जर त्याने अंघोळ केली तर तो बिमार पडेल. त्याला त्वाचारोग होणार. या कारणामुळे त्याने ६० वर्षापासून अंघोळ केली नाही आहे.

हत्तीच्या चमडीप्रमाणे त्याची संपूर्ण त्वचा झालेली आहे. आणि हा इराण मध्ये देझघा नावाच्या गावात गावाबाहेर राहतो. या भागात पाउस नसल्याने त्याची आपोआप आंघोळ होणे अशक्यच आहे. गावतील लोक हि सांगतात त्याला कोणीच अंघोळ करताना बघितले नाही आहे. असे तेहरान टाईमला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे.

या नवीन काळात तो पुरातन पद्धतीने आयुष्य जगतो. त्याच्या जवळील साहित्यात त्याचे मुख्य साहित्य म्हणजे धातूचा एक पाईप ज्याद्वारे तो धुम्रपान करतो. आणि धुम्रपान करताना तो कशाचा उपयोग करतो याबाबत तुम्हाला सांगितल्यास तुम्ही थक्क होसाल. धुम्रपान करण्याकरिता तो तंबाखू सोबत वापरतो जनावराच विष्ठा… तो सांगतो कि हे कार्य दिवसातून तो पाच वेळेस करत असतो. त्यामुळेच त्याला आत्तापर्यंत कोणताही रोग झाला नाही आहे.

त्याची मुलाखत घ्यायला गेलेल्या मिडिया प्रतिनिधीने त्याला पिण्याकरिता सिगरेट दिली तर तो एकावेळेस ५ सिगरेट ओढू लागला. त्याच्या मते त्याशिवाय त्याला सिगरेट पिण्याची मजाच येत नाही म्हणून तो सिगरेट पेक्षा पाईप ओढणे जास्त पसंद करतो.

गावातील बाहेरील भागात त्याचे एक विटाचे घर आहे. जेथे अमु कित्येक वर्षापासून राहतो. आणि तो कोणा सोबत संबंध ठेवत सुध्दा नाही. तो सांगतो भूतकाळात काही अश्या गोष्टी त्याच्यासोबत घडलेल्या आहेत त्यामुळे तो मानवी वस्तीत जीवन जगावस वाटत नाही.

जास्त वेळ तो आपल्या घरातच राहतो. तो सांगतो कि, सूर्याच्या प्रकाशात स्वतःला दिवसभर तापविल्यामुळे त्याला रात्री थंडीत जास्त त्रास जात नाही. त्याच्या अन्नाचा मुख्य स्त्रोत मेलेली जनावरे आहे. परंतु कधी कधी गावातील लोकही त्याला खायायला अन्न देतात.

.

या हजीने स्वतःचा मृत्यूझाल्यावर त्याला दफन करण्याकरिता स्वतःची कबर स्वतः खोदून ठेवलेली आहे. आणि रात्री तो यामध्येच झोपतो. “अचानक मृत्यू झाल्यास माझा त्रास कोणाला व्हावा नाही याकरिता मी हे करून ठेवलेले आहे” असा तो सांगतो.

अजून एक हाजीचे विशेष म्हणजे त्याला केस कापायला आवडत नाही. तो त्याचे केस वाढल्यास सरळ जाळून टाकतो. असा अजब गजब स्वतःची अजब गजब कटिंग करणारा व्यक्ती हाच असेल हे नक्की.

सर्वाधिक काळ आंघोळ न केल्याचा रेकॉर्ड भारतातील कैलास सिंह यांच्या नावावर होता ज्याने ३८ वर्षापासून आंघोळ केली नव्हती आता हा रेकॉर्ड अमु हाजी याने तोडला आहे. जगातील सर्वाधिक काळ आंघोळ न करणारा व्यक्ती अमु हाजी हा आहे.

स्वतःचा चेहरा कसा दिसतो हे हि त्याला माहिती आहे परंतु त्याला अंघोळ करायची नाही आहे. कधी कधी तो स्वतःचा चेहरा आरश्यामध्ये बघतो परंतु एवढा घाणेरडा असूनहि त्याला तसच रहायचं आहे असे त्याने ठरविले आहे.

अमु हाजीबद्दल हि माहिती आवडल्यास इतरापर्यंत पोहचवायला नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायचे विसरू नका..
आपल्या कडेही काही खासरे लेख असल्यास आम्हाला पाठवा info@KhaasRe.com

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *