UPSC मुलाखतीत विचारलेली काही भन्नाट प्रश्न…

UPSC ची परीक्षा हि भारतातील कठीण परीक्षा पैकी एक आणि त्याहून कठीण UPSC ची मुलाखत कारण हि तसेच देशातील प्रशासनव्यवस्थेतील अधिकारी निवडले जात असतात. अनेकदा अशा मुलाखतींमध्ये उमेदवार किती हजर जबाबी आहे किंवा त्याचा IQ तपासण्यासाठी मुलाखत घेणारे काही गोंधळात टाकणारे प्रश्नही विचारत असतात. त्यांची उत्तरे अनेकदा साधीच असतात. पण उमेदवार गोंधळून जातो का हे तपासण्यासाठी असे प्रश्न केले जातात. यावरून उमेदवाराची निर्णय क्षमता मुलाखत घेणार्याच्या लक्षात येते. अशाच UPSC, बँक किंवा इतर नोकऱ्यासाठीच्या मुलाखतीत विचारलेली काही खासरे प्रश्न आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चला बघूया खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतील का ? उत्तरे सर्वात खाली देण्यात येईल…

१) निळ्या समुद्रात एक लाल रंगाचा दगड टाकल्यावर काय होणार ?
२) मी तुझ्या बहिणीला पळवून नेले तर काय करशील ?
३) हा अर्धा सफरचंद दिसतो का ? या सारखे हुबेहूब दुसरे काय दिसते सांगू शकसिल काय ?
४) हा प्रश्न एका अविवाहित मुलीला विचारण्यात आला होता “ अचानक तुला सकाळी जाग येतो आणि तू प्रेग्नंट आहे हे तुला कळल्यावर तू काय करशील ?
५) जर एका मांजरीला तीन पिल्ले आहे आणि त्या पिल्लाची नावे जानेवरी,फेब्रुवरी आणि मार्च अश तर मांजर काय आहे.
६) एखादा व्यक्ती न झोपता ८ दिवस कसा राहू शकतो ?

७) सचिन आणि नितीन या दोन जुळ्या भावांचा जन्म मे मध्ये झाला तर त्यांचा वाढदिवस जून मध्ये येतो हे कसे शक्य झाले ?
८) मोर एक असा पक्षी आहे जो अंडी देत नाही मग त्याला पिले कशी होतात ?
९) शनिवार, रविवार आणि सोमवार अशे नाव न घेता सलग येणाऱ्या तीन दिवसांना काय म्हणणार ?
१०) जर २ हि कंपनी आहे आणि ३ हि गर्दी आहे, तर ४ आणि ५ काय आहे ?
११) एक कच्चे अंडे एका कडक जागेवर तडा न जाता असे कसे सोडाल ?
१२) एका खुन्याला मृत्युदंड झाला त्याला ३ खोल्या दाखविण्यात आल्या. पहिल्या खोलोत आग लावण्यात आली होती, दुसर्या खोलीत बंदुकधारी मारेकरी आणि तिसर्या खोलीत तीन वर्षापासून उपाशी असलेला सिह होता तर तुने कोणती खोली निवडायला हवी ?

thinking man

१३) एक भिंत बनवण्यासाठी ८ मजुरांना १० दिवस लागतात, तर ती बनवायला ४ मजुरांना किती दिवस लागतात ?
१४) जर तुमच्या एका हातत ३ सफरचंद आणि ४ संत्री आणि दुसर्या हातात नीन संत्री आणि ४ सफरचंद असतील तर तुमच्याकडे काय आहे ?
१५) तुम्ही एखाद्या हत्तीला एका हाताने कसे उचलू शकता ?
१६) बे ऑफ बंगाल कोणत्या स्टेट मध्ये आहे ?
१७) जेम्स बॉंड विमानातून पैराशुट नसताना उडी मारतो आणि जिवंत राहतो हे कसे ?

चला तर आता आपण उत्तरे तपासू किती बरोबर आणि कुठे तुमचा गोंधळ उडाला हे तपासुया…

१. दगड ओला होऊन डुबून जाईल २. माझ्या बहिणीसाठी तुमच्यापेक्षा चांगला नवरा मिळू शकत नाही. ३. दुसरे अर्ध सफरचंद ४. मी खुश होईल आणि हि खुशखबर आपल्या पतीला सांगेल ५. या प्रश्नाचे उत्तर असे आहे कि, त्या मांजरीचे नाव काय आहे ६. आपण रात्रीच्या वेळेस झोपत असतो मग परत दिवसा झोपायची काय गरज ? ७. कारण मे हे एका जागेचे नाव आहे ८. कारण अंडी मोर नाही लांडोर देतो ९. काल,आज आणि उद्या १०. ४ आणि ५ नेहमी ९ होतात ११. अंडे कसेही सोडले तरी कडक जागेस तडा जाणार नाही १२. खोली क्रमांक तीन कारण ३ वर्षापासून उपाशी असलेला सिंह वाचला नसेल १३. आधीच ८ मजुरांनी १० तासात भिंत बांधून ठेवलेली आहे म्हणून परत भिंत बांधण्याची गरज नाही १४. खूप मोठे हात १५. कोणत्याही हत्तीला हात नसतात १६. लिक्विड स्टेट १७. कारण विमान रनवे वरच आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *