आईच्या मंगळसूत्राने दिली सुवर्ण कलाटणी…

पुर्ण नाव – गोकुळ विश्वनाथ महाजन
पत्ता- मु. पो. वाघोड, ता-रावेर, जि- जळगाव

लाखो संकट समोर उभी ठाकली होती…. त्याचे स्वप्न मात्र उच्च शिक्षणाचे ….घरची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत… वडिलांचा व्यवसाय शेतमजुरी, शेतीचे काम न मिळाल्यास केळीचे घड वाहण्यांचे जीवघेणे काम….. तिन्ही बहिण भांवड शिकत होती…….संकटाना तो घाबरला नाही… शैक्षणिक कर्ज मिळवून त्याने शिक्षण चालूच ठेवले… वेळेप्रसंगी शेतात कामे केली…. आई वडीलांचे कष्ट पाहून तो दिवसरात्र आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहीला…शेवटी तो जिंकला आणि ठरला सुवर्णपदकाचा मानकरी …. ही कहाणी आहे वाघोडच्या गोकुळ विश्वनाथ महाजन यांची…..

गोकुळ महाजन यांचे घर

भारत सरकारच्या नामवंत राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (एन. आय. टी), तिरुचिरापल्ली (तामिलनाडू) येथे 12 ऑगस्ट रोजी 13 वा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पार पडला.
या समारंभात इन्फोसिसचे संस्थापक पद्मविभूषण श्री. एन.आर. नारायण मूर्ती प्रमुख पाहुणे होते तर या सोहळ्याला टाटा ग्रुप चे अध्यक्ष श्री.एन. चंन्द्रशेखरन यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रंसंगी एन.आय.टी. च्या निर्देशिका श्रीमती. डाॅ. मिनी थाॅमस ह्याही उपस्थित होत्या.

तिरुचिरापल्ली येथील राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (एन. आय. टी) मधून गोकुळ ने एम.टेक. (केमिकल इंजिनिअरिंग) चे शिक्षण पूर्ण केले. एम.टेक. ला 10 पैकी 9.42 सिजीपीए मिळवून पहिला क्रमांक पटकावल्यामुळे श्री. नारायण मूर्ती यांनी गोकुळला सुवर्णपदक देवून तर श्री.एन. चंन्द्रशेखरन यांनी गुणवत्ता प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. डाॅ. मिनी थाॅमस यांनी गोकुळ ला एम.टेक. ची पदवी प्रदान केली.

मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना देतो. माझ्या शिक्षकांचा या यशात मोलाचा वाटा आहे, माझ्या मामा व मावशी यांनी वेळोवेळी मदत केल्याने यशाचा मार्ग सुकर झाला, असे गोकुळने नमूद केले. माझ्या आयुष्यातील या अनमोल सोहळ्यामध्ये माझ्या आई वडीलांनी व नातेवाईकांनी हजेरी लावल्याने माझ्या आंनदाला पारावार उरला नाही, असे गोकुळने सांगितले. या समारंभाला शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व पालक उपस्थित होते. गोकुळ चा लहान भाऊ राहुल महाजन पुण्यात फिल्म मेकींग मध्ये पदविकेचे शिक्षण घेत आहे, तर बहिण रुपाली महाजन रावेरला बारावीत शिकत आहे.

आयुष्यातील कठीण प्रंसग
बी.टेक. च्या प्रवेश फी साठी मोडले आईच्या मंगळसूत्रातील मणी
प्रवेशाची तारीख जवळ येत होती. तशी उत्सुकता वाढत होती अन् ताण ही, प्रवेशासाठी दहा हजार रुपयांची गरज होती. शेवटच्या क्षणी पैसे जमणार नसल्याचे कळाले. त्यावेळी आम्ही सर्वजण खचून गेले मात्र माझ्या आईने आम्हाला उभारी दिली. पैसे कसे जमनार या विचाराने मीही भांबावून गेलो. शेवटी माझ्या आईने आम्हाला उपाय सुचविला. दुसर्या दिवशीच मंगळसूत्रातील मणी मोडून पैसे जमविले व त्याच दिवशी बी. टेक. ला प्रवेश घेवून रात्री 11.30 ला घरी पोहोचलो. 29 जुलै 2009 चा तो दिवस खूप काही शिकवून गेला, असे गोकुळ ने गहिवरून सांगितले.

सुवर्णपदक मिळवून गोकुळ ने वाघोडच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय रचला. सध्या गोकुळ चेन्नई मधील नावाजलेल्या मुरूगप्पा ग्रुप च्या चोलामंडलम एम. एस. रीस्क सर्विसेस लिमिटेड या कंपनी मध्ये प्रक्रीया सुरक्षा अभियंता म्हणून कार्यरत आहे. गोकुळ एक उत्तम वक्ता व कवी ही आहे.
विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तो नेहमी मार्गदर्शन करीत असतो.

आजपर्यंतची गोकुळ ची कामगिरी

शालेय स्तरावर तब्बल पाच वेळा आदर्श विद्यार्थी पुरस्कार
बी.टेक. ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून दुसरा क्रमांक
आंतरराष्ट्रीय विज्ञान महासंमेलनांमध्ये दोन सर्वोत्कृष्ट मौखिक सादरीकरण पुरस्कार
एम.टेक. ला असताना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार व शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार
एम. टेक. केमिकल इंजिनिअरिंग- सुवर्णपदक विजेता

असा झाला शैक्षणिक प्रवास
पहिली ते चौथी – जि. प. मराठी मुलांची शाळा, वाघोड
पाचवी ते दहावी – महाराष्ट्र विद्या मंदीर, वाघोड अकरावी & बारावी – सरदार जी.जी. ज्यु. काॅलेज, रावेर
बी. टेक. केमिकल इंजिनिअरिंग- यु.आय.सि.टी., उमवि, जळगाव
एम. टेक. केमिकल इंजिनिअरिंग- राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (एन. आय. टी)

साभार:-
गोकुळ महाजन यांचे फेसबुक प्रोफाईल

हा संघर्षमय प्रवास आवडल्यास नक्की शेअर करा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *