तर आज डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष नसते !

बाप का, भाई का, दादा का सबका बदला लेगा तेरा ए फैजल…
हा डायलॉग सिनेमात एकलाच असल. Sucess is Best Revenge असे लोक म्हणतात. परंतु तो मिळायला करावी लागणारे कठीण परिश्रम फार कमी लोग करतात. अपमानातून अनेक लोक घडलेले आहे. त्याचेच एक सध्याच्या घडीला सांगण्यालायक खासरे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आहेत.

शस्त्राच्या मारापेक्षा शब्दाचा मार जास्त असतो आणि असा मार ट्रम्प यांना सर्व लोकात मिळाला होता. आणि त्याचाच बदला म्हणून हा अफ्जोधीश उद्योगपती राजकारणामध्ये आला. चला बघूया खासरेवर ट्रम्प तात्याची कथा…

असा झाला होतो ट्रम्प यांचा अपमान…

डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान करणारे दुसरे तिसरे कोणी नसून अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आहेत. तर विषय असा होता कि डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्या जन्म ठिकाणाचा वाद उठविला होता. त्यांनीच हि अफवा पसरवली होती कि बराक ओबामा यांचा जन्म केनिया मध्ये झाला हवाई येथे नाही त्यामुळे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही.

ओबामा या विधानामुळे प्रचंड राग आला आणि याचा बदला म्हणून २०११ साली व्हाईट हाउस येथील एका जेवणाच्या कार्यक्रमास डोनाल्ड ट्रम्प यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांचा अपमान करण्याचा हा स्पष्ट हेतू होता. डोनाल्ड ट्रम्प तिथे पोहचले आणि त्यानंतर ओबामा यांनी जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यावर भाषण देण्यास स्टेज वर येताच एक कागद सोबत घेऊन आले. यामध्ये त्याने कार्टून विडीयो दाखविला ज्यामध्ये Lion King मधील कार्टून दाखविण्यात आले. या घटनेचा संपूर्ण विडीयो आपण खाली बघू शकता…

तो कागद होता अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे जन्म प्रमाणपत्र, आणि त्यानंतर जी त्यांनी तुफान फटकेबाजी केली त्यामुळे आयुष्यातील सर्वात मोठा अपमान या उद्योगपत्याचा ठरला. हा विषय अनेक दिवस मिडियामध्ये गाजला आणि संपूर्ण अमेरिकेमधून ट्रम्प यांच्यावर टीकेचे झोड होत होती. याचा कळस हा होता कि ओबामानि एक फोटो दाखविला जर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाईट हाउस कसे असेल असा तो फोटो होता. यामध्ये संपूर्ण व्हाईट हाउसला एका क्लबचे रूप देण्यात आले होते आणि काही बिकिनी घातलेल्या मोडल त्या व्हाईट हाउस समोर यावरून सर्व प्रतिष्ठित लोकात ट्रम्प विषयी एक हसा झाला.

या घटनेनंतर ट्रम्प यांनी राजकारणात याच ठरवील आणि यावर ४ वर्ष अभ्यास केला. आणि २०१५ मध्ये त्यांनी घोषणा केली कि ते अमेरिकेची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढविणार आणि त्यांनी हि निवडणूक लढवली. पुढे काय झाले हे संपूर्ण जागस माहिती आहे. त्याबद्दल कोणालाच सांगायची गरज नाही. FrontLine या प्रसिद्ध magazine ने या संपूर्ण घटनेवर व ट्रम्पनि स्वतःमध्ये केलेल्या बदलावर एक विडीओ सुध्दा बनविलेला आहे तो तुम्ही खाली बघू शकता…

एक अपमान तुम्हाला बदलवू शकतो आणि हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या अपमानाने त्यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष केले.

हि खासरे गोष्ट आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
जर आपल्या कडे काही खासरे गोष्टी असेल तर तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर ह्या गोष्टी शेअर करू शकता धन्यवाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *