ऑटो ड्रायव्हरचा मुलगा ते टीव्हीतील महाराणा प्रताप…

भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप’ या मालिकेने घराघरात पोहोचलेला टीव्हीतील महाराणा प्रताप फैजल खान आज सर्वाना माहिती आहे. या सिरीयल मध्ये येण्याअगोदर त्याने 2012 मध्ये फैजलने डांसिंग रियलिटी शो ‘डांस इंडिया डांस लिल मास्टर’चा दुसरा सीजन जिंकला होता. तेव्हा हा चेहरा सर्वाना माहिती झाला. परंतु या मागे त्याचा संघर्ष अनेक लोकांना माहिती नाही. चला खासरे वर आज तुम्हाला फैजलबद्दल काही माहिती आम्ही देणार…

Faisal Khan

फैजलचा जन्म १९९८ साली मुंबई येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील ऑटो ड्रायवर आणि आई गृहिणी परंतु फैजलला लहानपणापासून डान्स व अभिनयाची आवड हि आवड त्याच्या वडिलांनी ओळखली व मेहनत घेऊन त्याला शिकविले. मीरा अकादमी मधून त्याने दहावी पूर्ण केली. श्रीकांत अहिरे हा त्याचा गुरु आहे.

Did Lil Master Trophy

वयाच्या १३ व्या वर्षी फैजलने या रुपेरी दुनियेत प्रवेश केला डान्स इंडिया डान्सच्या किड्स स्पेशल शो मध्ये तो विजेता ठरला. तेव्हापासून त्याला प्रसिद्धी मिळाला सुरवात झाली आणि त्याने परत मागे वळून पहिले नाही. फैजलने झलक दिखला जा हा डान्स शो सुध्दा जिंकला या मध्ये त्याला ३० लाख रुपये बक्षिक मिळाले.

Jhalak Dikhlaja Price Win

त्याला पत्रकारांनी विचारले कि डान्स शो जिंकल्यावर काय वाटत आहे तर फैजल म्हणाला “ वडिलांना आता ऑटो चालवाव लागणार नाही याचा आनंद होत आहे.” कमी वयात परिवाराचा भार खांद्यावर घेत फैजलनि त्याचे स्वप्न पूर्ण करून दाखविले आहे.

आतापर्यंत त्यांच्या मालकिचा मुंबईत फ्लॅट नव्हता. तो मुंबईत आजीसोबत राहत होता. त्याच्या कठोर परिश्रमाला अखेर यश मिळाले. मुंबईसारख्या महागड्या शहरात त्याला फ्लॅट विकत घेता आला. काही दिवसा अगोदर तो नवीन घरात रहायला आला आहे.

Faisal House

तो म्हणतो कि “दोन महिन्यांपूर्वी आम्ही या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. हा वनबिएचके फ्लॅट आहे. विशेष म्हणजे आम्ही 15 व्या मजल्यावर राहतो. माझ्यासाठी हा फ्लॅट विशेष आहे. मुंबईसारख्या शहरात फ्लॅट विकत घेणे काही सोपी गोष्ट नाही. यापूर्वी मी आजीच्या घरी राहत होतो. आमचे स्वतःचे घर नव्हते. मला माझा अभिमान आहे, की मी मेहनतीच्या बळावर माझ्या पालकांचे स्वप्न पुर्ण केले आहे”.

Faisal Father

आणि विशेष म्हणजे फैजलने स्वतः घराची इंटेरिअर डिझायनिंग केली आहे तो सांगतो कि “या फ्लॅटचे कलर कॉम्बिनेशन मी डिसाईड केले आहे. संपूर्ण घराला ऑफ व्हाईट आणि लॅव्हेंडर कलरने पेंट केले आहे. मी कुठे तरी वाचले आहे, की लॅव्हेंडर कलरने मनात सकारात्मक भावना येतात. सुरवातीला मला घराला ऑरेंज कलर द्यायचा होता. पण तो फार डार्क दिसला असता. त्यामुळे मी लाईट आणि पॉझिटिव्ह कलरची निवड केली आहे. घर सजवण्यासाठी मला इंटेरिअर डिझायनर हायर करायचा नव्हता. माझ्या घरच्यांनीच इंटेरिअर तयार केले आहे”

फैजल यशाचे असेच अतिउच्च शिखरे गाठत राहो खासरे तर्फे त्याला शुभेच्छा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *