भारतात स्वतःची पहिली खाजगी कार व विमान खरेदी करणारे पितापुत्र…

आजघडीला कारचे नव-नवीन मॉडेल बाजारात येत आहेत. महानगरात कारची संख्‍या एवढी वाढली की, पार्किंगचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्‍या अनुषंगाने खासरे सांगणार आहे कार व विमान खरेदी करणाऱ्या पहिल्‍या भारतीय व्‍यक्‍तीविषयी रंजक माहिती आज खासरेवर बघूया व त्यांचे चंगळवादि आयुष्य बघून तुम्ही हैराण होणार हे नक्की….

भारतात पहिली गाडी आणि विमान आणणारे भारतीय हे राजघराण्यातील पिता पुत्र होते. महाराजा राजिंदर सिंग व महाराजा भूपिंदर सिंघ यांनी स्वतःचे खाजगी विमान तर त्यांनी स्पेशल United Kingdom वरून बोलाविले होते.

देशात इंग्रज राजवट बळकट झाली होती. तेव्‍हा इंग्रज अधिकाऱ्यांकडेच मोटार गाड्या होत्‍या. त्‍या काळात पटियालाचे राजे राजींदर सिंग यांनी कार खरेदी केली होती. असे म्‍हणतात की, भारतात ज्‍या माणसाने पहिली कार विकत घेतली ते हेच आहेत. गोलमेज परिषदेमध्ये सिख राजांचे नेतृत्व भूपिंदर सिंघ यांनी केले होते. तसेच पहिल्या महायुद्धात हि त्याचा समावेश होता. रणजी ट्रॉफीसुरु करण्याकरिता त्यांचा मोलाचा हिस्सा होता.

वडील भूपिंदर सिंघ यांच्या मृत्यनंतर १९०० ते १९३८ पर्यंत त्यांनी पटियाला संस्थानावर राज्य केले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी त्यांना राजाचा किताब देण्यात आला. १२ ऑक्टोंबर १८८२ ला भूपिंदर सिंघ यांचा जन्म झाला त्याचे वडील राजिंदर सिंघ…

राजे राजींदर सिंग हे खूप चंगळवादी होते. त्‍यांचा मोठा दरारा होता. इंग्रजही त्‍यांना घाबरत असत. इंग्रजांनी त्‍यांना ‘ स्‍टार ऑफ इंडिया’ हा पुरस्‍कार दिला होता. राजींदर सिंग यांना चार-पाच नव्‍हे तर 365 बायका होत्‍या. त्यांचा पुत्रही या गोष्टीत मागे नव्हता. “महाराजा” या पुस्तकात दिवान जरमनी दास लिहतात कि, महाराज कुमारिका मुलीला वाईन मध्ये आंघोळ घालत आणि त्यानंतर ती संपूर्ण वाईन ते स्वतः चाटून पीत होते.

त्यांचा नेकलेस हा जगात आजही प्रसिद्ध आहे. पटियाला नेकलेस कसा बनविण्यात आला ह्या बाबत असे सांगितल्या जाते कि , राजा अनेक हिरे, माणिक, मोती याची पेटी घेऊन साउथ आफ्रिकेमध्ये Persian jeweler Cartier यांच्या कडून बनवून घेतला. या हिऱ्यामध्ये जगातील ७ वा सगळ्यात महाग हिराहि समाविष्ट होता. त्याची किंमत २५ मिलियन डॉलर ( १ अफ्ज ६० कोटी )इतकी आहे.

भूपिंदर सिंघ यांच्या पोटाच्या भुकेपेक्षा सेक्सची भूक जास्त होती हि दिसून येते. त्यांना रोज २० किलो अन्न जेवायला लागत असे. आणि त्यांच्या हरामखाण्यात ३५० महिला त्याची सेक्सची भूक भागवायला नेहमी राहत होत्या. त्यांच्या करिता तो फ्रांस, इंग्लंड इत्यादी ठिकाणावरून ड्रेस डिझायनर, ब्युटीशियन बोलवत असे.

राजींदर सिंग यांना महागड्या मोटारी घेण्‍याचा छंद होता. त्‍यातूनच त्‍या काळात प्रसिद्ध असलेली महागडी रोल्‍स रॉइस गाडी खरेदी करायला ते गेले. तुम्‍हाला ही गाडी परवडणार नाही, असे म्‍हणून त्‍यांना विक्रेत्‍याने गाडी दाखवणे टाळले. ही बाब राजींदर सिंग यांना खूप बोचली. त्‍यांना याचा राग आला. त्‍यातूनच त्‍यांनी शो रुममध्‍ये असलेल्‍या सर्वच्‍या सर्व म्‍हणजे 20 रोल्‍स रॉइस गाड्या एकाच वेळी विकत घेतल्‍या. एवढेच नाही तर आपल्‍या अपमानाचा बदला घ्‍यायला त्‍यांनी या गाड्यांना कचरागाड्या केले होते.

भूपिंदर सिंघला चंगळवादि आयुष्य जगायचा प्रचंड शौक होता. त्याने १९२२ साली प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीकरिता १४०० भांड्याचा डिनर सेट बनवला. तो संपूर्ण सोन्या आणि चांदीपासून बनविण्यात आला होता. त्याचा मित्र हिटलर याने त्याला दुर्मिळ रॉयल मेबैक गाडी गिफ्ट दिली होती.

भूपिंदरसिंघ यांने ५ वेळा लग्न केले आणि या ५ स्त्रियापासून त्याला ८८ अपत्ये झाली. सोबतच्या रखेलीनाही अगणित मुल बाळे होती. असे सांगतात कि जेव्हा तो स्विमिंग पूलवर आंघोळ करायला जात असे तेव्हा तो त्याच्या सोबत असलेल्या स्त्रियांना विवस्त्र सोबत अंघोळ करायला लावत आणि त्यांच्या स्तनावर व्हिस्की ओतून तो पीत असे.


Dominique Lapierre and Larry Collins चे पुस्तक Freedom At Midnight मध्ये ते लिहतात कि, वर्षातून एकदा राजा त्याच्या प्रजेसमोर पूर्ण नागडा जात असे. फक्त हिऱ्याचा एक हार त्याच्या गळ्यात राहत असे. त्याच्या या कृतीमुळे लोक असे मानत कि वाईट प्रवृत्ती जमिनीवरून नष्ट होतात.

आयपीएलमध्‍ये उद्योगपती, सिनेकलाकार यांच्‍या मालकीच्‍या क्रिकेट टीम आपल्‍याला पाहाला मिळतात. परंतु, इंग्रज काळात राजींदर सिंह यांच्‍या मालकीच्‍या क्र‍िकेट आणि पोलो टीम्‍स होत्‍या. त्‍यांच्‍यामध्‍ये ते सामने आयोजित करत. त्‍यांनी क्र‍िकेटचे मैदानंही तयार केले होते.

राजे राजींदर सिंह यांच्‍या आठवणी आजही पटियालाच्‍या त्‍यांच्‍या भव्‍य राजवाड्या जपल्‍या आहेत. येथे रोज देशविदेशातून शेकडो पर्यटक भेट देतात. कधी पटियाला गेलास तर त्याच्या या राजवाड्यास अवश्य भेट द्या. आणि त्याचे रॉयल आयुष्यातील काही आठवणी बघून या…
हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा..

वाचा पद्मनाभस्वामी याच्या खजिन्याबाबत अपरिचित माहिती..

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *