फेसबुक मध्ये काम करणारी पहिली महिला…

२००५ मध्ये ती जेव्हा फेसबुकमध्ये जुळली तेव्हा फेसबुकमध्ये काम करणारी ती पहिला महिला इंजिनिअर ठरली होती. मात्र तेथेही रूचीने आपले वेगळे पण दाखवून दिले. रूचीच्या एका संकल्पनेमुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. आज जी न्यूज फीड आपण बघतो ज्यावर आपले मित्र काय करत आहे, वेगवेगळ्या बातम्या इत्यादी अपडेट मिळतात त्या न्यूज फिडचा शोध लावणारी दुसरी तिसरी कोणी नसून रुची एक पुणेकर आहे. चला बघूया खासरेवर या पुणेकर इंजिनियरची माहिती…

जन्म २० जानेवारी १९८२ साली तिचा जन्म पुणेला झाला प्राथमिक शिक्षण पुणेला तिने पूर्ण केले. लहानपणची आठवण विचारल्या असत्या ती सांगते कि हॉकि टीमची सलग ६ वर्ष ती सदस्य होती. याच गोष्टीमुळे तिला टीम सोबत काम करायची सवय लागली आणि हि सवय भविष्यात तिला अत्यंत उपयोगी आली.

तिचे शिक्षण कॉर्नेगी मेलन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल कंप्यूटर इंजीनियरिंगमध्ये बॅचलर व मास्टर डिग्री घेतली. पती आदित्य अग्रवाल व तिची भेट याच दरम्यान झाले. आदित्य हा मलेशियन भारतीय आहे. सध्या आदित्य आणि रुची दोघेही सोबत काम करतात. नुकतेच तिचे नाव PayTm सोबत जोडले गेले. त्यामुळे ती परत एकदा चर्चेत आली आहे.

रुची संघवीचे वडील पुण्यात एक हेवी इंजीनियरिंग कंपनी चालवतात. तर तिचे आजोबा दादा स्टेनलेस स्टीलच्या उद्योगात होते. त्यामुळे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर रूची घरातील व्यवसायाच सांभाळेल असे ठरले होते. त्यावेळी तिचे वडील तिला म्हणत असत की, या स्पर्धत तू महिला आहे टिकणार कशी ? त्यावेळी ती वडीलांना विश्वासाने सांगायची, मी जे काही करेन त्यात नक्कीच यशस्वी होईन. कारण तिला स्वतःवर आत्मविश्वास होता.

पदवी घेतानाच रूचीला वॉल स्ट्रीटमध्ये एका बँकेत काम करण्यास संधी मिळाली होती. तेथील क्यूबिकल्स खूपच छोटे होते व तेथे तिला कम्फर्ट वाटत नसत. त्यावेळी तिने बँकेला सांगितले की, मला येलो फीवरचा त्रास आहे आणि ती काम करू शकत नाही. बॅंकेने तिला सोडण्याचा निर्णय घेतला व रूची ओरेकल कॉरपोरेशनमध्ये ज्वाईन झाली. त्यानंतर काही काळ तेथे काम केल्यानंतर रूचीने ओरेकल कंपनी सोडून फेसबुकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हा निर्णय चुकीचा असल्याचे घरच्यांचे म्हणणे होते. कारण फेसबुकमध्ये त्यावेळी केवळ 20 लोक होते. फेसबुक नुकतीच सुरु झालेली एक नवीन कंपनी होती.

फेसबुकमध्ये काम करताना रूचीला तिचा जुना वर्गमित्र आदित्य अग्रवाल भेटला. दोघांत पुन्हा मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रुचीने फेसबुकमधील न्यूजफीड फीचरचे पहिले व्हर्जन तयार केले होते. अर्थात याला प्रथम काहींनी विरोध केला तर काहींनी स्वागत केले.

फेसबुकमधील फीचर ‘न्यूज फीड’ची आयडिया रुचीची होती. २००५ मध्ये रूचीने फेसबुक जॉईन केल्यानंतर संस्थापक जुकरबर्ग आणि त्याचे सहकारी साईटवर यूजर्सना जास्तीत जास्त वेळ व्यस्त राहण्यासाठी काही तरी कल्पना शोधत होते. कारण पहिले मित्राला मेसेज करणे, मित्र शोधणे येवढेच फेसबुकचे फिचर होते यामध्ये रुचीने अमुलाग्र बदल केला. त्याकरिता रूचीने एक न्यूज पेपरसारखी आयडिया दिली. ज्यामुळे हार्डकोर वाचक तासनतास साईटवर राहू शकतील असे रूचीचे म्हणणे होते. ही आयडिया मार्कला पसंद आली. मग त्यानंतर तयार झाले फेसबुकचे फीचर ‘न्यूज फीड’ केवळ या फीचरमुळे फेसबुकवर प्रती ताशी ५० हजार नवे यूजर्स राहू लागले. ज्यामुळे फेसबुकला कोट्यावधीचा फायदा मिळू लागला.

फेसबुकमध्ये काम करताना तिने कंपनीपासून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला. मला आई-वडिलांना भेटायला जायचे असल्याचे कारण तिने कंपनीला दिले. त्यावेळी ती आदित्यसोबत डेटिंग करत होती. भारतात आल्यावर आदित्यसोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला. दोघांचे लग्न झाले. ह्या लग्नात स्वतः मार्क झकेनबर्ग आला होता. त्याच्या सोबत त्याची पत्नी प्रीसिलापण होती दोघांनी भारतीय वेषात धमाल उडवली होती. हे तुम्ही फोटोत बघूच शकता. २०१० साली हे दोघेही फेसबुकमधून वेगळे झाले. आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

रूची व पती आदित्यने मिळून कोव नावाची कंपनीची सुरुवात केली. दोन वर्षातच ती 25 कोटी डॉलरला ड्रॉपबॉक्स कंपनीला विकली व दोघेही त्याच कंपनीत रूजू झाले. रुची ड्रॉपबॉक्समध्ये व्हाईस प्रेसीडेंट (ऑपरेशन्स) राहिली. वर्षभर तेथे राहिल्यानंतर तेथूनही ती बाहेर पडून सल्लागार म्हणून काम पाहू लागली.

Paytm सध्या भारतात सर्वाधिक लोकप्रिय झाले. याचे मुख्य कारण प्रधानमंत्री मोदिनी केलेली नोटबंदी आहे. परंतु रुची सध्या PayTm सोबत काम करत नाही कारण तिचे बाळ तिला महिन्यात चार वेळेस वेगवेगळ्या देशात प्रवास करणे कठीण जात होते म्हणून तिने PayTm सोबत संबंध तोडले. परंतु जे होते ते चांगल्या करिता होते. रुची व तिचा पती आदित्य दोघेही त्यांच्या आयुष्यात नवीन बाळासोबत खुश आहे.

तिला पुणेच काय आवडते हे विचारल्यास ती सांगते कि जोशी वडेवाला, Marzorin, Cake & Counter आणि शिवसागर या गोष्टीची तिला अमेरिकेत नेहमी आठवण येते.

रुची संघवी फेसबुकमध्ये काम करणारी पहिली महिला व विशेष म्हणजे एक पुणेकर तिला खासरे तर्फे सलाम…
हि माहिती अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *